नोकरी म्हटलं तर तणाव हा आलाच. परंतु, काही नोकर्‍यांमध्ये बॉसच्या त्रासाने किंवा सहकर्मचार्‍यांच्या त्रासाने कर्मचारी अधिकच तणावग्रस्त होतात. काही नोकर्‍यांमध्ये कामाचा कालावधी वाढत जातो, मात्र पगार तितकाच मिळतो; तर अनेक नोकर्‍यांमध्ये बॉसच्या सततच्या किटकिटीमुळे कर्मचार्‍यांची काम करण्याची इच्छा उरत नाही. अनेकांना तर यामुळे डिप्रेशनचाही सामना करावा लागतो. आपल्या शेजारी राष्ट्र चीनमध्ये याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. मात्र, या तणावाचा सामना करण्यासाठी चिनी तरुणांनी एक अनोखा उपाय शोधून काढला आहे. चीनमध्ये नवा ट्रेंड सुरू झाला आहे; जिथे बॉस, सहकर्मचारी आणि नोकर्‍या सेकंड-हँड ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी ठेवल्या जात आहेत. या नवीन ट्रेंडविषयी सविस्तर जाणून घेऊ.

ई-कॉमर्स वेबसाइटवर बॉस आणि सहकर्मचार्‍यांची विक्री

सध्या ऑनलाइन शॉपिंगची भुरळ सगळ्यांना आहे. एखादी वस्तू विकत घ्यायची असल्यास लोक बाजारात जाण्याऐवजी ऑनलाइन मागवतात. मात्र, आता याचा वापर चिनी कर्मचार्‍यांद्वारे केला जात आहे. चिनी कर्मचारी आपल्या कामाचा तणाव कमी करण्यासाठी जियान्यू आणि अलिबाबा या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विनोदी पद्धतीने नोकरी, बॉस आणि सहकर्मचार्‍यांना विकत असल्याची माहिती साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने आपल्या वृत्तात दिली आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या म्हणण्यानुसार, या ई-कॉमर्स वेबसाइटवर ‘त्रास देणारा बॉस’, ‘वाईट नोकर्‍या’, ‘द्वेष करणारे सहकर्मचारी’ अशी विशेष कॅटेगरी तयार करण्यात आली आहे. त्यांच्या किमती चार ते नऊ लाख रुपयांच्या घरात आहेत.

Police Create Reel with Colleagues
पोलीस अधिकाऱ्याने सहकाऱ्यांबरोबर बनवली Reel, नेटकऱ्यांचे जिंकले मन, पाहा Viral Video
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
pune vada pav crime news
पुणे: गार वडापाव देताच डोके गरम झाले, ग्राहकाची विक्रेत्याला मारहाण
The little boy was studying in the light of the street lamps
याला म्हणतात चांगले कर्म! रस्त्यावरील दिव्यांच्या प्रकाशात अभ्यास करत होता चिमुकला, इन्फ्लुअन्सर तरुणाने केले असं काही… VIDEO एकदा पाहाच
Dolly chaiwala viral videos
‘डॉली चायवाल्या’ने चक्क दुबईमध्ये थाटले नवे ऑफिस; Video पाहून युजर म्हणाला, “डिग्रीला आग…”
Aroh Welankar New Villa
Bigg Boss फेम अभिनेत्याने पुण्यात खरेदी केला आलिशान व्हिला! चाहत्यांना दाखवली पहिली झलक, मराठी कलाकारांनी केलं कौतुक
fraud of One lakh with CME professor in the name of courier
कुरिअरच्या नावाखाली सीएमईच्या प्राध्यापकाची एक लाखांची फसवणूक
Pimpri, Female computer operator bribe, computer operator bribe Female, bribe,
पिंपरी : सहाशे रुपयांची लाच घेताना संगणक चालक महिला अटकेत

हेही वाचा : अभिनेत्री समांथा रूथ प्रभूला अडचणीत आणणारी ‘हायड्रोजन पेरोक्साइड नेब्युलायझेशन’ उपचार पद्धती नेमकी आहे तरी काय?

एका कर्मचार्‍याने तिची नोकरी ९१ हजार रुपयांना विक्रीसाठी ठेवली आहे. तिने असा दावा केला आहे की, या कामासाठी तिला दरमहा ३३ हजार रुपये मिळतात. माझी नोकरी विकत घेतल्यास एकावेळी तीन महिन्यांचे पैसे वसूल होतील, असे ती म्हणाली. दुसऱ्या कर्मचार्‍याने लिहिले, ‘‘मी एका सहकर्मचार्‍याला ३,९९९ युआन (४५,९२५ रुपये) मध्ये विकण्यास इच्छुक आहे. मी तुम्हाला या सहकर्मचार्‍यापासून सुटका कशी मिळवायची हे शिकवू शकतो आणि कामात तुम्ही ‘बळीचा बकरा’ होऊ नये यासाठीच्या १० आवश्यक टिप्सही देऊ शकतो.’’

तिसऱ्या कर्मचार्‍याने आपल्या बॉसलाच विकायला काढले आहे. या कर्मचार्‍याने ‘वाईट बॉस’च्या कॅटेगरीत ५०० युआन (सुमारे ५७४२ रुपये) मध्ये आपल्या बॉसलाच विकायला ठेवले आहे. माझा बॉस सतत किटकिट करतो, माझ्यावर टीका करतो आणि मला सारखा टोकत असतो, त्यामुळे मी खूप मानसिक तणावात असल्याचे, या कर्मचार्‍याने सांगितले.

प्रत्यक्षात खरेदी किंवा विक्री नाहीच

विशेष म्हणजे हे सर्व विनोदांमध्ये केले जात आहे. त्यामुळे विक्रेते खात्री करतात की याचा परिणाम वास्तविक आर्थिक व्यवहारांमध्ये होणार नाही. जर एखाद्या व्यक्तीने खरेदी करण्याची इच्छा जरी व्यक्त केली, तरी विक्रेते कर्मचारी ऑर्डर पूर्णपणे नाकारतात. एका अनोळखी विक्रेत्याने सांगितले, ‘‘माझ्या भावना व्यक्त करण्याचा हा माझा मार्ग आहे, प्रत्यक्षात कोणालाही खरेदी किंवा विक्री करण्याचा कोणताही उद्देश नाही. मी ‘जियान्यू’वर अनेक लोक त्यांच्या नोकऱ्या विकताना पाहिले आणि मला ते मनोरंजक वाटले, म्हणून मीही ते करून पाहिले.’’

ट्रेंडवर ‘जियान्यू’ या ई-कॉमर्स वेबसाइटची प्रतिक्रिया

ट्रेंडला गती मिळाल्यानंतर, जियान्यूने ११ जून रोजी ‘वेबो’वर सांगितले की, लोकांना त्यांच्या संमतीशिवाय विकणे कायद्याच्या विरोधात आहे. हुनान युनायटेड पायोनियर लॉ फर्मचे वकील लियू यान यांनी ‘झीओक्सियांग मॉर्निंग पोस्ट’ला सांगितले की, जर इतर व्यक्तीची वैयक्तिक माहिती, जसे की नावे, आयडी क्रमांक, घराचे पत्ते आणि संपर्क क्रमांक त्यांच्या संमतीशिवाय ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सार्वजनिकपणे उघड केले गेले, तर ते कायद्याच्या विरोधात आहे. चीनमध्ये दुसऱ्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती अनधिकृतपणे उघड केल्यास दंड किंवा कमाल १० दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे.

चीनमधील वर्क कल्चर

गेल्या वर्षी ‘मॅकिन्से हेल्थ इन्स्टिट्यूट’च्या सर्वेक्षणामध्ये ३० राष्ट्रांमधील ३० हजार पेक्षा जास्त कामगारांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणात कर्मचार्‍यांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक आरोग्याचे मूल्यांकन करण्यात आले. या सर्वेक्षणात असे दिसून आले की, या वर्क कल्चरमध्ये काम करण्याची इच्छा तरुण लोक गमावत आहेत. dtcj.com च्या २०२३ च्या सर्वेक्षणानुसार, ९० टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांना ओव्हरटाईमचा सामना करावा लागत आहे, तर ६० टक्के कर्मचारी कधीकधी कामाच्या कालावधीपेक्षा जास्त काम करत आहेत.

शीर्ष तीन पद्धतींमध्ये लॉगआउट केल्यानंतर कामाच्या संदेशांना प्रतिसाद देणे, कंपनीने आयोजित केलेल्या प्रशिक्षणात किंवा स्पर्धांमध्ये भाग घेणे आणि कोणतेही कार्य नियुक्त न करता कोणत्याही वेळी उभे राहणे यांचा समावेश होतो. सर्वेक्षणातील ७३ टक्क्यांहून अधिक लोकांनी सांगितले की, त्यांनी कामाचा भार पूर्ण करण्यासाठी ओव्हरटाईम केले. जागतिक स्तरावर ५० टक्क्यांहून अधिक कामगार कामाच्या निर्धारित वेळेपेक्षा जास्त काम करतात, ज्याला ‘बर्नआऊट’ असेही म्हणतात. त्यामुळे अशा कर्मचार्‍यांची नोकरी सोडण्याची शक्यता तीन पटीने वाढते.

हेही वाचा : लाखोंची ‘Dior’ बॅग तयार होते चार हजारात? कामगारांचं होतंय शोषण; काय आहे बड्या ब्रॅंडमागचे सत्य?

अभ्यासामध्ये समाविष्ट असलेल्या ३० देशांमध्ये, २२ टक्के कामगारांनी कामात त्रास होत असल्याचे सांगितले. अशा ओव्हरटाईमपासून कामगारांचे संरक्षण करण्यासाठी चीनने पूर्वीही कामाच्या वेळेनंतरही ऑनलाइन राहण्यास भाग पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायदेशीर संरक्षण देण्याचा विचार केला होता.