इस्रायलमध्ये हिजबुल्लाहच्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झालेत. हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेने मर्गालियट येथे क्षेपणास्त्र हल्ला केला. इस्रायलच्या लेबनॉन सीमेजवळ भारतीयाचा मृत्यू झाल्याची गेल्या काही वर्षांतील ही पहिलीच घटना आहे. रिपोर्टनुसार, हिजबुल्लाहने सोमवारी हा हल्ला केला, त्यात निबिन मॅक्सवेल या ३१ वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. तो केरळमधील कोल्लमवाडी येथील रहिवासी आहे. या हल्ल्यात एकूण सात जण गंभीर जखमी झालेत, त्यापैकी दोघे केरळचे आहेत. जोसेफ जॉर्ज आणि पॉल मेलविन अशी त्यांची नावे आहेत. निबिन मॅक्सवेलच्या वडिलांनी सांगितले की, त्यांचा मुलगा जानेवारीमध्ये इस्रायलला गेला होता. त्याचा मोठा भाऊ तिथे कामाला होता. सोमवारी रात्री निबिन मॅक्सवेलच्या मृत्यूची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली. केरळ पोलीस सूत्रांशी संपर्क साधला असता चार दिवसांत मृतदेह केरळमध्ये पोहोचणे अपेक्षित होते. मॅक्सवेलच्या पश्चात त्याची ७ महिन्यांची गर्भवती पत्नी आणि पाच वर्षांची मुलगी आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा