हृषीकेश देशपांडे

संयुक्त जनता दलाचे सर्वेसर्वा तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे भाजप विरोधकांची मोट बांधण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यादृष्टीने दिल्लीत रविवारी (२१ मे रोजी) मोठ्या हालचाली झाल्या. आम आदमी पक्षाचे नेते तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची त्यांनी भेट घेतली. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशीही त्यांनी संवाद साधला. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात एकास-एक उमेदवार देण्याचा नितीशकुमार यांचा प्रयत्न आहे. व्यावहारिक पातळीवर ही कल्पना थोडी कठीण आहे. नितीशकुमार भाजपला हरविण्यासाठी देशभर दौरे करत आहेत.

BCCI Vice President Rajeev Shukla statement on Gautam Gambhir Rohit Sharma sports news
गंभीर, रोहितमध्ये मतभेद नाहीत!‘बीसीसीआय’चे उपाध्यक्ष राजीव शुक्लांचे वक्तव्य
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Kho-Kho World Cup Delhi, Kho-Kho ,
विश्लेषण : दिल्लीत चक्क खो-खो विश्वचषक? किती संघ सहभागी? स्पर्धेमुळे या मराठमोळ्या खेळाला संजीवनी मिळेल?
akola ZP
वंचितची प्रतिष्ठा पणाला लागणार; अकोला जिल्हा परिषद निवडणुकीचे वेध, राजकीय पतंगबाजी रंगणार
nashik BJP rebels girish mahajan
बंडखोरांचा पुन्हा भाजपमध्ये प्रवेश अवघड
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत?

एकास-एक लढत शक्य आहे का?

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला सशर्त मदत करण्याची तयारी दर्शवली. मात्र ती प्रत्यक्षात येणे कठीण आहे. ममतांच्या म्हणण्यानुसार काँग्रेसने जेथे प्रादेशिक पक्ष भक्कम आहेत तेथे त्यांना मदत करावी, त्या बदल्यात आम्ही काँग्रेसला सहकार्य करू. परंतु पश्चिम बंगालबाहेर ममता काँग्रेसला किती बळ देणार? बंगालमध्येही काँग्रेस तसेच डावे पक्ष विशेषत: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जागा न लढविता ममतांच्या तृणमूल काँग्रेसला सहकार्य करणे कठीण वाटते. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल ज्या दिवशी लागला, त्याच दिवशी पंजाबमधील जालंधर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाने काँग्रेसला धक्का दिला. काँग्रेसला ही हक्काची जागा गमवावी लागली.

विश्लेषण : भारतातील चलनबंदीची गाथा…

गेल्या लोकसभा निवडणुकीत पंजाबमध्ये काँग्रेसला चांगले यश मिळाले होते. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्त्वात पक्ष भक्कम होता. आता ते भाजपमध्ये आहेत तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची सत्ता आहे. राज्यात लोकसभेच्या १३ जागा असल्या तरी काँग्रेसला गेल्या वेळेप्रमाणे ८ ते ९ जागा जिंकणे कठीण आहे. केरळमध्येही माकपच्या पुढाकाराने सत्तेत असलेल्या डाव्या आघाडीविरोधात काँग्रेसची संयुक्त पुरोगामी आघाडी असाच सामना आहे. येथेही २०१४ मध्ये काँग्रेसला यश मिळाले. आता राज्यातील समीकरणे बदलली आहेत. काँग्रेसची वाटचाल सोपी नाही. येथेही नितीशकुमार यांचे एकास-एक लढतीचे सूत्र लागू होणे अशक्य आहे. केरळमध्ये डावी आघाडी काँग्रेसला जागा सोडणार नाही, काँग्रेसही तेथे डाव्यांचा विरोध सोडणार नाही. त्यामुळेच विरोधकांना एकत्र आणताना वाटाघाटीत नितीश यांचे कौशल्य दिसून येईल.

भाजपविरोधी राजकारणाला बळ मिळेल?

कर्नाटकमधील विजयाने भाजपविरोधातील राजकारणाला बळ मिळाले आहे. भाजपने मोठी प्रचारयंत्रणा राबवूनही सत्ता राखता आली नाही हा संदेश यानिमित्ताने गेला. काँग्रेसने स्थानिक मुद्द्यांभोवती प्रचार केंद्रित ठेवत भाजपला धक्का दिला. देशपातळीवरही हेच समीकरण लागू करून सरळ लढतीत भाजपला पराभूत करायचे अशी नितीश यांची व्यूहरचना आहे. कर्नाटकमध्ये भाजपची मते कमी झाली नाहीत. मात्र भाजपविरोधी मते काँग्रेसच्या मागे एकवटली. त्यामुळेच धर्मनिरपेक्ष जनता दल लढतीत असतानाही भाजपला यश मिळाले नाही. मतविभाजन फारसे झाले नाही हे कर्नाटक निकालांनी दाखवून दिले आहे.

दीडशे जागांवर सरळ लढत

लोकसभेच्या जवळपास दीडशे जागांवर भाजपविरोधात काँग्रेस अशी सरळ लढत आहे. तेथे विरोधक काय करणार हा मुद्दा आहे. यात प्रामुख्याने कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश येथील जागांचा समावेश आहे. येथे भाजपेतर विरोधक काँग्रेससाठी जागा सोडतील असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. नितीशकुमार येथे विरोधकांना कसे समजावणार? उत्तर प्रदेशातील ८० जागांवर भाजप विरुद्ध समाजवादी पक्ष तसेच काही प्रमाणात बहुजन समाज पक्ष असा सामना आहे. येथे काँग्रेस समाजवादी पाठीशी उभा राहिल्यास भाजपची कोंडी होईल. कारण भाजपविरोधात समाजवादी पक्ष हाच प्रबळ आहे. तेव्हा नितीशकुमार यांना अशा लढतींसाठी रणनीती आखावी लागेल.

डी. के. शिवकुमार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाची एवढी चर्चा का? उपमुख्यमंत्रीपद कधी निर्माण झाले आणि महाराष्ट्रात किती झाले?

नितीश यांची प्रतिमा चांगली आहे. तसेच बिहारसारख्या राज्याचे प्रदीर्घ काळ मुख्यमंत्रीपद भूषवल्याने राष्ट्रीय स्तरावरील राजकीय नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. राष्ट्रीय राजकारणातील ताणेबाणे त्यांना ठाऊक आहेत. कर्नाटकच्या निकालाची लोकसभेत पुनरावृत्ती करण्यासाठी नितीशकुमार देशभर दौरे करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेला फारसा धक्का लागलेला नाही. त्यामुळे कर्नाटकप्रमाणे लोकसभेला होईल असे नाही. मात्र यानिमित्ताने विरोधी ऐक्याच्या चर्चेला पुन्हा धुमारे फुटले आहेत.

Story img Loader