अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना वार्धक्याच्या कारणास्तव निवडणुकीतून माघार घ्यावी लागली आहे; तर दुसऱ्या बाजूला डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर त्यांच्या बाजूने सहानुभूती गोळा करण्याचा प्रयत्न रिपब्लिकन पार्टी करत आहे. समजा डोनाल्ड ट्रम्प यांचा या निवडणुकीमध्ये विजय झालाच तर ते आता राष्ट्राध्यक्ष म्हणून अधिक सतर्क राहण्याची शक्यता आहे. आपल्या टीममध्ये कोण असावे, याचाही विचार त्यांनी आधीच करून ठेवलेला असून त्यामध्ये भारतीय वंशाचे काश (कश्यप) पटेल यांचा समावेश नक्कीच असेल, असे म्हटले जात आहे.

हेही वाचा : अमेरिकन नागरिक कृष्णवर्णीय महिलेला राष्ट्राध्यक्षपदी निवडून देणार का? इतिहास काय सांगतो?

देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं? बावनकुळे म्हणाले... (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं?
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
भाजपाला नवीन वर्षात मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष; कशी पार पडणार निवडणुकीची प्रक्रिया? जाणून घ्या... (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP President Election : भाजपाला नवीन वर्षात मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष; कशी पार पडणार निवडणुकीची प्रक्रिया? जाणून घ्या…
Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
Vijay Vadettiwar statement regarding the Leader of the Opposition Nagpur news
सरकारला विरोधी पक्षनेता हवा असेल तरच नाव देऊ -वडेट्टीवार
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक
Chief Minister Devendra Fadnavis criticizes Sharad Pawar over assembly election defeat pune news
‘संयमाने वागून नेत्यांनी पराभव स्वीकारावा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शरद पवारांवर टीका

कोण आहेत काश पटेल?

जर डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची ही निवडणूक जिंकली, तर नव्या अमेरिकन सरकारमध्ये काश पटेल नक्कीच महत्त्वाच्या पदावर असतील. ४४ वर्षीय काश पटेल यांनी नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलमध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे दहशतवादविरोधी सल्लागार म्हणून काम केले आहे. ट्रम्प यांच्या शेवटच्या कार्यकाळात ते संरक्षण खात्याच्या कार्यवाहक सचिवांचे चीफ ऑफ स्टाफ होते, ते राष्ट्रीय सुरक्षा अधिकारीही राहिले आहेत. त्यांनी यांसह विविध महत्त्वाची पदे भूषवली असल्याने त्यांच्याकडे कामकाजाचा प्रदीर्घ असा अनुभव आहे.

काश पटेल ट्रम्प यांची साथ का देत आहेत?

काश पटेल यांनी पेस विद्यापीठातील लॉ स्कूलमधून पदवी प्राप्त केली आहे. पटेल यांना ज्या प्रतिष्ठित लॉ फर्ममध्ये काम करण्याची अपेक्षा होती तेथे त्यांना नोकरी मिळवता आली नाही, त्यामुळे त्यांनी ‘पब्लिक डिफेन्डर’ म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी मियामीमधील स्थानिक आणि फेडरल कोर्टात जवळपास नऊ वर्षे काम केले, त्यानंतर ते न्याय विभागात रुजू झाले. तीन वर्षांनंतर पटेल यांना व्हाईट हाऊसमधील कर्मचारी म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांनी हाऊस पर्मनंट सिलेक्ट कमिटी ऑन इंटेलिजन्ससाठी काम केले. या समितीचे नेतृत्व रिपब्लिकन पक्षाचे प्रतिनिधी डेव्हिन नुनेस करत होते. नुनेस हे ट्रम्प यांचे निकटवर्तीय मानले जातात. नुनेस यांनी पटेल यांना एका समितीच्या चौकशीचे काम दिले. २०१६ च्या मोहिमेतील रशियन हस्तक्षेपाबाबत हा तपास होता. काश पटेल यांनी हा ‘नुनेस मेमो’ लिहिण्यातही मदत केली होती. या चार पानी अहवालामध्ये अमेरिकेतील न्याय विभागाच्या चुका तपशीलवार मांडण्यात आल्या आहेत. या मेमोने ट्रम्प यांचे लक्ष वेधून घेतले आणि पटेल यांनी लवकरच राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत काम करण्यास सुरुवात केली. नंतर त्यांनी अनेक महत्त्वाच्या भूमिकांमध्ये काम केले. राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या कार्यवाहक संचालकांचे ते सर्वोच्च सल्लागार होते. नोव्हेंबर २०२० मध्ये त्यांची संरक्षण सचिव क्रिस्टोफर मिलर यांच्याकडे चीफ ऑफ स्टाफ म्हणून नियुक्ती करण्यात आली.

हेही वाचा : विश्लेषण : बायडेन यांच्या पाठिंब्यानंतरही कमला हॅरिस यांच्या उमेदवारीबाबत अनिश्चितता? ट्रम्पसमोर कितपत संधी?

राष्ट्राध्यक्ष पदावरून ट्रम्प पायउतार झाल्यापासून पटेल काय करत आहेत?

काश पटेल हे ‘ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुप’च्या संचालक मंडळावर आहेत. ते कंत्राटी पद्धतीने या ग्रुपशी जोडले गेलेले आहेत. या करारातून त्यांना वर्षाला $120,000 मिळायचे. माजी राष्ट्राध्यक्ष असलेल्या ट्रम्प यांचा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणूनही त्यांना काम पाहता आले होते. ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील PAC ने गेल्या वर्षाच्या सुरुवातीपासून पटेल यांना $300,000 पेक्षा जास्त पैसे दिले आहेत. जानेवारी २०२१ मध्ये ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस सोडल्यानंतर पटेल यांनी लगेचच ‘फाईट विथ काश’ ही संस्था सुरू केली. संस्था मानहानीच्या खटल्यांसाठी निधी देते, तसेच विविध प्रकारच्या मालाचीदेखील विक्री करते. त्यामध्ये ब्रँडेड मोजे आणि पाण्याच्या बाटल्यांचा समावेश आहे. ते स्वेटशर्ट आणि बेसबॉल टोपीदेखील विकतात. आता ‘द काश फाऊंडेशन’ म्हणून ओळखली जाणारी ही स्वयंसेवी संस्था असून ती ना-नफा तत्त्वावर काम करते. आपण फाऊंडेशनमधून पैसे कमवणार नसल्याचे पटेल यांनी म्हटले आहे. काश पटेल यांनी काही पुस्तकांचे लेखनही केले आहे. गेल्यावर्षी त्यांनी एक आत्मवृत्तही प्रकाशित केले आहे. ‘गव्हर्नमेंट गँगस्टर: द डीप स्टेट, द ट्रुथ अँड द बॅटल फॉर अवर डेमोक्रसी’ असे या आत्मवृत्ताचे नाव आहे. त्यांनी मुलांच्या काल्पनिक कथांचे लेखनही केले आहे. या पुस्तकांमध्ये ट्रम्प यांचे वर्णन सिंह म्हणून केले आहे. ‘द प्लॉट अगेन्स्ट द किंग’ या पुस्तकामध्ये खलनायकाच्या भूमिकेत हिलरी क्लिंटन यांचे चित्रण आहे.

रिपब्लिकन सरकार सत्तेवर आल्यास पटेल यांचे स्थान काय असेल?

ट्रम्प आपल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या शेवटच्या महिन्यांमध्ये पटेल यांना एफबीआय किंवा सीआयएमध्ये उपसंचालक म्हणून नियुक्त करणार होते. मात्र, ते शक्य होऊ शकले नाही. पटेल यांना या कामाचा अनुभव नसल्यामुळे त्यांना हे पद देण्यात अडचणी आल्या. मात्र, ट्रम्प दुसऱ्यांदा विजयी झाल्यास पटेल यांना भविष्यात अशी भूमिका नक्कीच मिळू शकते, असे म्हटले जात आहे.

Story img Loader