जपानमध्ये १९४८ साली जबरदस्तीने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्याचा कायदा संमत करण्यात आला होता. या कायद्यान्वये जपानमधील हजारो लोकांची जबरदस्तीने नसबंदी करण्यात आली होती. त्याचे परिणाम भोगणाऱ्या अनेक पीडितांनी या कायद्याविरोधात अगदी अलीकडेपर्यंत न्यायालयात लढा दिला. आता जपानच्या सर्वोच्च न्यायालयाने ३ जुलै रोजी हा कायदा असंवैधानिक असल्याचे ठरवीत सर्व पीडितांना नुकसानभरपाई देण्याचा महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. १९४८ साली लागू केलेल्या या कायद्यानुसार, अनेकांवर नसबंदीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. खासकरून ‘युजेनिक्स’च्या (सुप्रजाजननशास्त्र) दृष्टिकोनातून हा कायदा लागू करण्यात आला होता. युजेनिक्स म्हणजे देशातील लोकसंख्येची आनुवंशिक रचना सुधारण्यासाठी मानवी लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणे आणि त्यासाठी निवडक जणांच्या प्रजननालाच अनुमती देणे होय. थोडक्यात, या कायद्यान्वये अशास्त्रीय दृष्टीकोन बाळगून मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अपंग लोकांची जबरदस्तीने नसबंदी करण्यात आली, अशी माहिती द जपान टाइम्सने दिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा