काँग्रेसचे दिग्गज नेते कमलनाथ (७७) आणि त्यांचा मुलगा नकुल (४९) हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कमलनाथ यांना अनेक मुद्द्यांवरून भाजपाकडून वारंवार लक्ष्य करण्यात आले आहे. १९८४ च्या शीखविरोधी हत्याकांडातील त्यांच्या कथित भूमिकेमुळे भाजपामधील एक गटही त्यांना पक्षात प्रवेश देण्याच्या विरोधात आहे. १९८४ शीख दंगलीतील आरोपी कमलनाथ यांना पक्षात घेतल्याने शीख समुदायात चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे दिल्ली आणि पंजाबसह अनेक राज्यांमध्ये नुकसान होऊ शकते. पक्षाच्या शीख नेत्यांचा असा दावा आहे की, त्यांनी पक्षाच्या योग्य व्यासपीठावर त्यांचे विचार मांडले आहेत आणि कमलनाथ यांना पक्षात घेण्याबाबत त्यांचे मतभेद नोंदवले आहेत. काँग्रेस नेते कमलनाथ आणि त्यांचा मुलगा नकुल नाथ भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची अटकळ बांधली जात असताना आणि लोकसभा निवडणुकीत ३७० जागा मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सज्ज होण्यास सांगत असताना पक्षात ही भांडणे सुरू झाली आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा