Loksabha Election 2024 Results: लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा शनिवारी (१ जून) पार पडेल. एकूण सात टप्प्यात पार पडलेल्या या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. देशाची १८ वी लोकसभेची निवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरणार आहे. निवडणूक आयोगाकडून ४ जूनच्या मतमोजणीसाठी तयारी करण्यात येत आहे. एकूण ५४३ मतदारसंघातील उमेदवारांचे आणि त्यातून पर्यायाने संपूर्ण देशाचे भवितव्य ठरणार आहे. मात्र, इतक्या मोठ्या देशातील मतमोजणीची ही प्रक्रिया नेमकी कशी पार पाडली जाते, मतमोजणी कोण करते आणि तिची प्रक्रिया काय असते, असे अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडणे स्वाभाविक आहे.

मतमोजणी कोण करते?

निवडणूक आयोगाकडून एकूण निवडणुकीचे वेळापत्रक आधीच ठरवले जाते. त्यामध्ये मतमोजणीची तारीख आणि वेळ आधीच जाहीर केली जाते. प्रत्येक मतदारसंघातील निवडणूक पार पाडण्यासाठीची जबाबदारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर (Returning Officer – RO) असते. निवडणूक निर्णय अधिकारी मतमोजणीसाठीची ठिकाणे ठरवत असतो. या संदर्भातील सर्व नियोजन त्याच्या देखरेखीखाली होते. सामान्यत: निवडणूक आयोग राज्य सरकारच्या मदतीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करत असतो. मतमोजणीसाठी सरकारी शाळा, महाविद्यालये अथवा सरकारी कार्यालये इत्यादी ठिकाणे ठरवली जाऊ शकतात. प्रत्येक मतदारसंघांसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या मदतीसाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारीही (Assistant Returning Officers – ARO) असतो. निवडणूक निर्णय अधिकारी पोस्टल बॅलेट्सची मतमोजणी करतात, तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हे ईव्हीएमच्या मतमोजणीचे निरीक्षक असतात.

Seema-puri Vidhan Sabha Election Result 2025 Live: सीमापुरी विधानसभा निवडणूक निकाल २०२५ लाईव्ह, कोण जिंकले आणि कोण हरले येथे पाहा
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Ambedkar-nagar Vidhan Sabha Election Result 2025 Live: आंबेडकर नगर विधानसभा निवडणूक निकाल २०२५ लाईव्ह, कोण जिंकले आणि कोण हरले येथे पाहा
Najafgarh Assembly Election Result 2025
Najafgarh Vidhan Sabha Election Result 2025 Live: नजफगड विधानसभा निवडणूक निकाल २०२५ लाईव्ह, कोण जिंकले आणि कोण हरले येथे पाहा
Vikaspuri Assembly Election Result 2025
Vikaspuri Vidhan Sabha Election Result 2025 Live: विकासपुरी विधानसभा निवडणूक निकाल २०२५ लाईव्ह, कोण जिंकले आणि कोण हरले येथे पाहा
Patel-nagar Assembly Election Result 2025
Patel-nagar Vidhan Sabha Election Result 2025 Live: पटेल नगर विधानसभा निवडणूक निकाल २०२५ लाईव्ह, कोण जिंकले आणि कोण हरले येथे पाहा
Matia-mahal Assembly Election Result 2025
Matia-mahal Vidhan Sabha Election Result 2025 Live: मटिया महल विधानसभा निवडणूक निकाल २०२५ लाईव्ह, कोण जिंकले आणि कोण हरले येथे पाहा
Chandni-chowk Assembly Election Result 2025
Chandni-chowk Vidhan Sabha Election Result 2025 Live: चांदनी चौक विधानसभा निवडणूक निकाल २०२५ लाईव्ह, कोण जिंकले आणि कोण हरले येथे पाहा

हेही वाचा : Pune Porsche Accident Case: रक्ताच्या नमुन्यांमध्ये छेडछाड होऊनही मद्यांशाची पातळी कशी ठरवता येते?

या सगळ्या प्रक्रियेवर काऊंटिंग एजंट्सकडून (Counting Agents) लक्ष ठेवले जाते. निवडणूक आयोग प्रत्येक टेबलसाठी एक मतमोजणी पर्यवेक्षक (Counting Supervisor), एक मतमोजणी सहाय्यक (Counting Assistant) आणि एक सूक्ष्म निरीक्षक (Micro-Observer) यांची नियुक्ती करतो. ईव्हीएम मशीनपासून काही अंतरावर हे काऊंटिंग टेबल असतात; जेणेकरून मशीनला कुणीही हात लावून छेडछाड करू शकणार नाही. ईव्हीएम मशीन आणि काऊटिंग टेबल यादरम्यानही दोरी अथवा बॅरिकेड्स लावून अडथळा तयार केलेला असतो. थोडक्यात, काऊटिंग एजंट्स लांबूनच साऱ्या प्रक्रियेवर नजर ठेवू शकतात. निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच, निष्पक्षता बाळगत तीन टप्प्यांची प्रक्रिया पार पाडून मतमोजणीसाठीच्या एजंटची निवड केली जाते. ईव्हीएम मशीनच्या कंट्रोल युनिटवर बांधलेल्या महत्त्वाच्या सीलची पडताळणी करणे, मशीनबरोबर छेडछाड झालेली नाही, याची खात्री करून घेण्याचे काम काऊटिंग एजंटचे असते.

प्रत्यक्षात मतमोजणी कशी होते?

मतमोजणीच्या हॉलमध्ये १४ टेबल समांतरपणे मांडलेले असतात. समजा एखाद्या राज्यात लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक एकाचवेळी होत असेल, तर त्यातील सात टेबल हे लोकसभेच्या निवडणुकीच्या मतमोजणीसाठी तर उर्वरित सात हे विधानसभेच्या निवडणुकीच्या मतमोजणीसाठी वापरले जातात. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निरीक्षणाखाली सकाळी ८ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीस सुरुवात होते. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, सर्वांत आधी पोस्टल बॅलेट्सची मतमोजणी केली जाते. त्यानंतर ईव्हीएम मशीनमधील मतांची मोजणी सुरू केली जाते. ईव्हीएम मशीनच्या कंट्रोल युनिटमध्ये (Control Units – CU) मतांची नोंदणी झालेली असते. असे कंट्रोल युनिट्स मतमोजणीच्या हॉलमध्ये आणले जातात आणि त्यांचे काऊटिंग टेबल्सवर मोजणीसाठे वाटप केले जाते. संबंधित मतदान केंद्रावर किती मतदान झाले आहे, याची नोंदणी ‘१७ C’ फॉर्मवर केलेली असते. हा १७ C फॉर्मही मतमोजणीवेळी दिला जातो. कंट्रोल युनिटच्या मध्यभागी ‘रिझल्ट’ आणि ‘प्रिंट’ अशी दोन बटणे असतात. हिरव्या रंगाच्या सीलच्या मागे रिझल्ट बटण असते. ते बटण दाबले की हिरव्या रंगाचे सील फाटते आणि प्रत्येक उमेदवाराला तसेच NOTA पर्यायालाही किती मते प्राप्त झाली आहेत, याची आकडेवारी समोर येते. मतमोजणीच्या विविध फेऱ्या पार पडतात. प्रत्येक फेरीच्या शेवटी १४ ईव्हीएम मशीनच्या मतांची घोषणा केली जाते. एक फेरी पूर्णपणे संपल्यानंतरच पुढील फेरीसाठीचे कंट्रोल युनिट्स मतमोजणीच्या टेबलवर आणले जातात. गरजेनुसार मतमोजणीच्या कितीही फेऱ्या केल्या जाऊ शकतात. अगदी १२० ते १५० या दरम्यानही मतमोजणीच्या फेऱ्या होऊ शकतात.

ईव्हीएम मशीनमधील मतमोजणी संपल्यानंतर पडताळणीसाठी VVPAT मधील मतपत्रिकांची मोजणी सुरू केली जाते. मतदान करताना दिलेले मत योग्य उमेदवाराला पोहोचले आहे की नाही, याची खात्री VVPAT मधील मतपत्रिकेद्वारे मतदाराला करता येत असते. ही मतपत्रिका सहा सेकंद मतदाराला दिसते आणि त्यानंतर ती त्याखालील बॉक्समध्ये जमा होते. अशा मतपत्रिका ईव्हीएममध्ये नोंद झालेल्या मतांची पडताळणी करण्यासाठी वापरल्या जातात. ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड केली जाऊ शकते, असा आरोप अलीकडे वारंवार केला जातो आहे. विशेषत: विरोधकांकडून ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. ईव्हीएममधील मते आणि VVPAT मधून बाहेर पडणाऱ्या कागदी स्लीप्स यांची १०० टक्के पडताळणी केली जावी, अशी मागणी विरोधकांनी केली होती. मात्र, हे शक्य नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच दिला आहे. त्यामुळे ‘शितावरून भाताची परीक्षा’ या न्यायाने पाचपैकी एका VVPAT ची पडताळणी केली जाते. काटेकोर सुरक्षा आणि देखरेखीखाली मतमोजणीची ही प्रक्रिया पार पडते. मतमोजणीच्या प्रक्रियेतील प्रत्येक गोष्टीचे व्हिडीओ शूटिंग होत असते. स्ट्राँगरूम आणि मतमोजणी केंद्रांवर केंद्रीय सुरक्षा दल तैनात केले जातात. मतमोजणीच्या कालावधीत मोबाइल, लॅपटॉप, टॅब्लेट, कॉम्प्युटर आणि कॅल्क्यूलेटर अशा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणांना हॉलमध्ये परवानगी नसते.

हेही वाचा : Exit Poll: ‘एक्झिट पोल’ म्हणजे काय? निकालाचा अंदाज कसा लावला जातो?

ईव्हीएम मशीन आणि VVPAT च्या मतांमध्ये विसंगती निर्माण झाली तर?

ईव्हीएम मशीन आणि VVPAT च्या मतांमध्ये विसंगती निर्माण झाली तर काय करायचे, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अशावेळी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, VVPAT च्या मतांना ग्राह्य धरले जाते. निवडणूक आचार नियम, १९६१ च्या नियम ५६ (ड) (४) (ब) नुसार, हा निर्णय घेतला जातो.

Story img Loader