Dinosaurs Took Over After 10 Million Years of Rain: दीर्घकालीन पावसाच्या कालावधीनंतर घडलेल्या एका मोठ्या घटनेचे पुरावे आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या चमूने शोधले असून कार्नियन प्लुव्हियल एपिसोड (CPE) असे त्याचे नामकरण केले आहे. हा पावसाचा कालावधी सुमारे दहा लाख वर्षे एवढा मोठा होता. संशोधकांच्या मते, या घटनेनंतर डायनासोर पृथ्वीवरील प्रमुख जीवसृष्टीतील घटक म्हणून उदयास आले. या संशोधनाचे नेतृत्व ब्रिस्टल विद्यापीठाचे प्राध्यापक माईक बेंटन आणि चीनच्या वुहानमधील चायना युनिव्हर्सिटी ऑफ जिओसायन्सेसचे डॉ. जॅकोपो दल कोर्सो यांनी केले. या महत्त्वपूर्ण संशोधनाचा घेतलेला हा वेध!

कार्नियन प्लुव्हियल एपिसोड (Carnian Pluvial Episode – CPE) हा सुमारे २३ कोटी वर्षांपूर्वी ट्रायसिक कालखंडाच्या मध्यावर घडलेला एक महत्त्वाचा हवामानीय आणि पर्यावरणीय बदलाचा कालावधी होता. या काळात पृथ्वीच्या हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल झाले आणि हे बदल पुढील दहा लाख वर्षांपर्यंत पुढे कायम राहिले.

Sandy Irvine 100 years later
Sandy Irvine remains found:एव्हरेस्ट १९२४ सालीच सर झाला होता का? अर्विनचे सापडलेले अवशेष नेमकं काय सांगतात?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
chemical manufacturing industries in india stock market share prices
क्षेत्र अभ्यास अजब रसायन बाजार
sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
USS Edsall, World War II
Dancing Mouse: ८१ वर्षांनंतर सापडले ‘डान्सिंग माऊस’ या दुसऱ्या महायुद्धातील युद्धनौकेचे अवशेष; इतिहास नेमकं काय सांगतो?
Where a giant animal like a dinosaur was destroyed, what happened to microscopic organisms! Man should take the initiative to protect biodiversity know more about
जैवविविधतेच्या संरक्षणासाठी माणसानेच पुढाकार घ्यावा
Archaeologists discover a 4000-year-old coffin inside another coffin of Egyptian priestess
Lady of the House: मृत्यूनंतर ४,००० वर्षांनी लागला तिचा शोध; कोण होती इजिप्तची ‘lady of the house’?

१. या कालखंडात हवामानात मोठे बदल झाले:

CPE च्या काळात सतत मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. हा पाऊस लाखो वर्षे सुरू राहिला, त्यामुळे भूभागाचे स्वरूप आणि पर्यावरणावर मोठा परिणाम झाला. याशिवाय मोठ्या प्रमाणावर ज्वालामुखीचा उद्रेक देखील झाला, ज्यामुळे वायुमंडळात मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साइड आणि सल्फर डायऑक्साइड उत्सर्जित झाले. परिणामी तापमान वाढले (ग्लोबल वॉर्मिंग) आणि उष्णतेच्या प्रमाणात मोठी वाढ झाली. हा कालावधी अतिशय ओलसर हवामानाने सुरू झाला, परंतु त्यानंतर कोरडे हवामानही दीर्घकाळ राहिले.

अधिक वाचा: एका रात्रीत ८०० मंड्यम अय्यंगारांची हत्या; ‘नरक चतुर्दशी’ हा दिवस शोकदिवस का ठरला?

२. जीवसृष्टीवरील परिणाम:

या कालखंडात अनेक समुद्री आणि स्थानिक जीवसृष्टी मोठ्या प्रमाणावर नामशेष झाली. यामध्ये अशा काही प्रजातींचा समावेश होता ज्या पृथ्वीवरील सजीव निर्मितीच्या कालखंडापासून त्यावेळेपर्यंत अस्तित्त्वात होत्या. या कालावधीत डायनासोर मात्र जिवंत राहिले आणि हळूहळू पृथ्वीवरील प्रमुख प्रजाती म्हणून त्याचे वर्चस्व निर्माण झाले. CPE मुळे वनस्पती जीवनातही मोठे बदल झाले. जिम्नोस्पर्म्स (जसे की, सायकॅड्स आणि कॉनिफर्स) मोठ्या प्रमाणावर वाढल्या, त्यामुळे पर्यावरणीय बदलांना अनुकूलता मिळाली.

३. महासागर आणि जैवविविधता:

या कालखंडात महासागरांमध्ये ऑक्सिजनची पातळी कमी झाली (ऑक्सिजन डेफिशियन्सी), ज्यामुळे काही समुद्री प्रजाती नामशेष झाल्या. तर काही प्रजाती या हवामान बदलांमध्ये तग धरून नवीन परिस्थितीत विकसित झाल्या.

४. महाखंडाच्या तुटण्याची प्रक्रिया

या काळात पॅन्जिया या महाखंडाच्या तुटण्याची प्रक्रिया सुरू झाली, त्यामुळे भूगर्भीय हालचाली आणि ज्वालामुखी क्रिया वाढल्या. ज्वालामुखींनी मोठ्या प्रमाणावर हरित (ग्रीनहाउस) वायू उत्सर्जित झाले, ज्यामुळे हवामानातील मोठे बदल झाले.

५. पुरावे:

विविध खडक आणि भूस्तरीय नोंदीतून या दीर्घ पावसाळी कालावधीचे पुरावे मिळाले आहेत. नामशेष झालेल्या प्रजाती आणि त्यानंतरचे जीवसृष्टीतील बदल यांचे पुरावे जीवाश्माममधून सापडतात.

CPE चे महत्त्व:

कार्नियन प्लुव्हियल एपिसोड हा केवळ हवामान बदलाचा कालावधी नव्हता, तर या काळातील पर्यावरणीय घडामोडींच्या मोठ्या घटना नंतरच्या जैवविविधतेसाठी निर्णायक ठरल्या. या एपिसोडमुळे डायनासोर युगाला (Jurassic Period) सुरुवात झाली आणि पृथ्वीवरील पर्यावरण व जीवसृष्टीचे स्वरूप पूर्णपणे पालटले.

अधिक वाचा: London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?

कार्नियन प्लुव्हियल एपिसोडचा शोध कसा लागला?

उत्तर ट्रायसिक कालखंडात सर्व खंड एकमेकांशी जोडले गेले होते. त्यांना पॅन्जिया या महाखंडाचा भाग म्हणून ओळखले जात होते, हा भाग पॅन्थालासा महासागराने वेढलेला होता. पॅन्जियाच्या अंतर्गत भागात हवामान कोरडे आणि वाळवंटी होते, तर पाऊस मुख्यतः किनारपट्टीजवळच्या भागांमध्ये होत असे. या कोरड्या हवामानात मोठा बदल झाला. भूगर्भशास्त्रज्ञ श्लेगर आणि शोल्नबर्गर यांनी १९७० च्या दशकात ऑस्ट्रियातील नॉर्दर्न लाइमस्टोन आल्प्समध्ये गडद राखाडी रंगाच्या खडकांचा थर शोधून काढला होता. या थराने ओलसर हवामानाच्या पुराव्यांचा दाखला दिला, हे हवामान कोरड्या कालखंडांच्या दरम्यान आढळले. त्यावरून कार्नियन प्लुव्हियल एपिसोडची (CPE) घटना घडल्याचे सूचित झाले. CPE च्या माध्यमातून, ट्रायसिक कालखंडातील हवामानात आलेला हा बदल ही एक मोठी नोंद आहे, ज्याने पृथ्वीच्या पर्यावरणीय आणि हवामानशास्त्रीय इतिहासात महत्त्वपूर्ण बदल घडवले.

ओलसर हवामानात बदल कशामुळे झाला?

अलास्का आणि ब्रिटीश कोलंबियाच्या भागांचा समावेश असलेल्या व्ह्रॅंगेलिया प्रांतात झालेले प्रचंड ज्वालामुखींचे उद्रेक हे हवामान बदलासाठी कारणीभूत मानले जातात. या उद्रेकांदरम्यान वायुमंडळात प्रचंड प्रमाणात कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित झाला. “ज्वालामुखीचे हे उद्रेक कार्नियन कालखंडात अत्युच्च टप्प्यावर होते,” असे डॉ. जॅकोपो डॅल कोर्सो सांगतात. “हे इतके प्रचंड होते की, त्यांनी कार्बन डायऑक्साइडसारखे हरित वायू मोठ्या प्रमाणावर उत्सर्जित केले, त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगमध्ये मोठी वाढ झाली.” हरित वायूंमुळे जागतिक तापमान पाच ते सात अंश फॅरेनहाइटने वाढले. या तापमानवाढीमुळे समुद्रांमधून बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले, त्यामुळे संपूर्ण पृथ्वीवर पाऊस वाढला आणि हवामान ओलसर झाले. परंतु या हवामानातील गोंधळामुळे मोठ्या प्रमाणावर जैवविविधतेचा नाश (Biodiversity Loss) झाला. बऱ्याच प्रजाती या बदलांशी जुळवून घेऊ शकल्या नाहीत आणि त्यामुळे महानामशेष (Mass Extinction) झाला. अनेक प्राणी नामशेष झाले, तर नवीन प्रजाती उदयास आल्या. “नवीन वनस्पतींनी उरलेल्या शाकाहारी सरपटणाऱ्या प्राण्यांसाठी फारसा अन्नपुरवठा केला नसावा,” असे प्राध्यापक माईक बेंटन सांगतात. “आम्हाला आता माहीत आहे की, डायनासोर या घटनेच्या सुमारे २० दशलक्ष वर्षांपूर्वीच निर्माण झाले होते, परंतु या घटनेपर्यंत ते फारसे महत्त्वाचे किंवा मोठ्या प्रमाणावर नव्हते. ओलसर हवामानाच्या कालखंडानंतर अचानक निर्माण झालेल्या कोरड्या परिस्थितीने डायनासोरना प्राधान्य मिळवून दिले आणि खऱ्या अर्थाने ज्युरासिक युग सुरू झाले, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे ” असे बेंटन सांगतात. या शोधामुळे ग्लोबल वॉर्मिंग आणि त्याचे परिणाम यावर आता नव्याने प्रकाश पडला आहे.