Jumped deposit scam घोटाळेबाज फसवणुकीसाठी नवनवीन युक्त्या वापरत आहेत. हे सायबर चोरटे लोकांचा पैसा लुटण्यासाठी वेगवेगळे तंत्रे अवलंबताना दिसतात. सध्या सायबर चोरट्यांच्या यूपीआय घोटाळ्याने नागरिकांची डोकेदुखी वाढवली आहे. युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच यूपीआय हा भारतातील डिजिटल पेमेंटचा सर्वांत लोकप्रिय मार्ग ठरला आहे. नेमका याचाच गैरफायदा घेत लोकांची फसवणूक केली जात आहे. ‘यूपीआय’द्वारे व्यवहार अमलात आणताना सावधगिरी बाळगली नाही, तर मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. चर्चेत असणारा जंप्ड डिपॉझिट स्कॅम काय आहे? लोक अशा घोटाळ्यांना कसे बळी पडतात? काय सावधगिरी घ्यायला हवी? त्याविषयी जाणून घेऊ.

जंप्ड डिपॉझिट स्कॅम नक्की काय आहे?

घोटाळेबाजांनी यूपीआय वापरकर्त्यांना लक्ष्य करण्यासाठी नवीन स्कॅम सुरू केला आहे. घोटाळेबाज तुमच्या बँक खात्यात थोडेसे पैसे पाठवतात. त्यामुळे लोकांचा उत्साह वाढतो आणि पैसे कुठून आले आहे हे जाणून घेण्यासाठी ते बँकिंग अॅप उघडतात. परंतु, हा तुम्हाला जाळ्यात अडकवण्यासाठी लावलेला एक सापळा असू शकतो. तुमच्या बँक खात्यात पैसे पाठवण्याबरोबरच हे ठग तुम्हाला विड्रॉअल रिक्वेस्टदेखील पाठवतात; ज्याची रक्कम खूप जास्त असते. जेव्हा लोक त्यांचा पिन टाकून बँक अकाउंटचा बॅलन्स चेक करतात, तेव्हा वापरकर्त्याकडून नकळत त्या ठकाने पाठवलेली पैसे काढण्याची विनंती स्वीकारली जाते.

Gautam Gambhir Wants Yashasvi Jaiswal As Next India Captain After Rohit Sharma at loggerheads with Ajit Agarkar
India Next Captain: ऋषभ पंत नाही २३ वर्षीय युवा खेळाडू भारताचा भावी कर्णधार? कोचने केली निवड; गंभीर-आगरकरमध्ये मतभेद
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Mahakumbh Mela 2025
Mahakumbh Mela 2025: स्वतंत्र भारताच्या पहिल्या महाकुंभाकडून काय शिकवण मिळाली? १९५४ च्या प्रयागराज महाकुंभाचा इतिहास काय सांगतो?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Amit Thackeray on Eknath Shinde
Amit Thackeray : “धनुष्यबाण आणि पक्षनाव घेऊन एकनाथ शिंदेंनी चूक केली”, शिवसेनेतील बंडखोरीवरील अमित ठाकरेंची प्रतिक्रिया चर्चेत!
china super rich numbers declining
‘या’ देशातील श्रीमंत लोक देश सोडून का जात आहेत? श्रीमंतांच्या संपत्तीत घट होण्याचे कारण काय?
Manoj Jarange News
Manoj Jarange : “मराठे निवडणूक लढवणार नाहीत, कारण एका जातीवर…”; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
Election Commission, maharashtra Director General of Police, Rashmi Shukla
विश्लेषण : पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना अखेर निवडणूक आयोगाने का हटविले?

हेही वाचा : सामरिक महत्त्व असलेल्या ‘झेड मोढ’ बोगद्याचं पंतप्रधान मोदींकडून उद्घाटन; याचे वैशिष्ट्य आणि फायदे काय?

लोक अशा घोटाळ्यांना का बळी पडतात?

तज्ज्ञ म्हणतात की, लोक विविध कारणांमुळे अशा ऑनलाइन घोटाळ्यांना बळी पडू शकतात.

सायबर चोरटे लोकांचा पैसा लुटण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत आहेत. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

घोटाळा करण्यासाठी विश्वास निर्माण करणे

फ्रॉड टूल्स ॲण्ड बायोमेट्रिक सेवा प्रदाता कंपनी ‘JuicyScore’चे बिझनेस डेव्हलपमेंटचे प्रमुख मनीष ठकवानी म्हणतात, “यूपीआय कसे कार्य करते आणि त्याच्या पेमेंट विनंत्या कशा कार्य करतात याबद्दल जागरूकता नसल्यामुळे या प्रकारच्या फसवणुकीला लोक बळी पडतात. घोटाळेबाज वापरकर्त्याच्या खात्यात पैसे हस्तांतरित करून विश्वासार्हता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि नंतर भावनिक डावपेच वापरून असे व्यवहार करण्यास घाई करतात. असोसिएशन ऑफ सर्टिफाइड फायनान्शियल क्राइम स्पेशलिस्ट (ACFCS)चे कार्यकारी सदस्य शेतल आर. भारद्वाज म्हणतात की, ही फसवणूक कुतूहल, विश्वास व डिजिटल पेमेंटबद्दल जागरूकतेच्या अभावाचा गैरफायदा घेऊन केली जाते.

छोटी रक्कम पाठवून मोठ्या रकमेची चोरी

फसवणूक मुळात अतिशय सोपी आहे. याची सुरुवात फसवणूक करणाऱ्याने तुम्हाला पैसे जमा करण्याची विनंती पाठवण्यापासून होते. या विनंतीचा पाठपुरावा एक तर कॉल किंवा एसएमएसद्वारे केला जातो, ज्यात तुम्ही काही बक्षीस किंवा इतर सबबी जिंकल्याचा दावा केला जातो. या घोटाळ्यात पाठवण्यात येणाऱ्या विनंत्या एक भ्रम निर्माण करतात, ज्यामुळे अनेक लोक नकळत याला बळी पडतात. फसवणूककर्ता हे गृहीत धरून अशा हुशारीने चाल खेळतो की, वापरकर्ता पैसे गोळा करणे आणि पैशाची सूचना प्राप्त करणे यात फरक करू शकणार नाही.

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, पैसे मिळविण्यासाठी यूपीआय पिन प्रविष्ट करणे कधीही आवश्यक नसते. असोसिएशन ऑफ सर्टिफाइड फायनान्शियल क्राइम स्पेशलिस्टचे ‘MENA Chapter’चे अध्यक्ष व ‘The Fraud Fellas’ अँटी-फ्रॉड फोरमचे होस्ट अनिस अहमद यांच्या मते, “ही फसवणूक प्रामुख्याने कार्य करते. कारण- यात मानवी मानसशास्त्र जसे की आपली उत्सुकता, विश्वास व निकड यांचा गैरफायदा घेतला जातो.”

“फसवणूक करणारा अनेकदा बनावट; पण खात्रीशीर वाटेल अशा कथेद्वारे निकडीची भावना निर्माण करतो (उदा. “मी चुकून तुम्हाला पैसे पाठवले,” “मला हे पैसे तातडीने परत हवे आहेत”). या दबावामुळे पीडित पुरेसा विचार न करता त्वरित कृती करण्यास प्रवृत्त होतात. तांत्रिक यूपीआय व्यवहारांचे पैलू आणि एकाच वेळी पेमेंटची विनंतीदेखील गोंधळ निर्माण करू शकते. विशेषत: प्लॅटफॉर्मशी कमी परिचित असलेल्या व्यक्तींसाठी,” असे अहमद म्हणतात. अहमद पुढे सांगतात की, लोक त्यांच्या खात्यांमध्ये अनपेक्षित ठेवीबद्दल स्वाभाविकपणे उत्सुक असतात.
अहमद पुढे म्हणतात की, या घोटाळ्यांमध्ये सामान्य मानवी प्रवृत्ती आणि विश्वासाचा गैरफायदा घेतला जातो. ते म्हणतात, “आर्थिकदृष्ट्या जाणकार आणि मेहनती व्यक्तीदेखील चांगल्या प्रकारे तयार केलेल्या घोटाळ्याच्या सापळ्याला बळी पडू शकतात; विशेषत: जेव्हा ते या मानसिक घटकांवर आधारित असतात.”

अशा घोटाळ्यांपासून स्वतःचे रक्षण कसे करू शकता?

प्रथम व सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या बँक खात्यातील कोणत्याही अनपेक्षित व्यवहाराबद्दल तुम्हाला शंका यायलाच हवी किंवा असे काही व्यवहार करताना दोनदा विचार करायला हवा., असे मनीष ठकवानी म्हणतात. “मी ग्राहकांना अनपेक्षित ठेवींबद्दल साशंक राहण्याचा सल्ला देईन. तुमच्या बँकेशी संपर्क साधा, कधीही कोणालाही निधी हस्तांतरित करू नका. भावनिक आवाहनांपासून सावध राहा आणि घाई करणे टाळा,” असे ठकवानी सांगतात. लक्षात ठेवा की, तुमचा यूपीआय पिन पेमेंट अधिकृत करण्यासाठी वापरला जातो; तुमची शिल्लक तपासण्यासाठी नाही. त्यामुळे तुम्ही तो कधीही कोणाशीही शेअर करू नका, असे शेतल भारद्वाज म्हणतात. “तुम्हाला अनपेक्षित ठेव मिळाल्यास, प्रेषकाला थेट प्रतिसाद देऊ नका. त्याऐवजी स्पष्टीकरणासाठी तुमच्या बँक किंवा यूपीआय सेवा प्रदात्याशी संपर्क साधा.

घोटाळेबाज अनेकदा तुमच्यावर त्वरित पाऊल उचलण्यासाठी दबाव निर्माण करतात. त्यामुळे अशा वेळी थोडा वेळ घ्या आणि शांत राहून गंभीरपणे विचार करा. आपल्या बँकेशी किंवा पेमेंटचा सल्ला घेतल्यानंतरच पैसे परत करा. अशा घोटाळ्यांना बळी पडू नये यासाठी डिजिटल पेमेंट आणि यूपीआय ॲप्स कसे कार्य करतात याबद्दल स्वतःला शिक्षित करणेदेखील महत्त्वाचे आहे. कोणत्याही संशयास्पद व्यवहाराची किंवा घोटाळ्याच्या प्रयत्नांची तक्रार ताबडतोब तुमच्या बँक आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे करा.

हेही वाचा : वेदनारहित प्रसूतीसाठी ‘या’ देशात महिलांना पैसे का दिले जातायत? काय आहे एपिड्युरल?

सायबर धोका संशोधक शोभित मिश्रा यूपीआय व्यवहारांच्या सुरक्षिततेबद्दल एक महत्त्वाचा पैलू हायलाइट करतात. “माझ्या संशोधनातून हे उघड झाले आहे की, फसवणूक करणारे संशयित पीडितांचे शोषण करण्यासाठी प्रगत रिमोट ॲक्सेस ट्रोजन (आरएटी) कसे वापरत आहेत. या तंत्रामुळे फसवणूककर्त्यांना अनधिकृत प्रवेश मिळवता येतो. फसवणूक करणारे यूपीआय व्यवहार सुरू करण्यासाठी सुरक्षा यंत्रणेला बायपास करण्यासाठी पीडितांच्या यूपीआय ॲप्समध्ये बदल करून, त्यांचा गैरफायदा घेत आहेत.

Story img Loader