रिपब्लकिन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यात पहिली प्रेसिडेन्शियल डिबेट पार पडली. मात्र, या डिबेटमध्ये जो बायडन यांना म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही, अशी सार्वत्रिक भावना आहे. त्यांचे वाढलेले वय हे त्यामागचे प्रमुख कारण आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन बोलताना बऱ्याचदा अडखळतात आणि चाचपडतात. प्रेसिडेन्शियल डिबेटमध्ये ते मुद्दे मांडण्यामध्ये फिके पडल्याने त्यांची उमेदवारी नाकारली जावी आणि नवा उमेदवार उभा करावा, असा एक मतप्रवाह डेमोक्रॅटिक पक्षामध्ये प्रबळ होऊ लागला आहे.

हेही वाचा : सख्खा भाऊ, पक्का वैरी! उत्तर आणि दक्षिण कोरियामधलं १९५० सालचं युद्ध कधीच का थांबलं नाही?

america election
समोरच्या बाकावरून : आता निवडणुकीचे ट्रम्प प्रारूप?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
electing Donald Trump as the President of the United States for the second time
दुसरे ट्रम्पपर्व आणि भारत
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Loksatta editorial on Donald Trump unique campaign in us presidential election
अग्रलेख: ‘तो’ आणि ‘त्या’!
Loksatta editorial Donald Trump victory in the US presidential election
अग्रलेख: अनर्थामागील अर्थ!
donald trump, US president, narendra modi
विश्लेषण : ‘फिर एक बार ट्रम्प सरकार’… भारताशी संबंध कसे? मोदी ‘कनेक्ट’चा किती फायदा?
Donald Trump won the US presidential election
अमेरिकेत पुन्हा ट्रम्प! अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड; कमला हॅरिस यांचा धक्कादायक पराभव

बायडन यांच्या वयाचा अडथळा

बायडन आणि ट्रम्प यांच्यातील पहिल्या डिबेटमध्ये बायडन यांना फारसा प्रभाव टाकता आला नाही. ट्रम्प यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये असत्य कथन केले असले तरीही त्यांच्या बोलण्यात आत्मविश्वास होता. त्या तुलनेत बायडन यांचे वक्तव्य किंचित कमी पडत होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या शक्तिमान आणि चतुर प्रतिस्पर्ध्याशी मुकाबला करण्यासाठी तब्येतीने ठीकठाक आणि तंदुरुस्त असा उमेदवार असायला हवा, असे अनेक डेमोक्रॅट्सचे मत आहे. त्या पार्श्वभूमीवर बायडन यांची उमेदवारी काढून घेतली जाऊ शकते की काय, अशाही चर्चांना रंगत आली आहे. हे करणे तितकेही सोपे नसले तरीही असे सहा उमेदवार सध्या चर्चेत आहेत; जे बायडन यांची जागा सहजपणे घेऊ शकतात.

१. कमला हॅरिस

बायडन यांच्याऐवजी जर दुसऱ्या कुणाचा उमेदवार म्हणून सर्वांत आधी विचार केला जाऊ शकतो, तर त्या अर्थातच कमला हॅरिस (वय ५९) या सध्या उपराष्ट्राध्यक्षपदावर आहेत. जर बायडन यांनी उमेदवारीचा मार्ग मोकळा केला, तर हॅरिस याच उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असतील. पण मुद्दा असा आहे की, त्यांना मान्यता कमी आहे. “त्या बायडन यांच्या प्रशासनामध्ये आपले स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करू शकल्या नसल्याची टीका त्यांच्यावर वारंवार होते”, अशी माहिती ‘द गार्डियन’ने दिली आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्यासमोर कमला हॅरिस यांचीही उमेदवारी किती चालेल, याबाबतही शंका आहे.

२. ग्रेचेन व्हिटमर

मिशिगनच्या गव्हर्नर ग्रेचेन व्हिटमर (वय ५२) यादेखील बायडन यांची जागा घेऊ शकतात, अशा चर्चा आहेत. त्यांनी २००१ ते २००६ पर्यंत मिशिगन हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये आणि २००६ ते २०१५ पर्यंत मिशिगन सिनेटमध्ये लोकप्रतिनिधित्व केले आहे. ग्रेचेन व्हिटमर या २०१९ मध्ये पहिल्यांदा मिशिगनच्या गव्हर्नर झाल्या होत्या. २०२२ साली त्यांनी पुन्हा एकदा आपले स्थान निश्चित केले. “बंदुकींसंदर्भातील कायदे कडक करणे, गर्भपातावर असलेली बंदी उठविणे व युनिव्हर्सल प्री-स्कूलला पाठिंबा देणे, यावर त्यांचा भर आहे”, अशी माहिती ‘द गार्डियन’ने दिली आहे.

३. गॅविन न्यूजम

बायडन यांच्याऐवजी विचार केला जाऊ शकतो असा आणखी एक उमेदवार म्हणजे गॅविन न्यूजम (वय ५६) होय. न्यूजम यांनी याआधी कॅलिफोर्नियाचे लेफ्टनंट गव्हर्नर आणि सॅन फ्रान्सिस्कोचे महापौर म्हणून काम केले आहे. गेल्या वर्षी त्यांनी कॅलिफोर्नियाव्यतिरिक्त इतर राज्यांतील निवडणुकांमध्ये डेमोक्रॅट्सना पाठिंबा दिला होता. त्यामुळे ते राष्ट्रध्यक्ष होण्यासाठीच छुप्या पद्धतीने रणनीती आखत असल्याचे बोलले जात होते. मात्र, गुरुवारी बायडन आणि ट्रम्प यांच्यामधील डिबेट झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना न्यूजम यांनी बायडन यांची जागा घेत असल्याच्या चर्चांना कमी महत्त्व देत म्हटले, “त्यांना राष्ट्राध्यक्षांचा अभिमान आहे.”

४. जे. बी. प्रित्झकर

इलिनॉयचे गव्हर्नर जे. बी. प्रित्झकर (वय ५९) यांच्याकडेही बायडन यांना पर्याय म्हणून बरेचदा पाहिले गेले आहे. ते स्वत: महत्त्वाकांक्षी आहेत आणि धनिष्ठही आहेत. प्रित्झकर कुटुंबीयांकडे ‘हयात’ हॉटेल चेनची मालकी आहे. इलिनॉयचे गव्हर्नर असताना आपल्या कार्यकाळात गर्भपातासंदर्भातील महिलांना उपयोगी पडतील अशा तरतुदी त्यांनी अमलात आणल्या.

हेही वाचा : विश्लेषण : ट्रॉफींचा दुष्काळ ते ट्वेन्टी-२० जगज्जेतेपद… विराट कोहलीचे योगदान या प्रवासात किती महत्त्वाचे?

५. जोश शापिरो

जोश शापिरो हे २०२२ पासून पेनसिल्व्हेनियाचे गव्हर्नर राहिले आहेत. त्यांनी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये चार वेळा; तर माँटगोमेरी काउंटीचे आयुक्त म्हणून दोन वेळा कामकाज पाहिले आहे. फ्रँकलिन आणि मार्शल कॉलेजच्या सर्वेक्षणानुसार एप्रिल २०२४ पासून त्यांना राज्यात ५४ टक्के मान्यता आहे. अगदी नोंदणीकृत २९ टक्के रिपब्लिकन्सनीही त्यांना मान्यता दिली आहे, अशी माहिती फायनान्शियल टाइम्सने दिली आहे.

६. डीन फिलिप्स

मिनेसोटा काँग्रेसचे सदस्य डीन फिलिप्स यांनी या वर्षाच्या सुरुवातीपासूनच बायडेन यांना आव्हान देणे सुरू केले. त्यांना थोडाफार पाठिंबा मिळाला असला तरीही संपूर्ण पक्षामध्ये त्यांना अद्याप मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे फिलिप्स या शर्यतीतून तसे बाहेर पडल्यासारखे आहेत. मात्र, जर बायडन स्वत:च आपली उमेदवारी मागे घेत असतील, तर त्यांची जागा घेणाऱ्या इच्छुकांमध्ये फिलिप्स यांचे नाव नक्कीच आघाडीवर असेल.