केरळमधील अलप्पुझा-कन्नूर एक्झेक्यूटिव्ह एक्स्प्रेसमधील प्रवाशांवर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिल्याची धक्कादायक घटना २ एप्रिल रोजी घडली. या घटनेप्रकरणी मूळचा दिल्लीमधील शाहीनबाग येथील राहिवासी असलेला शाहरुख सैफी याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेत एकूण तीन जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपीने, मला कथित मुस्लीम धर्मगुरू झाकीर नाईक याच्याकडून प्रेरणा मिळाली आहे, असे सांगितले आहे. याच पार्श्वभूमीवर झाकीर नाईक कोण आहे? त्याच्यावर काय आरोप आहेत? हे जाणून घेऊ या.

केरळमध्ये नेमके काय घडले?

केरळमधील कोझीकोड शहरातील कोरापुझा रेल्वे स्टेशनवर अलप्पुझा-कन्नूर एक्झेक्यूटिव्ह एक्स्प्रेसमधील प्रवाशांवर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिल्याची घटना घडली. या घटनेनंतर २७ वर्षीय शाहरुख सैफी याला अटक करण्यात आली आहे. तो मूळचा दिल्लीमधील शाहीनबाग येथील रहिवासी आहे. या घटनेत एकूण तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. याबाबत अतिरिक्त पोलीस महासंचालक एमआर अजिथ कुमार यांनी अधिक माहिती दिली आहे. “शाहरुख सैफी सतत झाकीर नाईक यांचे व्हिडीओ पाहायचा. सैफी अत्यंत कट्टरपंथी असून गुन्हा करण्याच्या उद्देशानेच तो केरळमध्ये आला होता. या घटनेसंदर्भात आम्ही पुरावे गोळा केले आहेत,” असे अजिथ कुमार यांनी सांगितले.

What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : “प्रवीण महाजन यांना गोपीनाथ मुंडेंनी पिस्तुल घेऊन दिलं होतं, पूनमला..”, सारंगी महाजन यांचा दावा
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
prakash ambedkar dawood ibrahim
Prakash Ambedkar: “शरद पवार-दाऊद इब्राहिमच्या कथित भेटीची चौकशी करा”, प्रकाश आंबेडकरांची आरोपवजा मागणी
Ashok Pawar and Rushiraj Pawar
Ashok Pawar : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’

विश्लेषण : टँकरमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न अजूनही दूर? सध्या राज्यभर किती टँकरचे नियोजन?

झाकीर नाईक कोण आहे?

५७ वर्षीय झाकीर नाईकचा जन्म मुंबईत झाला. त्याने वैद्यकशास्त्रात उच्चशिक्षण घेतलेले आहे. वयाच्या २० व्या वर्षापासूनच तो धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभाग घेऊ लागला. तसेच पुढे त्याने इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन (आयआरएफ) नावाची संस्था स्थापन केली. मात्र यूएपीए १९६७ च्या कायद्यानुसार भारत सरकारने या संस्थेवर बंदी घातली आहे. पुढे नोव्हेंबर २०२१ मध्ये या संस्थेवरील बंदी पाच वर्षांसाठी वाढविण्यात आली.

पीस टीव्हीवर भारतासह कॅनडा, ब्रिटन, बांगलादेशात बंदी

२०१६ च्या अगोदर दहशतवादविरोधी पथकाने झाकीर नाईकवर गंभीर आरोप केले होते. झाकीर नाईक याच्याकडून धार्मिक द्वेष पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच बेकायदेशीर कृत्यांमध्येही त्याचा समावेश आहे, असा दावा दहशतवादविरोधी पथकाने केला होता. झाकीर नाईक पीस टीव्हीवर धार्मिक प्रवचन द्यायचा. या पीस टीव्हीची स्थापना २००६ साली झाली होती. मात्र सध्या पीस टीव्हीवर भारतासह कॅनडा, ब्रिटन, बांगलादेश अशा अनेक देशांत बंदी घालण्यात आलेली आहे. केंद्र सरकारने झाकीर नाईकच्या आयआरएफ या संस्थेवरही गंभीर आरोप केलेले आहेत. आयआरएफ संस्थेकडून भारताच्या सुरक्षेला धोका ठरणारी कृती केली जाते. तसेच या संस्थेमुळे शांतता तसेच सामाजिक स्वास्थ्य, बंधुता बिघडण्याची शक्यता आहे, असे केंद्र सरकारने म्हटलेले आहे. झाकीर नाईक याच्याकडून धर्माच्या आधारावर शत्रुत्व आणि द्वेषभावनेला प्रोत्साहन दिले जात आहे, असेही केंद्र सरकारने म्हटलेले आहे. झाकीर नाईकने मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत. माझ्या वक्तव्यांचा विपर्यास करण्यात आला, असा दावा झाकीर नाईककडून केला जातो.

हेही वाचा >> विश्लेषण : टँकरमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न अजूनही दूर? सध्या राज्यभर किती टँकरचे नियोजन?

मी झाकीर नाईकच्या भाषणांमुळे प्रेरित

२०१६ साली झाकीर नाईक जागतिक पातळीवर चर्चेचा विषय ठरला. कारण त्या सालात ढाका येथील होली आर्टिसन बेकरीवर एका दहशतवाद्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात एकूण २६ जणांचा मृत्यू झाला होता. या दहशतवाद्याने मला झाकीर नाईकच्या भाषणांतून प्रेरणा मिळालेली आहे, असे सांगितले होते. दहशतवाद्याच्या या स्पष्टीकरणानंतर झाकीर नाईकची चर्चा जागतिक पातळीवर होऊ लागली.

सध्या झाकीर नाईक कोठे आहे?

झाकीर नाईकने २०१६ साली भारतातून पळ काढलेला आहे. तो सध्या मलेशियामध्ये आहे. भारताकडून मागील अनेक वर्षांपासून झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न केले जात आहेत, मात्र त्यांत भारताला फारसे यश आलेले नाही. झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणावर २०१९ साली मलेशियाचे पंतप्रधान महाथीर मोहम्मद यांनी महत्त्वाचे भाष्य केले होते. भारतात न्याय मिळत नसेल तर झाकीर नाईकचे प्रत्यार्पण न करण्याचा अधिकार मलेशियाला आहे, असे मोहम्मद म्हणाले होते.

हेही वाचा >> लष्कराविरोधात बोलल्यामुळे चक्क २५ वर्षांची शिक्षा, व्लादिमीर पुतीन यांना टोकाचा विरोध करणारे व्लादिमीर कारा मुर्झा कोण आहेत?

झाकीर नाईकवर सभांमध्ये बोलण्यास बंदी

२०१९ साली मलेशियामध्ये झाकीर नाईकने हिंदू आणि चिनी नागरिकांसंदर्भात वादग्रस्त विधान केले होते. या विधानामुळे मलेशियामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान महाथीर यांनी झाकीर नाईक याच्याकडून धार्मिक भावना भडकाविण्याचे काम केले जात आहे, अशा भावना व्यक्त केल्या होत्या. तेव्हापासून तेथे झाकीर नाईकवर सार्वजनिक सभांमध्ये बोलण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. पुढे या प्रकरणात झाकीर नाईकने माफी मागितली होती.

फिफा विश्वचषकासाठी झाकीर नाईकला दिले होते आमंत्रण?

२०२० साली झाकीर नाईकने भारत सरकारविषयी मोठे विधान केले होते. जम्मू-काश्मीरला देण्यात आलेल्या विशेष दर्जाच्या बाजूने मी भूमिका घ्यावी, असे मला भारत सरकारने सांगितले होते, असा दावा झाकीर नाईकने केला होता. २०२२ साली कतारमध्ये फुटबॉल फिका विश्वचषक आयोजित करण्यात करण्यात आला होता. या विश्वचषकासाठी झाकीर नाईकला आमंत्रण देण्यात आले होते, असे सांगितले जात होते. मात्र कतारने हा दावा फेटाळला होता.

हेही वाचा >>‘प्रसिद्धी मिळावी म्हणून दोघांना संपवलं,’ अतिक अहमद-अश्रफ अहमद हत्या प्रकरणात आणखी काय समोर आले?

मलेशिया, टर्की, पाकिस्तान अशा देशांकडून झाकीर नाईकला पाठबळ

दरम्यान, झाकीर नाईक भारतातील मुस्लिमांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडणार असल्याचे म्हटले जाते. त्यासाठी मलेशिया, टर्की, पाकिस्तान अशा देशांकडून झाकीर नाईकला आर्थिक तसेच अन्य मार्गांनी पाठबळ दिले जात आहे, असे सांगितले जाते.