डेमोक्रॅटिक पक्षाचा मेळावा ऑगस्ट महिन्यात शिकागो येथे होत आहे. यात कमला हॅरिस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते. मात्र याविषयी अद्याप थोडी अनिश्चितता आहे. हॅरिस यांचे नाव जाहीर करण्याऐवजी पुन्हा एखादी पक्षांतर्गत निवडणूक घेण्याविषयी डेमोक्रॅटिक नेते ठरवू शकतात.अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून काहीशी अपेक्षित माघार घेतली. भारतीय वेळेनुसार रविवारी रात्री उशिरा त्यांनी समाजमाध्यमांवर माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर, अध्यक्षीय निवडणुकीसाठी विद्यमान उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना पाठिंबा जाहीर केला. दोनच दिवसांपूर्वी रिपब्लिकन पक्षाने माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध कमला हॅरिस अशी थेट निवडणूक होण्याची शक्यता आहे. 

बायडेन यांनी माघार का घेतली?

२७ जून रोजी अटलांटातील सीएनएन वृत्तवाहिनीच्या स्टुडिओमध्ये जो बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात पहिली अध्यक्षीय वादचर्चा (डिबेट) झाली. या चर्चेमध्ये ८१ वर्षीय बायडेन अनेकदा अडखळले. त्यांना अनेक मुद्द्यांवर आपले वाक्यही पूर्ण करता येत नव्हते. मेडिकेअर, स्थलांतरण, गर्भपात अशा कळीच्या मुद्द्यांवर त्यांची भूमिका पुरेशी आत्मविश्वासपूर्ण नव्हती. त्यांच्या तुलनेत डोनाल्ड ट्रम्प हे रेटून खोटेदेखील अधिक आत्मविश्वासपूर्ण आणि सहजरीत्या बोलले. बायडेन यांच्या त्या थरथरत्या आणि अडखळत्या कामगिरीनंतर डेमोक्रॅटिक मतदार, पदाधिकारी, ज्येष्ठ नेते हादरले. बायडेन यांना अध्यक्षपदाची दुसरी टर्म मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या झेपेल का, अशी शंका गेली दोन वर्षे व्यक्त केली जात होती. या शंकेला आणि कुजबुजीला मोकळी वाट बायडेन यांच्या वादचर्चेतील सुमार कामगिरीने करून दिली. प्रथम महत्त्वाचे पदाधिकारी, नंतर प्रभावी हितचिंतक आणि देणगीदार आणि अखेरीस नॅन्सी पलोसी आणि बराक ओबामा यांच्यासारख्या अतिवरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केलेल्या इच्छेची दखल बायडेन यांना घ्यावी लागली आणि त्यांनी शर्यतीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला.  

On Friday Rahul Gandhi spoke with Prakash Ambedkar he said he will campaign against his candidate
‘तुमच्या उमेदवाराच्या…’ॲड. प्रकाश आंबेडकर व राहुल गांधींमध्ये नेमकी काय चर्चा
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Panvel issue of commuters loot of passengers Panvel,
पनवेल : प्रवाशांच्या समस्यांचा मुद्दा प्रचारातून गायब, रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट, असुरक्षित प्रवासाबाबत सर्वपक्षीय नेते गप्पच
Devendra Fadnavis, Sandeep Naik, Khairane MIDC office,
फडणवीस यांचे संदीप नाईकांना आव्हान, खैरणे एमआयडीसी कार्यालयात पत्रकार परिषद
Kishore Jorgewar expressed his displeasure with Sudhir Mungantiwar front of Devendra Fadnavis
थेट फडणवीसांसमोरच जोरगेवारांनी व्यक्त केली मुनगंटीवारांवर जाहीर नाराजी… म्हणाले, “मला उमेदवारी मिळू नये म्हणून…”
Devendra Fadnavis , Ravi Rana, Mahavikas Aghadi,
विरोधकांच्या डोक्‍याचे नट कसण्‍यासाठी मी राणांचा पाना… फडणवीसांकडून जोरदार….
maharashtra assembly election 2024 rohit pawar s reply to mahesh landge in bhosari assembly constituency
पिंपरी : धमक्या देऊ नका, आम्ही राजकारणात गोट्या खेळण्यास आलो नाहीत; रोहित पवार यांचे महेश लांडगे यांना प्रत्युत्तर
Devendra Fadnavis will contest from Nagpur South West assembly constituency print politics news
लक्षवेधी लढत: देवेंद्र फडणवीस यंदाही गड राखणार !

हेही वाचा >>>विश्लेषण : भारत-मॉरिशस विरुद्ध ब्रिटन-अमेरिका… भारताने मॉरिशसला पाठिंबा दिलेल्या शॅगोस बेटाचा वाद काय आहे?

यापूर्वी कोणत्या अध्यक्षाने घेतली होती माघार?

१९६८मध्ये लिंडन जॉन्सन यांनी अशा प्रकारे माघार घेतली होती. लिंडन जॉन्सन त्यावेळी अध्यक्ष असताना अमेरिकेत विविध मुद्द्यांवर उग्र आंदोलने सुरू होती. व्हिएतनाम युद्धाच्या मुद्द्यावर जॉन्सन प्रशासनाविरुद्ध जनतेचा मोठा रोष होता. अत्यंत अस्थिर आणि असुरक्षित वातावरणात लिंडन जॉन्सन यांना अमेरिकेत फिरणेही मुश्किल झाले होते. जनतेच्या भावनांची दखल घेत अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक दुसऱ्यांदा न लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला.  

ट्रम्प यांच्यावरील हल्ला निर्णायक?

१३ जुलै रोजी पेनसिल्वेनियातील बटलर येथे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला, ज्यात ते थोडक्यात बचावले. या घटनेनंतर ट्रम्प यांना सहानुभूतीचा फायदा मिळणार, अशी भीती डेमोक्रॅटिक पक्ष धुरिणांना वाटू लागली. काही दिवसांपूर्वी मिलवॉकी येथे रिपब्लिकन पक्षाच्या मेळाव्यात ट्रम्प यांना ज्या प्रकारे प्रचंड पाठिंबा मिळाला आणि ज्या सहजपणे त्यांना अध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली, ती पाहिल्यानंतर ट्रम्प-बायडेन लढत डेमोक्रॅटिक पक्षाला अधिकच जड जाणार, याविषयी त्या पक्षाच्या नेतृत्वाला खात्री वाटू लागली. बायडेन यांना तशात कोविड झाला. तेव्हा त्यांनी अधिक शारीरिक आणि मानसिक ताण सोसणे योग्य ठरणार नाही, असे अधिकाधिक नेते म्हणू लागले होते. पण ट्रम्प यांच्यावरील गोळीबाराने बायडेन यांच्यावरील दबाव अधिक वाढला, हे नक्की.

हेही वाचा >>>भारताच्या अर्थसंकल्पाबाबत काही रंजक गोष्टी…

देणगीदारांचा दबाव… 

बायडेन फियास्कोनंतर डिस्नी समूहाच्या वारस अबिगेल डिस्नी यांनी डेमोक्रॅट पक्षाची मदत, विशेषतः बायडेन यांच्या प्रचारासाठीची मदत रोखून धरण्याची घोषणा केली. बायडेन लढले, तर हरतील असे अबिगेल डिस्नी यांनी थेटच सांगितले. वॉल स्ट्रीटवरील अनेक प्रभावशाली बँकर्स, फंड मॅनेजर्स, सीईओ हे सध्या परस्परांशी डेमोक्रॅटिक पक्षाच्या निधीबाबत चर्चा करू लागले होते. ब्लॅक रॉक या फंड कंपनीचे लॅरी फिंक, ब्लॅक स्टोनचे जॉन ग्रे, लाझार्डचे पीटर ऑर्सझॅग, सेंटरव्ह्यू पार्टनर्सचे ब्लेयर एफ्रन अशी काहींची नावे सांगितली जातात. अनेक माध्यम कंपनी चालकांनी, प्रभावी व्यक्तींनी बायडेन यांना माघार घेण्याची विनंती केली होती. यात प्रसिद्ध अभिनेता-निर्माता जॉर्ज क्लूनी, नेटफ्लिक्सचे रीड हेस्टिंग्ज, आयएसीचे बॅरी डिलर, हॉलिवुड दिग्दर्शक रॉब रायनर, पटकथा लेखक डॅमन लिंंडेलॉफ यांचा समावेश आहे.   

कमला हॅरिस यांची उमेदवारी नक्की?

बायडेन यांनी माघार घेताना आपल्या सहकारी किंवा रनिंग मेट कमला हॅरिस यांना पाठिंबा जाहीर केला. डेमोक्रॅटिक पक्षाचा मेळावा ऑगस्ट महिन्यात शिकागो येथे होत आहे. यात हॅरिस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते. मात्र याविषयी अद्याप थोडी अनिश्चितता आहे. हॅरिस यांचे नाव जाहीर करण्याऐवजी पुन्हा एखादी पक्षांतर्गत निवडणूक घेण्याविषयी डेमोक्रॅटिक नेते ठरवू शकतात. तसे झाल्यास हॅरिस यांना इतर प्रतिस्पर्ध्यांकडून आव्हान मिळू शकते.