हृषिकेश देशपांडे

कर्नाटकचे राजकीय चित्र अजून बरोबर महिन्याभराने स्पष्ट झाले असेल. भाजप विरुद्ध काँग्रेस असा चुरशीचा सामना येथे आहे. माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचा धर्मनिरपेक्ष जनता दल हा पक्ष सत्तेच्या समीकरणात निर्णायक ठरू शकतो. मात्र स्वबळावर बहुमत मिळवण्याची त्यांची ताकद नाही. जुने म्हैसूर भागात ५० ते ५५ जागांवर जनता दलाची ताकद केंद्रित आहे. त्यामुळेच दक्षिणेतील या महत्त्वाच्या राज्यात लोकसभा निवडणुकीपूर्वी सत्ता काबीज करण्यासाठी भाजप आणि काँग्रेस या देशातील दोन प्रमुख राष्ट्रीय पक्षांचे नेते आता कर्नाटकात आता ठाण मांडतील. उमेदवार जाहीर झाल्यानंतर पक्षांतर्गत नाराजी रोखण्याचे आव्हान दोन्ही पक्षांपुढे आहे. त्यामुळे बंडखोरांची समजूत कशी काढली जाते त्यावर बरेच काही अवलंबून असेल, कर्नाटकमधील मतदारसंघ दोन ते अडीच लाखांचे आहेत. त्यामुळे वीस ते पंचवीस हजार मतेही निर्णायक ठरू शकतात. अशा वेळी छोटे पक्ष, बंडखोर यामुळे समीकरणे बदलू शकतात.

maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
dcm devendra fadnavis criticized congress mla ravindra dhangekar
‘कसब्या’तील आमदारांची कामे कमी आणि दंगा जास्त; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका
maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…
Eknath Shinde, Eknath Shinde news, Jitendra Awhad latest news,
ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या नावाने करोडोंची वसुली, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?

भाजपसमोर आव्हान…

भाजपने गुजरातप्रमाणे विधानसभेला कर्नाटकमध्ये तरुण रक्ताला वाव देण्याचा निर्णय घेतला. अर्थात दोन्ही राज्यांतील परिस्थिती भिन्न आहे. गुजरातमध्ये भाजपचे संघटन मजबूत असल्याने असे प्रयोग यशस्वी होतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचे गुजरात हे गृहराज्य. त्यामुळे गुजरातमध्ये भाजपचा मार्ग सोपा होता. कर्नाटकमध्ये राजकीय व सामाजिक समीकरणे भिन्न आहेत. त्यामुळे प्रयोग करताना धोका आहे, मात्र भाजपने यंदा तो मार्ग स्वीकारला. त्याची कारणेही काही आहेत. भाजपमधील राज्यातील जनाधार असलेले नेते व माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेतली. ८० वर्षीय येडियुरप्पा लिंगायत समाजातील मोठे नेते. राज्यात १५ ते १७ टक्के लोकसंख्या असलेला हा समाज सर्वात मोठा पाठीराखा आहे. येडियुरप्पांनी राज्यात भाजपचे संघटन विस्तारले. याखेरीज येडियुरप्पांचे निकटवर्तीय तसेच माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना भाजपने उमेदवारी नाकारली. यातून ६७ वर्षीय शेट्टर हे नाराज आहेत. हुबळी परिसरातील प्रमुख नेते अशी त्यांची ओळख. तर पक्षातील अन्य एक नेते ६७ वर्षीय ईश्वराप्पा यांनीही राजकारण संन्यास घेतला.

“पुलवामा हल्ल्याला मोदी सरकार जबाबदार”, माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा दावा; पुलवामाचा हल्ला कसा झाला?

ही स्थिती पाहता भाजपला राज्यातून नवे नेतृत्व पुढे आणणे अपरिहार्य ठरले. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा फारसा करिश्मा नाही. अशा स्थितीत भाजपची सारी भिस्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच आहे. केंद्राच्या तसेच राज्याच्या कल्याणकारी योजना, हिंदुत्व तसेच काँग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दलातील मतविभागणी यांच्या आधारे सत्ता राखू असा भाजपचा होरा आहे. मात्र सरकारवरील भ्रष्टाचाराचे आरोप तसेच सत्ताधाऱ्यांबाबत काही प्रमाणात नाराजीचा सामना भाजपला करावा लागत आहे. प्रचारात केंद्रीय नेत्यांची फौज उतरल्यावर वातावरणात फरक पडेल अशी पक्षाला अपेक्षा आहे. त्यामुळेच दक्षिणेतील भाजपचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेले हे राज्य ताब्यात ठेवण्यात भाजपच्या बलाढ्य संघटनात्मक यंत्रणेचे कसब पणाला लागले आहे.

इच्छुकांच्या गर्दीने काँग्रेस बेजार

कर्नाटकमध्ये काँग्रेसचे संघटनात्मक बळ चांगले आहे. मात्र मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अनेक दावेदार असल्याने पक्षाला यातून मार्ग काढावा लागत आहे. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते सिद्धरामैय्या यांनी ही आपली ही शेवटचीच निवडणूक असल्याचे जाहीर केले आहे. व्यापक जनाधार तसेच विविध समाजघटकांचा पाठिंबा असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांचीही या पदासाठीची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. आक्रमक नेता, पक्षाची प्रचारयंत्रणा उभारण्यात वाकबगार असलेल्या शिवकुमार यांनी अलीकडेच मुख्यमंत्रीपदासाठी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव पुढे करत सिद्धरामैय्या यांना शह देण्याचा प्रयत्न केला. ज्येष्ठ नेते जी. परमेश्वर यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचे जाहीर केले आहे. काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपदासाठी ८ ते १० दावेदार आहेत. अशात पक्षाला समन्वय घडवावा लागेल. एकमेकांच्या समर्थकांची पाडापाडी झाल्यास सत्ता मिळणे दुरापास्त होईल.

विश्लेषण : निवडणुकीच्या तोंडावर कर्नाटकात ‘अमूल-नंदिनी’मध्ये कोल्ड वॉर; दोन्ही ब्रँड्सचा डेअरी मार्केटमध्ये किती दबदबा?

जनता दलाचे लक्ष्य

धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते एच.डी. कुमारस्वामी यांनी बहुमताचा विश्वास व्यक्त केला असला तरी, २२४ सदस्य असलेल्या कर्नाटक विधानसभेत ११३ जागा जिंकणे त्या पक्षाला अशक्य आहे. त्यामुळे त्रिशंकू स्थिती निर्माण झालीच तर, २५ ते ३० सदस्य निवडून आल्यावर जनता दलाचे महत्त्व वाढेल. देवेगौडा कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या हासन मतदारसंघावरून वाद होता. अखेर कुमारस्वामी यांचे थोरले बंधू रेवण्णा यांच्या पत्नीऐवजी अन्य कार्यकर्त्याला तेथून उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षात तसेच कुटुंबात वाद नसल्याचा दावा कुमारस्वामी यांनी केला आहे. माजी पंतप्रधान ८९ वर्षीय एच. डी. देवेगौडा वयपरत्वे फारसे सक्रिय नाहीत. त्यामुळे जनता दलाच्या प्रचाराची धुरा कुमारस्वामी यांच्यावर आहे. राज्यात ११ ते १३ टक्के असलेला वोक्कलिगा समुदाय हा या पक्षाचा आधार मानला जातो. मात्र शहरी मतदारसंघात काँग्रेस तसेच भाजपला यातील काही मते मिळतील अशी अपेक्षा आहे. भाजप व काँग्रेस या दोन प्रमुख राष्ट्रीय पक्षांच्या संघर्षात जनता दल टिकवून ठेवणे हे यंदाच्या निवडणुकीत कुमारस्वामींपुढील आव्हान आहे.