मध्ययुगीन अरब भूगोलतज्ज्ञ अल-मुकद्दसी यांनी जेरुसलेमला “विंचवांनी भरलेली सोन्याची वाटी” म्हटले होते. पवित्र शहरांपैकी सर्वात पवित्र आणि तरीही त्यापैकी सर्वात रक्तरंजित जेरुसलेम हे जगातील सर्वात वादग्रस्त शहर ठरले आहे. पहिले महायुद्ध संपल्यानंतर जेरुसलेमची पॅलेस्टिनी आणि इस्रायलमध्ये फाळणी झाली. सहा दिवसांच्या अरब-इस्त्रायली युद्धानंतर, पूर्व जेरुसलेम इस्रायलमध्ये विलीन झाले, त्यावेळेस जवळपास दोन लाख ज्यू या भागात स्थायिक झाले, तेव्हापासून परिस्थिती अशीच होती. असे असले तरी हा वाद ५०-७५ वर्षे जुना नसून त्याचा इतिहास किमान दोन हजार वर्षांचा आहे. या प्रदेशातील वेगवेगळ्या धार्मिक समुदायांनी नेहमीच या प्रदेशावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता, किंबहुना करत आहेत. आणि त्यातूनच हा भूभाग चिरंतर वादाच्या-युद्धाच्या भोवऱ्यात अडकल्याचे लक्षात येते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जगातील वेगवेगळ्या धर्मांचे तौलनिक अभ्यासक कॅरेन आर्मस्ट्राँग यांनी ‘जेरुसलेम-वन सिटी, थ्री फेथ’ या त्यांच्या ग्रंथात म्हटले आहे की, “प्राचीन काळात जगभरातील विविध धर्मांमध्ये श्रद्धेच्या प्रकटीकरणासाठी विकसित झालेले ठिकाण म्हणजे तीर्थक्षेत्र. जेरुसलेम हे अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. मुख्यत्त्वे जेरुसलेम हे ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिमांसाठीचे पवित्र स्थान आहे. यामुळेच या तीनही धर्माच्या अनुयायांना या शहराकडे वस्तुनिष्ठपणे पाहणे खूप कठीण होते, कारण ते त्यांच्या स्वतःच्या संकल्पनेशी आणि अंतिम वास्तवाशी बांधले गेले आहेत- ज्याला कधीकधी ‘देव’ किंवा पवित्र असे म्हटले जाते.”
आणखी वाचा: इस्रायलमध्ये स्थलांतर भारतीय ज्यूंसाठी (बेने इस्रायली) सोपे का नव्हते?
कॅरेन आर्मस्ट्राँग म्हणतात, ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम यातील प्रत्येक धर्म जेरुसलेमशी संबंधित आहे, हा पवित्र संबंध भूतकाळातील पौराणिक किंवा ऐतिहासिक संदर्भांद्वारे सिद्ध करण्याचा प्रयत्न होतो. बायबल मधील संदर्भांनुसार अब्राहमने आपल्या मुलाचे बलिदान देण्याची तयारी केली होती, ते ठिकाण म्हणजे जेरुसलेम आणि याच ठिकाणी येशू आपल्या शिष्यानां भेटला होता आणि त्यानंतर या शहराजवळील एका ठिकाणी त्याला वधस्तंभावर चढविण्यात आले. इस्लामिक मान्यतेनुसार याच ठिकाणाहून प्रेषित मुहम्मद हे रात्री स्वर्गाच्या दिशेने प्रवासाला निघाले (प्रेषित मुहम्मद यांनी मक्केमधील (मस्जिद अल-हरम) Masjid al-Haram मशिदीपासून जेरुसलेम मधील टेंपल माउंटपर्यंत बुराक नावाच्या पंख असलेल्या घोड्यासदृश प्राण्यावरून प्रवास केला, त्यानंतर ते स्वर्गाच्या दिशेने निघाले). प्रोफेसर सायमन गोल्डहिल यांनी म्हटल्याप्रमाणे या भागाशी धार्मिक भावना जोडल्या गेल्याने त्या भागावरून सतत वाद होताना दिसतात.
ज्यूंचे पवित्र शहर
हे शहर सध्याच्या दक्षिण लेव्हंटशी संबंधित होते. बायबलमधील संदर्भानुसार इसवी सन पूर्व १२५० मध्ये, मोझेसच्या नेतृत्वाखाली १२ जमाती इजिप्तमधून पळून गेल्या आणि सिनाई द्वीपकल्पाजवळ भटके जीवन जगू लागल्या. त्यांना खात्री होती की त्यांच्या देवाने त्यांना कनानच्या सुपीक भूमीचे वचन दिले होते. मोशेचा मुलगा जोशुआच्या नेतृत्वाखाली या जमातींनी कनानमध्ये घुसखोरी केली आणि देवाच्या नावाने हा प्रदेश आपला केला. तरीही जेरुसलेमचे मूळ रहिवासी समजल्या जाणाऱ्या जेबूसी लोकांना ते घालवू शकले नव्हते. इसवी सन १००० मध्ये डेव्हिडच्या शासकांच्या अधिपत्याखाली जेरुसलेम इस्राएलची राजधानी आणि ज्यू परंपरांचे केंद्र झाले. तरीही त्यांनी त्या ठिकाणच्या स्थानिक धार्मिक परंपरांना पायदळी तुडवण्याचा प्रयत्न केला नाही, याची नोंद धर्माच्या इतिहासकारांनी घेतली आहे. जेरुसलेममधील मूर्तिपूजक विधींची अनेक चिन्हे अलगद ज्यू धार्मिक परंपरांचा भाग झाली. तरीही येथे एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे, ती म्हणजे बायबलमध्ये दिलेले संदर्भ हे वास्तविक घटना घडून गेल्यावर हजार वर्षांनी लिहिले गेले आहेत. हे विशेषतः अब्राहम, आयझॅक आणि जेकब सारख्या पात्रांच्या आसपासच्या कथांबद्दल खरे आहे, इस्रायलचे हे तीन कुलपिता कालांतराने यहुदी/ ज्यू परिचयाचे सर्वात मजबूत घटक ठरले. “बायबलसंबंधी लेखकांना एकोणिसाव्या आणि अठराव्या शतकातील कनानमधील जीवनाबद्दल काहीही माहिती नव्हती, परंतु यात आलेल्या कुलपित्याच्या कथा महत्त्वाच्या आहेत, कारण त्यामुळे इस्राएली लोकांनी स्वतःची वेगळी ओळख कशी निर्माण करायला सुरुवात केली याचा उलगडा होतो.” असे आर्मस्ट्राँग नमूद करतात.
ख्रिश्चनांचे पवित्र शहर
नवीन करारानुसार (New Testament), येशूला लहान असताना जेरुसलेमला आणले गेले, तेथेच त्याने आपल्या अनुयायांना उपदेश केला आणि नंतर त्याला वधस्तंभावर चढवले गेले. इतिहासकार डॅन मजार यांनी ‘जेरुसलेम ख्रिश्चन रिव्ह्यू’मध्ये जेरुसलेममधील पुरातत्त्व शोधांची नोंद केली होती. या शोधांनुसार जेरुसलेम या शहराचा ख्रिश्चन धर्माशी संबंध इसवी सनाच्या पहिल्या सहस्रकाच्या शेवटी आला. जेरुसलेमचा ख्रिश्चन धर्माशी कथित संबंध पहिल्या शतकापासून त्या ठिकाणच्या भू- राजनीतीमध्ये स्थित असणे आवश्यक आहे. सन ३२३ पर्यंत कॉन्स्टँटिन हा रोमन जगाचा एकमेव सम्राट झाला होता. तो चर्चवर कट्टर विश्वास ठेवणारा होता, त्याला आशा होती की कालांतराने ख्रिस्ती धर्म त्याच्या दूरच्या साम्राज्यात एकसंध शक्ती ठरेल. त्यावेळेस पॅलेस्टाईनमध्ये ख्रिश्चनांची संख्या कमी असली तरी, हा धर्म स्पष्टपणे एक आकर्षक शक्ती म्हणून उदयास आला होता. कॉन्स्टँटिनने ठरवले की त्याच्या साम्राज्यातील रहिवाशांवर धर्माची सक्ती करण्याऐवजी तो धर्माच्या प्रतिकांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या कार्यक्रमाची बांधणी हातात घेईल. तरीही त्याला याची जाणीव होती की एखाद्या साम्राज्याला धार्मिक पावित्र्य मिळवायचे असेल तर त्याची मुळे भूतकाळात मजबूत असल्याचे दाखवने आवश्यक असते. त्यानुसार, त्याच्या समर्थकांनी ख्रिश्चन धर्म, मोझेसचा धर्म आणि त्याचे वंशज यांच्यात साधर्म्य निर्माण करण्यास सुरुवात केली, ज्यावर एका भौगोलिक प्रदेशात धार्मिक पावित्र्य राखणे आवश्यक होते. ख्रिश्चन साम्राज्याला ऐतिहासिक महत्त्व देण्यासाठी चिन्हे आणि स्मारकांची आवश्यकता आहे हे जाणून कॉन्स्टँटिनने जेरुसलेममध्ये पुरातत्त्व उत्खननाची एक मोठी योजना आखली. काही दिवसांतच जुन्या मंदिराच्या प्लॅटफॉर्मच्या खाली एक दगडी कबर सापडली, जी लगेचच ख्रिस्ताची कबर असल्याचे घोषित करण्यात आली. ख्रिश्चन जगतात हा शोध महत्त्वपूर्ण होता, या शोधामुळे जेरुसलेमला त्यांच्या धर्मशास्त्रीय विश्वास प्रणालीमध्ये स्थान मिळाले.
आणखी वाचा: इस्रायल माझ्या हृदयात आहे, भारत माझ्या रक्तात आहे; भारतातील ज्यू समाज !
मुस्लिमांचे पवित्र शहर
कुराणात जेरुसलेमचा कधीही उल्लेख नसला तरी, हे शहर इस्लामिक श्रद्धेसाठी मजबूत भावनात्मक मूल्य धारण करते. मक्का येथील काबाच्या जागी येण्यापूर्वी मुहम्मद पैगंबरांनी जेरुसलेमच्या दिशेने प्रार्थना केली, अशी इस्लामिक मान्यता आहे. इस्लामच्या स्थापनेपासूनच, ‘अल्लाह’ हा एकच देव मानला जात होता ज्याची ख्रिश्चन आणि ज्यू लोक पूजा करतात. जेव्हा प्रेषित मुहम्मद यांनी आपल्या धर्मांतरितांना अल्लाहची प्रार्थना करण्यास सांगितले तेव्हा त्यांनी अनुयायांना जेरुसलेमच्या दिशेने तोंड करण्यास सांगितले, जे यहूदी आणि ख्रिश्चनांचे आध्यात्मिक केंद्र होते आणि ते मुस्लिमांसाठी देखील तसेच महत्त्वाचे ठरले.
जेरुसलेम हे मुस्लिमांसाठी इस्लामिक अस्मितेचे प्रतीक ठरले. “या शहराने त्यांना एक वेगळी इस्लामिक ओळख निर्माण करण्यास, त्यांच्या पूर्वजांच्या मूर्तिपूजक परंपरांकडे पाठ फिरवण्यास आणि नवीन धार्मिक कुटुंब शोधण्यात मदत केली होती,” असे आर्मस्ट्राँग नमूद करतात. तरीही त्याच वेळी, मुस्लिमांसाठी जेरुसलेम हे ज्यू आणि ख्रिश्चनांनी अनुसरण केलेल्या एकेश्वरवादी धार्मिक परंपरांच्या निरंतरतेचे प्रतीक आहे, ज्यांना ते त्यांचे पूर्ववर्ती मानत होते. त्यानुसार, जेरुसलेममध्ये मुस्लिमांचे आगमन हे एक प्रकारची घरवापसी होती, पूर्वाश्रमी पवित्र मानल्या गेलेल्या त्याच ठिकाणी परत जाण्याचा तो एक मार्ग होता, अशी त्यांची मान्यता होती. पहिले मुस्लिम जेरुसलेममध्ये इसवी सनाच्या सातव्या शतकात आले. ब्रिटिशांनी १९१७ पर्यंत या शहरावर नियंत्रण मिळविले, त्या नंतर विविध मुस्लिम राजवटींनी पुन्हा ते ताब्यात घेतले. परंतु, हे शहर तीन धर्मांमधील वादाचा विषय झाले आणि ब्रिटीशांनी निघून जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर ते धर्माच्या आधारावर विभागले गेले.