Killers of the Flower Moon: ओसेज नेशन ही ‘ग्रेट प्लेन्स’ मध्ये राहणारी मध्य-पश्चिम अमेरिकन जमात आहे, त्यांना अमेरिकन इंडियन्स असेही म्हणतात. ओहायो आणि मिसिसिपी नदीच्या खोऱ्यांमध्ये इसवी सनाच्या ७ व्या शतकाच्या आसपास ही जमात विकसित झाली, याचे ऐतिहासिक पुरावे सापडतात. त्यामुळेच अमेरिकेतील मूळ निवासी अशी त्यांची ओळख आहे. परंतु जगभरातील इतर देशांप्रमाणे गोऱ्या- युरोपियन लोकांच्या वसाहती येथेही अस्तित्त्वात आल्या, आणि मूळ नागरिकांचे अस्तित्त्वच धोक्यात आले. त्याचीच करूण कहाणी सांगणारा वास्तवदर्शी चित्रपट मार्टिन चार्ल्स स्कोर्सेसे (अमेरिकन चित्रपट निर्माता) यांनी प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे, आजपासून तो भारतात प्रदर्शित होईल. त्या निमित्ताने ही मूळ घटना नेमकी काय होती, ते समजून घेण्याचा हा प्रयत्न. 

१९२० च्या दशकात अमेरिकेला हादरवून सोडणारे हत्याकांडाचे सत्र सुरु झाले होते. दक्षिण-मध्य अमेरिकेतील ओक्लाहोमा येथील मूळ अमेरिकन जमात असलेल्या ‘ओसेज नेशन’चे नृशंस हत्याकांड घडविण्यात आले. शेकडोंच्या संख्येने ठरवून हत्या करण्यात आल्या. ओसेज जमातीतील अनेकांच्या या हत्याकांडांनंतर गुप्तचर यंत्रणा असलेल्या एफबीआयची पुनर्रचना करण्यात आली, एफबीआय म्हणजेच पूर्वाश्रमीचे ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. अमेरिकेतील गौरवर्णियांनी येथील मूळ स्थानिकांकडून त्यांच्या जमिनींची आणि साधनस्रोतांची लूट केली. ती लूट व हत्याकांड उघडकीस आणण्याचे काम एफबीआयने केले. त्यावर आधारलेला मार्टिन स्कोर्सेस यांचा ‘किलर्स ऑफ द फ्लॉवर मून’ हा चित्रपट आज भारतात प्रदर्शित होत आहे. प्रसिद्ध लेखक डेव्हिड ग्रॅन यांच्या २०१७ साली प्रकाशित झालेल्या आणि गाजलेल्या पुस्तकावर ह चित्रपट आधारलेला आहे. हा चित्रपट तत्कालीन गोऱ्या दहशतवादाच्या राजवटीची कथा सांगतो. भारतात २७ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

Bhoomipujan of Naina projects tomorrow by Prime Minister
नैना’प्रकल्पांचे उद्या भूमिपूजन, पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजनानंतर शेतकऱ्यांचा रोष वाढण्याची शक्यता
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
BJP Navi Mumbai, Navi Mumbai Eknath Shinde,
नवी मुंबईत शिंदे समर्थकांच्या अभियानामुळे भाजपमध्ये अस्वस्थता
school van driver rapes school girl
पुण्यातील वानवडी लैंगिक अत्याचार प्रकरणात वापरलेल्या स्कूल व्हॅनची तोडफोड
sri lanka president leftist leader anura kumara dissanayake
लेख : श्रीलंकेसाठी ‘ग्रीक’ धडे!
In Badlapur case accused Akshay Shinde Thane alleged encounter
चकमकी अखेर पोलिसांवरच का शेकतात?
mixers juicers and tabs distribution to bandra women
‘खनिज क्षेत्र’ निधीतून मिक्सर, टॅबचे वाटप; खाणकाम उद्योगाने बाधित झालेल्यांचा निधी इतरत्र वळवण्यास विरोध
shivshardul percussion indian band in usa
अमेरिकेतील शिवशार्दूल पर्कशन्सच्या ढोल-ताशा गर्जनेची दशकपूर्ती

अधिक वाचा: व्यथा नर्तिकेच्या आयुष्याची … कथा घुंगरांच्या सामर्थ्याची ! (भाग १)

ओसेज त्यांच्याच जमिनी, परंतु अधिकार नाही

१८०३ साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन यांनी लुईसियाना राज्याचा प्रदेश फ्रेंचांकडून विकत घेतला. या जमिनीवर ओसेज जमातीचे वर्चस्व होते. ग्रॅन लिहितात, गोऱ्या वसाहतींनी ओसेज यांना त्यांचा प्रदेश सोडण्यास, कन्सासला जाण्यास त्यावेळी भाग पाडले गेले होते, अखेरीस ईशान्य ओक्लाहोमामध्ये करारानुसार राखीव जमिनींसाठी आरक्षण दिले गेले (असे असले तरी त्यांना देण्यात आलेले आरक्षण अन्यायकारकच होते, कारण त्यांच्याच जमिनी घेण्यासाठी त्यांना हे आरक्षण देण्यात आले होते.) या आरक्षणामुळे ओसेज यांनी कन्सास येथील जमिनी विकून मिळालेल्या पैशातून ओक्लाहोमामध्ये जमीन खरेदी केल्या. वाटपाच्या अटींबद्दल सरकारशी वाटाघाटींचा एक भाग म्हणून, ओसेज जमातीच्या नेत्यांनी “जमिनींच्या  खाली असलेले तेल, वायू, कोळसा किंवा इतर खनिजे” केवळ ओसेजसाठी राखीव आहेत, असे सांगितले. 

ओक्लाहोमा आणि तेल

ग्रॅन लिहितात, ते ज्या भूमीत गेले ती जागा अमेरिकेतील सर्वात मोठ्या तेलाच्या साठ्यांच्या वर होती. ओसेज आदिवासी समाजातील  प्रत्येक सदस्याला “जमातीच्या खनिज ट्रस्टमध्ये मुख्य हक्क किंवा वाटा मिळाला”. हे मुख्याधिकार केवळ कुटुंब किंवा विवाहाद्वारे वारशाने मिळू शकतात. इतरांना तेल मिळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ओसेज यांच्याकडून ते भाडेपट्ट्याने किंवा रॉयल्टीमार्फतच मिळणे शक्य होते. 

या तेल साठ्यांनी ओसेजला भरपूर संपत्ती मिळवून दिली; १९२३ सालीया जमातीने ३० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सहून अधिक पैसे कमावले आणि ते जगातील दरडोई सर्वाधिक श्रीमंत ठरले. ‘न्यूयॉर्क वीकली आउटलूक’ने त्यावेळी नमूद केल्याप्रमाणे, “(अमेरिकन) इंडियन उपाशी मरण्याऐवजी… स्थिर उत्पन्नाचा आनंद घेतात ज्यामुळे बँकर्सना त्यांच्या विषयी हेवा वाटत आहे.” यावरूनच ओसेज यांच्या सुबत्तेचा अंदाज यावा. 

अधिक वाचा: विश्लेषण: Camille Claudel: एका फ्रेंच (श)सकुंतलेची कहाणी नेमकी आहे तरी काय? 

किंबहुना तत्कालीन प्रकाशनांमध्ये “प्लुटोक्रॅटिक ओसेज” आणि “लाल लक्षाधीश” असे त्यांचे वर्णन केले जात असे, याशिवाय वीट आणि टेराकोटापासून तयार केलेले त्यांचे वाडे आणि झुंबरांसह, त्यांच्या हिऱ्याच्या अंगठ्या आणि फर कोट आणि शोफर्ड गाड्यांच्या तपशिलाने ही प्रकाशने व्यापलेली होती. अनेक पांढरपेशा वसाहतींनी तेलासाठी पैसे ओतले आणि ओसेजनेही अधिकाधिक जमीन भाड्याने देण्यास सुरुवात केली.

असे असले तरी ओसेज यांचे तेलाचे साठे आणि आर्थिक गुंतागुंतीवर पूर्णतः नियंत्रण नव्हते. त्यामुळे कायद्याच्या आधारे त्यांच्यावर ‘फायनान्शियल गार्डियन’ची देखरेखीसाठी नेमणूक करण्यात आली. ओसेज लोकांपैकी बरेच लोक ‘अक्षम’ मानले गेले आणि त्यांना एक गोरवर्णीय संरक्षक म्हणून नियुक्त केला गेला.

१९२१ साली काँग्रेसने आणखी कठोर कायदे लागू केले. “फायनान्शियल गार्डियन केवळ त्यांच्या वॉर्डांच्या आर्थिक गोष्टींवर देखरेख ठेवणार नाहीत; तर नवीन कायद्यानुसार, या ओसेज भारतीयांना ‘प्रतिबंधित’ देखील करण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्यापैकी प्रत्येकजण त्यांच्या ट्रस्ट फंडातून वार्षिक काही हजार डॉलर्सहून अधिक पैसे काढू शकत नाही,” असे ग्रॅन लिहितात.

हत्याकांडाचे सत्र 

पुस्तक आणि चित्रपट मॉली बुर्खार्ट  नावाच्या ओसेज महिलेच्या कुटुंबाभोवती केंद्रित आहेत. मॉलीने अर्नेस्ट बुर्खार्ट (चित्रपटात लिओनार्डो डिकॅप्रिओने  भूमिका साकारलेली) सोबत लग्न केले आहे, जो एक गौरवर्णीय आहे. तो विल्यम के हेल (रॉबर्ट डीनिरो) यांचा पुतण्या आहे, विल्यम के हेल आरक्षणातील एक श्रीमंत आणि प्रभावशाली सेटलर आहेत. १९१८ साली मोलीने तिची बहीण मिनी हिला एका विचित्र आजारात गमावले. तीन वर्षांनंतर, १९२१ सालच्या  मे महिन्यात तिची दुसरी बहीण अ‍ॅनी ब्राउन मृतावस्थेत सापडली, तिच्या डोक्यात गोळी लागली होती. घटनेच्या एक आठवडा आधी, दुसरा ओसेज चार्ल्स व्हाइटहॉर्न गायब झाला होता. इतकेच नाही तर गेल्या काही वर्षांत, मॉलीच्या कुटुंबातील सदस्यांसह अधिक ओसेज लोक मारले गेले होते. या हत्याकांडाचे तपास सत्र स्थानिक सैन्याने आणि भाड्याने घेतलेल्या खाजगी गुप्तहेरांद्वारे सुरू झाले, परंतु त्या तपासातून काहीही हाती लागले नाही. १९२१ ते २५ च्या दरम्यान ओसेज प्रदेशात अधिकृत मृतांची संख्या २४ वर पोहोचली. वृत्तपत्रांनी या कालावधीचे वर्णन ओसेज ‘रेन ऑफ टेरर’ असे केले होते.

अधिक वाचा: ‘भटक्या कुत्र्यांमुळे मुंबईत पेटली दंगल, इंग्रजांची झाली होती उपासमार’!

एफबीआयचा प्रवेश

ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनची स्थापना १९०८ साली राष्ट्राध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट यांनी केली होती, परंतु १९२० पर्यंत, या ब्युरो मध्ये “केवळ काहीशे एवढेच एजंट होते आणि केवळ निवडक क्षेत्रीय कार्यालये होती,” असे ग्रॅन लिहितात. डिसेंबर १९२४ साली जे. एडगर हूवर ब्यूरोचे संचालक झाले आणि ते “मोनोलिथिक फोर्स”चा आकार देण्यासाठी कारणीभूत ठरले. टॉम व्हाईट नावाच्या एजंटला १९२५ साली ओसेज कंट्रीमध्ये तैनात करण्यात आले होते. अखेरीस त्याला मोलीच्या कुटुंबातील सदस्यांच्या हत्येतील सर्वात महत्त्वाचा धागा सापडला. प्रत्येक सलग मृत्यूसह, तेलाच्या साठ्यांचे मुख्य हक्क हा कळीचा मुद्दा या हत्यांमागे होता.

तपासणी 

अनेक स्त्रोतांकडून पुरावे गोळा करून, व्हाईट आणि त्याच्या टीमने या हत्या हेलने केल्याचा शोध लावला. अर्नेस्ट हा कबुली देणारा पहिला होता. तो म्हणाला की, हेलच्या कामाबद्दल त्याला सर्व माहिती होती. सर्वच्या सर्व २४ खून हे काही व्हाईट  हेलशी जोडू शकला नाही, परंतु हेलला दोन हत्यांमधून फायदा झाला हे दाखवण्यासाठीचे दुवे त्याला सापडले. यामुळे अखेरीस, ओसेजच्या बाबतीत एक कायदा मंजूर करण्यात यश आले, कमीत कमी अर्धा ओसेज नसलेल्या कोणालाही जमातीच्या इतर सदस्याकडून वारसा हक्क मिळण्यास या कायद्याद्वारे प्रतिबंध करण्यात आला.

अधिकृत मृत्यूदराच्या पलीकडे

ग्रॅन लिहितात, अनेक विद्वान आणि अन्वेषकांनी मृतांच्या संख्येची पुष्टी करण्यासाठी ऑथेंटिक ओसेज इंडियन रोल बुकचा हवाला देऊन ओसेज मृतांची संख्या शेकडो नसली, तरी अधिक संख्येने नक्कीच होती याकडे लक्ष वेधले आहे. १९०७ ते १९२३ या सोळा वर्षांच्या कालावधीत, ६०५ ओसेजेस मरण पावले, सरासरी दर वर्षी ३८, वार्षिक मृत्यू दर हजारामागे १९ इतका होता. ग्रॅन यांनी ओसेजचे इतिहासकार ‘लुई एफ बर्न्स’ यांच्या विधानाचाही संदर्भ दिला. लुई एफ बर्न्स यांनी नमूद केले की, “मला एकही ओसेज कुटुंब माहीत नाही ज्याने या सर्व घटनांमध्ये कुटुंबातील किमान एक सदस्य गमावला नाही.”, ग्रॅन यांनी नमूद केले की, याशिवाय ब्युरोचा एक एजंट म्हणाला, ही मृतांची संख्या शेकडोंनी आहे! आता या चित्रपटाच्या निमित्ताने अंगावर काटा आणणाऱ्या या घटनांचा इतिहास पुन्हा एकदा जगासमोर येणार आहे!