इस्रायलमध्ये हिजबुल्लाहच्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झालेत. हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेने मर्गालियट येथे क्षेपणास्त्र हल्ला केला. इस्रायलच्या लेबनॉन सीमेजवळ भारतीयाचा मृत्यू झाल्याची गेल्या काही वर्षांतील ही पहिलीच घटना आहे. रिपोर्टनुसार, हिजबुल्लाहने सोमवारी हा हल्ला केला, त्यात निबिन मॅक्सवेल या ३१ वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. तो केरळमधील कोल्लमवाडी येथील रहिवासी आहे. या हल्ल्यात एकूण सात जण गंभीर जखमी झालेत, त्यापैकी दोघे केरळचे आहेत. जोसेफ जॉर्ज आणि पॉल मेलविन अशी त्यांची नावे आहेत. निबिन मॅक्सवेलच्या वडिलांनी सांगितले की, त्यांचा मुलगा जानेवारीमध्ये इस्रायलला गेला होता. त्याचा मोठा भाऊ तिथे कामाला होता. सोमवारी रात्री निबिन मॅक्सवेलच्या मृत्यूची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली. केरळ पोलीस सूत्रांशी संपर्क साधला असता चार दिवसांत मृतदेह केरळमध्ये पोहोचणे अपेक्षित होते. मॅक्सवेलच्या पश्चात त्याची ७ महिन्यांची गर्भवती पत्नी आणि पाच वर्षांची मुलगी आहे.

हिजबुल्लाहच्या हल्ल्यात निबिन मॅक्सवेलच्या मृत्यूबद्दल भारतातील इस्रायल दूतावासाने शोक व्यक्त केला आहे. पीडित व्यक्ती सोमवारी दुपारी उत्तर मार्गालियट गावातील एका बागेत शेतीचे काम करीत होत्या. त्यानंतर हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांनी तेथे क्षेपणास्त्राने हल्ला केला. निवेदनात पुढे म्हटले आहे की, आमच्या प्रार्थना आणि शोकसंवेदना शोकाकुल कुटुंब आणि जखमींबरोबर आहेत. नवी दिल्लीतील इस्रायली दूतावासाने X वर लिहिले की, हिजबुल्लाहने मार्गालियटच्या उत्तरेकडील गावात शेती करणाऱ्या कामगारांवर भ्याड दहशतवादी हल्ला केला होता. भारतीय शेत मजूर इस्रायलमध्ये का होते? आणि जर संघर्ष गाझामध्ये असेल तर उत्तर इस्रायलमधील कामगार आगीत का होरपळतायत?, असाही सवाल उपस्थित केलाय. इस्रायली वैद्यकीय संस्था पूर्णपणे जखमींच्या सेवेत आहेत, ज्यांवर आमचे सर्वोत्तम वैद्यकीय कर्मचारी उपचार करीत आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. सर्व नागरिक इस्रायलसाठी महत्त्वाचे आहेत. मग तो इस्रायली असो वा परदेशी. कुटुंबांना आधार देण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी आम्ही तिथे असू, असंही त्यांनी सांगितलंय.

Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
CSMT accident Accused in accident finally found after CCTV examination
सीएसएमटी अपघात : सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर अखेर अपघातातील आरोपी सापडला
23 year old woman drowned her one year old son in water tank in Washind area of ​​Bhiwandi
जन्मदात्या आईकडूनच मुलाची हत्या
Santosh Deshmukh Murder Case
“…म्हणून माझ्यावर ही वेळ आली का?” मयत सरपंच संतोष देशमुखांच्या आईचा टाहो; पत्नी म्हणाली, “ते १५ वर्षांपासून..”
young woman abandoned her newborn near Vanzra Layout Nagpur
अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाला रस्त्यावर फेकले
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
gold from woman dead body s neck was stolen
मृत्यूनंतरही परवड थांबली नाही, पार्थिव रुग्णालयात नेताना महिलेच्या गळ्यातील गंठण चोरीला

हेही वाचाः टाटा मोटर्सच्या विभाजनानं नेमकं काय साध्य होणार? भागधारकांना काय मिळणार?

इस्रायलची लेबनॉनला लागून असलेली उत्तरेकडील सीमा अनेक वर्षांपासून धगधगत आहे. ८ ऑक्टोबर २०२३ रोजी दक्षिण इस्रायलमध्ये हमासच्या हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेने पॅलेस्टिनी अतिरेक्यांशी एकरूप असल्याचं दाखवण्यासाठी इस्रायलवर रॉकेट हल्ल्याचा मारा केला. तेव्हापासून इस्रायलने १२० किमीच्या सीमेवर हवाई आणि तोफखाना हल्ले सुरू केले आहेत, ज्यात किमान २२ नागरिकांसह २४० हून अधिक लोक ठार झाले आहेत, अल जझिराने वृत्त दिले आहे. यूएन बॉडी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशननुसार, ८ ऑक्टोबरपासून दक्षिण लेबनॉनमधून ८७,००० हून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. इस्रायलने आपली सीमा आणि लेबनीज लोकसंख्येदरम्यान बफर स्पेस तयार करण्याचा निर्धार केला आहे, असंही तज्ज्ञ सांगतात. इस्रायलला हेजबुल्लाहच्या हल्ल्यांपासून स्वतःला दूर ठेवायचे आहे. लेबनीज गृहयुद्ध १९७५-९० च्या दरम्यान सुरू झाले. इराणचे समर्थन असलेला हिजबुल्लाहचा इस्रायलला विरोध आहे.

हेही वाचाः शानन जलविद्युत प्रकल्पावरून पंजाब-हिमाचलमध्ये वाद, ‘हा’ प्रकल्प नेमका काय आहे?

इस्रायलमध्ये १८ हजार भारतीय कामगार उपस्थित

इस्रायलने ऐतिहासिकदृष्ट्या मजुरांची मागणी पूर्ण करण्यासाठी विशेषतः बाहेरून लोकांना काम करण्यासाठी बोलावले जाते. ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यांपूर्वी पॅलेस्टिनी आणि अरब स्थलांतरित लोक या कामगार दलात बहुसंख्य होते, सुमारे ८० हजार पॅलेस्टिनी एकट्या इस्रायली बांधकाम उद्योगात काम करीत होते. हल्ल्यांनंतर इस्रायलने हजारो पॅलेस्टिनींचे कामाचे परवाने निलंबित केले, तर इतर अनेक परदेशी कामगारांनी सुरक्षेच्या कारणास्तव देश सोडला. यामुळे मजुरांची मोठी कमतरता निर्माण झाली, जी आता भारतीय कामगार भरून काढत आहेत. इस्रायलने नोव्हेंबर २०२३ मध्ये बांधकाम आणि कृषी क्षेत्रात रोजगारासाठी व्हिसा देण्यास सुरुवात केली. डिसेंबरपर्यंत सुमारे ८०० भारतीय व्हिसा जारी केल्यानंतर देशातील कृषी क्षेत्रात काम करण्यासाठी गेल्याची माहिती आहे. एजंट आणि रिक्रूटमेंट एजन्सी इत्यादी शुल्कासह एका ॲग्री व्हिसाची किंमत साधारणत: सुमारे ४ लाख रुपये असते, केरळमधील काही कामगार जे आता इस्रायलमध्ये आहेत, त्यांनी इंडियन एक्सप्रेसला ही माहिती दिली आहे. इस्रायलला गेलेले बहुतांश केरळ, तामिळनाडू, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशातील कामगार आहेत. परंतु इतर नोकऱ्यांसाठी भरती अजूनही सुरू आहे आणि हजारो भारतीय रोजगार मिळवण्यासाठी तिकडे गर्दी करीत आहेत.परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ऑक्टोबरमध्ये जारी करण्यात आलेल्या ॲडव्हायझरीनंतरही सुमारे १८ हजार भारतीय इस्रायलमध्ये राहत आहेत. इस्रायलने हजारो पॅलेस्टिनींचे कामाचे परवाने निलंबित केले आहेत. भारत आणि इस्रायलमध्ये मे २०२३ मध्ये ४२ हजार भारतीय कामगारांना इस्रायली अर्थव्यवस्थेत समाविष्ट करण्यासाठी करार झाला होता.

इस्रायलमधील भारतीय कामगारांची काळजी घेणारे कर्मचारी

इस्रायलमध्ये भारतीय कामगारांची उपस्थिती ही काही नवीन नाही. गेल्या ऑक्टोबरमध्ये देशात सुमारे १८ हजार भारतीय कामगार काम करीत होते, सुमारे १४ हजार वृद्ध इस्रायलींची काळजी घेणारे होते. इस्रायलसारख्या वृद्ध देशांमध्ये नर्सिंगने भारतीयांसाठी चांगल्या पगाराच्या करिअरच्या संधी दीर्घकाळ उपलब्ध करून दिल्या आहेत. केअरगिव्हर व्हिसा सामान्यत: १० लाख रुपयांपर्यंत मिळतो, ॲग्री व्हिसापेक्षा अधिक महाग असला तरी काळजी घेणारे कर्मचारी देखील खूप चांगले कमावतात म्हणजेच दर महिन्याला १ लाखांपेक्षा जास्त कमावतात आणि मोफत अन्न आणि निवास, आरोग्य सेवा यासह बरेच फायदे मिळवतात. इस्रायल आणि हमासच्या संघर्षादरम्यान भारतीय कामगारांची काळजी घेण्याचे कामही सुरू आहे. कारण कामगार मोठ्या प्रमाणात संरक्षित इस्रायली शहरांमधील निवासस्थानांमध्ये राहतात. कृषी कामगार बऱ्याचदा लेबनॉन सीमेवर काम करतात आणि त्यामुळे त्यांना सीमापार हल्ल्यांना तोंड द्यावे लागते.

Story img Loader