“Often, as I wandered from meeting to meeting, I spoke to my audiences of this India of ours, of Hindustan and of Bharata, the old Sanskrit name derived from the mythical founders of the race.”

असे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘The discovery of India’ या आपल्या ग्रंथात नमूद केले आहे. पंडित नेहरू यांनी लिहिलेला हा ग्रंथ ब्रिटिश राजवटीतून मुक्त होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या भारत देशाच्या सांस्कृतिक इतिहासावर प्रकाशझोत टाकतो. याच ग्रंथात नेहरू यांनी भारताच्या ‘भारत, हिंदुस्थान, इंडिया’ या तीन नावांचा उल्लेख केलेला आहे. भारताचे वर्णन असलेल्या या ग्रंथात पंडित नेहरू यांनी भारतभूमीचे वर्णन करणाऱ्या विविध नावांची दखल घेतली होती. नेहरूंचा हा ग्रंथ प्रकाशित झाल्यानंतर चार वर्षांनी, स्वतंत्र भारताची राज्यघटना अस्तित्वात आली. राज्यघटनेच्या पहिल्या कलमात, नेहरूंनी नमूद केलेल्या इंडिया, भारत, हिंदुस्थान या देशाच्या तीन नावांपैकी एक नाव वगळले आहे. आणि इथूनच भारताच्या नावावरून नव्या वादाची सुरुवात झाली …. भारताविषयीचा राज्यघटनेतील उल्लेख “India, that is Bharat, shall be a union of states’ असा करण्यात आला आहे. म्हणजेच भारताचा ‘हिंदुस्थान’ हा जुना उल्लेख वगळण्यात आला.

Solapur jowar crops loksatta news
सोलापूर : ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीचा पेरा निम्म्यावर, लांबलेल्या पावसाचा परिणाम
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Announcements of organic natural farming Know how much the use of urea and other fertilizers has increased Mumbai news
सेंद्रीय, नैसर्गिक शेतीच्या फक्त घोषणाच; जाणून घ्या, युरियासह अन्य खतांचा वापर किती वाढला
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
43 ministers maharashtra
विश्लेषण : महाराष्ट्रात ४३ मंत्रीच? मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या किती असते? या संख्येवर बंधने का असतात?
mamata banerjee latest marathi news
विश्लेषण : ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व ममतांकडे? राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसच्या स्थानाला धक्का…
centre attempts to revive farm reforms unveils draft policy
शेतीमालाच्या विक्री धोरणाबाबत केंद्राची पुन्हा घाई; सूचना, हरकतींसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी
After soybeans price of cotton become big issue for farmers in Vidarbha
विदर्भात कापसाचे अर्थकारण विस्‍कळीत

सात दशकांहून अधिक काळ लोटल्यानंतरही देशाचे नामकरण, पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून भारताच्या ‘इंडिया’ या नावावर आक्षेप घेण्यात आलेला आहे. इंडिया हे नाव वसाहतकार इंग्रजांनी दिल्याने, ते गुलामगिरीचे द्योतक आहे; असा युक्तिवाद भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळेच भाजपाच्या प्रचाराच्या विरोधात देशातील सर्व पक्षीय विरोधक एकत्र आले असून त्यांनी ‘Indian National Democratic Inclusive Alliance (INDIA)’ नामक आघाडी स्थापन केली आहे. त्यामुळे पुन्हा भारताचे नामकरण हा वादाचा मुद्दा ठरला आहे. याच पार्श्वभूमीवर भारताच्या वेगवेगळ्या नावांच्या इतिहासाचा आढावा घेणे समयोचित ठरावे.

अधिक वाचा: विश्लेषण: भगवान हनुमान थायलंडचे मॅस्कॉट कसे ठरले? 

यापूर्वीचे वाद

‘भारत की इंडिया’ हा वाद काही नवा नाही. यापूर्वी गाजलेल्या प्रकारणांमध्ये दिल्लीस्थित ‘नमा’ नावाच्या एका व्यावसायिकाने दाखल केलेली याचिका महत्त्वाची ठरते. या याचिकेत घटनेच्या कलम १ मध्ये सुधारणा करण्याविषयी मागणी करण्यात आली होती. त्या संदर्भात “इंग्रजी नाव काढून टाकणे हे प्रतिकात्मक आहे, असं केल्यामुळे आपल्या स्वतःच्या राष्ट्रीयतेबद्दल, विशेषत: येणाऱ्या पिढ्यांसाठी अभिमानाची भावना निर्माण होईल” असा युक्तिवाद करण्यात आला होता. इंडिया शब्दाच्या जागी भारत हा शब्द आपल्या पूर्वजांनी स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्याची नेहमीच आठवण करून देईल,” असा दावा या याचिकेत करण्यात आला होता. नामकरणाचे राजकारण हे या राष्ट्राच्या सामाजिक समीकरणाचा भाग आहे. त्याच्या प्रक्रिया व्यापक सामाजिक-राजकीय परिस्थितीनुसार आकार घेतात. याविषयावर अधिक खोलवर अभ्यास केला जावू शकतो.

‘इंडिया , म्हणजे भारत पण हिंदुस्थान नाही..

सामाजिक शास्त्रज्ञ कॅथरीन क्लेमेंटिन-ओझा, यांनी आपल्या लेखात , ‘इंडिया , म्हणजे भारत… ही एकाच देशाची दोन नावे आहेत, असे नमूद केले आहे. असे असले तरी इंडिया, भारत आणि हिंदुस्तान या तीन सर्वात सामान्य नावांव्यतिरिक्त – दक्षिण आशियाई उपखंडांत भारतासाठी इतर काही वेगळी नामविशेषणे देखील वापरली जातात, या नावांचा वापर वेगवेगळ्या कालखंडात, वेगवेगळ्या राजवटींच्या काळात निर्माण झाला, या नावांच्या उत्पत्ती मागे भौगोलिक कारणे देखील समाविष्ट आहेत. परिणामी, जेव्हा देशाची राज्यघटना तयार केली जात होती, त्या वेळेस देशाच्या बहुसांस्कृतिक, ज्वलंत लोकसंख्येच्या भावनांना प्राधान्य देवून देशाचे नामकरण करण्याबाबत वाद निर्माण झाला होता. म्हणूनच राज्यघटनेतून ‘हिंदुस्थान’ हे नाव वगळण्यात आले होते.

इतिहासातील भारताची इतर काही नावे

१. मेलूहा

आज आपण भौगोलिकदृष्ट्या, ज्या भूप्रदेशाला भारत म्हणून संबोधले जाते, त्याच्या विद्यमान सीमा पूर्वी अस्तित्त्वात नव्हत्या. परंतु त्या पलीकडे भारत हा वेगळ्या नावांनी ओळखला जात होता. त्याच प्राचीन नावांच्या यादीतील एक नाव म्हणजे ‘मेलूहा’. मेलूहा हे नाव प्राचीन सिंधू संस्कृती संदर्भात वापरले जात होते. सिंधू संस्कृतीशी समकालीन संस्कृती असलेल्या मेसोपोटेमिया या संस्कृतीच्या प्राचीन शिलालेखांमध्ये मेलुहाचा उल्लेख सिंधू संस्कृतीसाठी पर्यायाने भारतासाठी केलेला आढळतो. मेसोपोटेमिया संस्कृतीत सापडलेल्या अभिलेखाचा कालखंड हा इसवी सनपूर्व ३००० वर्षांपूर्वीचा आहे. म्हणजेच इसवी सनपूर्व ३००० वर्षांपूर्वी भारताला ‘मेलूहा’ म्हणून ओळखले जात होते. प्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ मधुकर केशव ढवळीकर यांनी नमूद केल्याप्रमाणे मेलूहा हा शब्द तांब्यासाठी वापरला जात असावा, भारतातून त्या काळी मेसोपोटेमिया आणि इतर समकालीन संस्कृतींमध्ये तांब्याची निर्यात होत होती. सुमेरियन आणि अक्कडियन अभिलेखांमध्ये मेलुहाकडून आयात केल्या गेलेल्या लाकूड , कार्नेलियन आणि हस्तिदंत यांचाही उल्लेख आहे. मेलूहा हे जरी सर्वात ज्ञात जुने नाव असले तरी सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासासोबत मेलूहा हे नाव खुद्द भारतीयांच्याही विस्मरणात गेले.

अधिक वाचा: हिंदू पंचांगाप्रमाणे येणारा अधिक मास कसा ठरतो?

२. भारत

‘भारत’, ‘भरत’ किंवा ‘भारतवर्ष’ हे भारतीय संविधानाने निर्धारित केलेल्या दोन नावांपैकी एक आहे. या नावाचे मूळ पौराणिक साहित्यात तसेच हिंदू महाकाव्य, महाभारतात सापडते, असे असले तरी आधुनिक काळात देखील या नावाची लोकप्रियता जनमानसावर आहे. किंबहुना भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात भारत, भारतमाता याच नावाने लोकांना एकसंघ ठेवले होते. पुराणांनुसार शकुंतला आणि दुष्यंत यांचा मुलगा भरत राजाच्या नावावरून भारत हे नाव आले आहे.

भारताचे भौगोलिक संदर्भ

भौगोलिकदृष्ट्या, पुराणांमध्ये भारताचा उल्लेख ‘दक्षिणेतील समुद्र आणि उत्तरेला बर्फाचे निवासस्थान’ यांच्यामध्ये वसलेला प्रदेश म्हणजे भारत असा आला आहे. भारताचा आकार आणि परिमाणे वेगवेगळ्या प्राचीन ग्रंथांमध्ये भिन्न आहेत. अभ्यासकांच्या मते भारत हा राजकीय किंवा भौगोलिक नसून धार्मिक आणि सामाजिक-सांस्कृतिक घटक होता.

३. आर्यावर्त

मनुस्मृती मध्ये भारतासाठी ‘आर्यावर्त’ ही संज्ञा वापरण्यात आलेली आहे. मनुस्मृतीमध्ये नमूद केल्याप्रमाणे ‘आर्यावर्त’ ही उत्तरेकडील हिमालय आणि दक्षिणेकडील विंध्य पर्वतरांगांमधील इंडो-आर्यांनी व्यापलेली भूमी आहे .

४. जंबुद्वीप

‘जंबुद्वीप’ हे नाव भारत देशासाठी अनेक वैदिक ग्रंथांमध्ये आढळते, याशिवाय आग्नेय आशियाई देशांमध्ये भारतीय उपखंडाचे वर्णन करताना जंबुद्वीप हीच संज्ञा वापरली गेली होती. पौराणिक संदर्भानुसार सात बेटांच्या केंद्र स्थानी जे बेट आहे त्याला जंबुद्वीप असे म्हणतात.

अधिक वाचा: विश्लेषण : भारतात टोमॅटो आला कुठून ? केव्हा ?

५. नाभिवर्ष

जैन साहित्यात भारतासाठी ‘नाभिवर्ष’ ही संज्ञा वापरली गेली आहे. “राजा नाभी हे ऋषभनाथांचे (पहिले तीर्थंकर) वडील आणि भरतांचे आजोबा होते,” त्यामुळे जैन साहित्यात भारताला नाभिवर्ष संबोधले आहे.

६. हिंदुस्थान

इसवीसन पूर्व पाचव्या शतकात पर्शियन साम्राज्याच्या डरायस या राजने सिंधू नदीच्या खोऱ्यात अधिपत्य स्थापन केले होते. त्याच्या इराण मधील शिलालेखात तो या भागाचा उल्लेख ‘हिंदुश’असा करतो. हिंदुश हा भाग सिंधू नदीच्या खोऱ्यात असल्याचे ही तो नमूद करतो. जुन्या पर्शियन भाषेत ‘स’ चा उच्चार ‘ह’ करत असल्याने, सिंधू नदीचा उल्लेख हिंदू असा करण्यात आला होता. आणि नदीच्या सभोवतालच्या प्रदेशाचा उल्लेख हिंडस असा करण्यात आला. त्यामुळेच सिंधूचे हिंदू झाले; त्यापुढे ‘स्थान’ हे प्रत्यय लागून ‘हिंदुस्थान’ नाव तयार झाले. पुढे हा सिंधूचा प्रदेश आयोनियन ग्रीकांच्या ताब्यात आला, यांनी या भागाचा उल्लेख ‘इंडोस’ असा केला. आयोनियन ग्रीक भाषेत शब्दाच्या सुरुवातीस असलेल्या ‘ह’ चा उच्चार करत नाहीत. जुन्या पर्शियन भाषेत सिंधूच्या परिसरात राहणाऱ्यांना ‘हिंदूय’ असे म्हणत, तर ग्रीक भाषेत ‘इंडोई’ असे म्हणत होते.

नंतरच्या काळात रोमन लोकांनी सिंधू नदीला इंडस हा शब्द वापरला, प्रदेशाला इंडिया तर येथील लोकांसाठी इंडियन या संज्ञा वापरल्या. प्रसिद्ध इतिहासकार ‘हिरोडोटस’ याने पर्शियन साम्राज्याबद्दल नमूद केले होते, त्याने नमूद केल्याप्रमाणे पर्शियन राज्य इंडस , इंडोस या भागात पसरलेले होते. या भागात राहणारे लोक वेगवेगळ्या भाषा बोलतात असेही तो नमूद करतो. सिंधू नदीच्या जवळ असलेल्या थार वाळवंताबद्दलही तो नमूद करतो. पुढे मॅगेस्थेनिसने भारताबद्दल वर्णन केलेल्या ग्रंथाला ‘इंडिका’असे नाव दिले. त्यामुळेच ग्रीक, रोम यांच्या पासूनच भारताची ओळख इंडिया अशी झाली होती. किंबहुना हिंदुस्थान ही संज्ञा अरबांनी प्रथम वापरली नसून इसवी सनाच्या दुसऱ्या शतकातील सासनीयन साम्राज्याच्या शापूर पहिला याने हिंदुस्थान हा शब्द पहिल्यांदा वापरला.अरबांच्या दस्तऐवजांमध्ये भारतासाठी अल-ए-हिंद ही संज्ञा वापरण्यात आली आहे. चीनच्या प्राचीन दस्तऐवजांमध्ये शेंदू, इंडू , यिंडू यासारख्या संज्ञा भारतासाठी वापरल्याचे संदर्भ मिळतात.

१६ व्या शतकापर्यंत, ‘हिंदुस्थान’ हे नाव जास्त प्रचलित झाले होते, बहुतांश आशियायी देशांमध्ये हिंदुस्थान हे नाव भारतासाठी वापरले जात होते. मध्ययुगीन कालखंडात मुघलांच्या अधिपत्यामुळे हिंदुस्थान हा प्रदेश मुघलांचा म्हणून ओळखला जात होता. किंबहुना काही अभ्यासकांच्या मते भारत हा शब्द अधिकृतरित्या १८ व्या शतकाच्या उत्तरार्धापासून ब्रिटीश नकाशांमध्ये वापरण्यास सुरुवात झाली होती. एकूणच इंडिया हे नाव इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकापासून प्रचलित असल्याचे दिसते. म्हणूनच इंडियाच्या शोधात निघालेला कोलंबस हा अमेरिका खंडात जावून पोहचला. आणि इंडियाचा शोध लागला म्हणून त्याने नव्या शोधलेल्या भागाला ‘इंडिया’ हे नाव दिले.

स्वतंत्र भारताच्या नावाची चर्चा

देशाच्या स्वातंत्र्यानंतर, संविधान सभेने २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना केली. त्यानंतर, ‘name and territory of the Union’ हा विभाग १७ सप्टेंबर १९४९ रोजी चर्चेसाठी घेण्यात आला. त्यावेळी इंडिया म्हणजे भारत राज्यांचा संघ असेल’ असा पहिला लेख वाचला गेला; तेव्हापासूनच इंडिया की भारत अशा वादाला सुरुवात झाली. फॉरवर्ड ब्लॉकचे सदस्य हरी विष्णू कामथ यांनी सुचवले कीआधी ठरवा ‘भारत’ असेल की इंग्रजी भाषेतील इंडिया. दुसरीकडे सेठ गोविंद दास, यांनी नमूद केले की भारत हा देश परदेशात इंडिया म्हणून ओळखला जातो. संयुक्त प्रांतातील पहाडी जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हरगोविंद पंत यांनी स्पष्ट केले की, उत्तर भारतातील लोकांना ‘भारतवर्ष हवे आहे आणि दुसरे काही नको’. इंडिया हा शब्द गुलामगिरीचे प्रतिनिधित्त्व करते असेही यांच्याकडून नमूद करण्यात आले होते. अशा प्रकारे हिंदुस्तान हा शब्द वगळून इंडिया आणि भारत हे दोन शब्द देशवाचक म्हणून वापरण्याचा निर्णय झाला.

Story img Loader