जपानमधील हाचिको या कुत्र्याला जगभरात ओळखले जाते. त्याचा मालकाप्रति असलेला प्रामाणिकपणा, निष्ठा पाहून अनेक ठिकाणी त्याचे पुतळे उभारण्यात आले आहेत. हा कुत्रा आज हयात नाही. मात्र, दरवर्षी त्याचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या कुत्र्यावर जपानमध्ये अनेक चित्रपट निघाले आहेत. याच पार्श्वभूमीवर जगातील सर्वांत इमानदार, मालकाप्रति निष्ठा असलेला कुत्रा म्हणून ओळख असलेल्या हाचिको या आगळ्यावेगळ्या कुत्र्याची कहाणी काय आहे? जपानमध्ये या कुत्र्याकडे एवढे आदराने का पाहिले जाते? हे जाणून घेऊ या….

पुतळा पाहण्यासाठी आजही अनेक लोक करतात गर्दी

जपानमधील शिबुया रेल्वेस्थानक परिसरात हाचिको नावाच्या कुत्र्याचा एक पुतळा आहे. या पुतळ्याला पाहण्यासाठी आजही अनेक जण येथे गर्दी करतात. या कुत्र्याला जगातील सर्वाधिक प्रामाणिक व निष्ठावान कुत्र्यांपैकी एक मानले जाते. आपला मालक कधीतरी येईल, असे या कुत्र्याला वाटायचे. विशेष म्हणजे या कुत्र्याने मरेपर्यंत रेल्वेस्थानकावर आपल्या मालकाची वाट पाहिली होती.

66 people died in floods in Nepal
नेपाळमधील पुरात ६६ जणांचा मृत्यू, ७९ बेपत्ता
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
2nd October Gandhi Jayanti Physical Mental Violence Religion
बदलतं जग आणि महात्मा
Anna Sebastian Perayil, EY,
शहरबात… ॲनाच्या मृत्यूच्या निमित्ताने…
After 75 years of independence ST bus started for the first time in Naxal-affected Gardewada
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनतर नक्षलग्रस्त गर्देवाडात ‘लालपरी’ अवतरली; गावात पहिल्यांदाच…
nagpur ambazari lake overflowed flood situation completes one year
नागपूरच्या महापुराची वर्षपूर्ती! भय इथले संपत नाही…
police registered rape case against boy and arrested him after victim s husband complaint
धक्‍कादायक ! नात्याला काळीमा फासणारी ही संतापजनक घटना
Chhatrapati Sambhajinagar, developed India,
विकसित भारताचा रस्ता छत्रपती संभाजीनगरातून

हाचिको कुत्रा कोण आहे?

जपानमधील अकिता प्रांतातील ऑडेट या शहरात नोव्हेंबर २०१३ मध्ये हाचिका या कुत्र्याचा जन्म झाला होता. हा कुत्रा टोकियो विद्यापीठातील कृषी शास्त्रज्ञ हिदेसाबुरो युएनो यांना ३० येनला (जपानमधील चलन) विकण्यात आला होता. अकिता जातीच्या या कुत्र्याला नंतर युएनो यांनी रेल्वेमार्गाने शिबुया येथे आणले. या कुत्र्याचे नाव हाची असे ठेवण्यात आले. पुढे युएनो यांच्या विद्यार्थ्यांनी या कुत्र्याचा सम्नान व आदर राखण्याच्या दृष्टीने त्याच्या नावापुढे ‘को’ हा शब्द लावला. त्यामुळे हा कुत्रा सध्या हाचिको नावाने ओळखला जातो. ‘हाची : द ट्रुथ ऑफ द लाइफ अँड लेजेंड ऑफ द मोस्ट फेमस डॉग इन जपान’ या पुस्तकात लेखक मायुमी इटोह यांनी हाचिको या कुत्र्याबद्दल सविस्तर लिहिलेले आहे. या पुस्तकात युएनो आणि त्यांचे साथीदार हाचिको या कुत्र्याची कशी काळजी घ्यायचे, याबाबत सविस्तर लिहिलेले आहे.

‘हाचिको’ रेल्वेस्थानकावर जाऊन मालकाची वाट पाहायचा

कृषिशास्त्रातील पदवी संपादन केल्यानंतर युएनो यांनी टोक्यो इंपेरियल युनिव्हर्सिटी येथे अध्यापनाचे काम सुरू केले. या विद्यापीठात जाण्यासाठी ते शिबुया येथून रोज रेल्वेने प्रवास कायचे. यावेळी हाचिकोसह अन्य दोन कुत्रेही त्यांच्यासोबत असायचे. हे तिन्ही कुत्रे युएनो कामावरून परत येण्याची वाट पाहायचे. मात्र, २१ मे १९२५ रोजी युएनो यांचे वयाच्या ५३ व्या वर्षी सेरेब्रल हॅमरेजमुळे निधन झाले. त्यानंतर हाचिको हा कुत्रा वेगवेगळ्या मालकांकडे राहिला. शेवटी या कुत्र्याला युएनो यांच्या बागेची काळजी घेणाऱ्याकडे सोपवण्यात आले. मात्र, युएनो ज्या वेळेला घरी परतायचे, त्याच वेळी ‘हाचिको’ रेल्वेस्थानकावर जाऊन त्यांची वाट पाहायचा. एक दिवस तरी माझा मालक परत येईल, असे त्याला वाटायचे.

हाचिको कुत्रा जपानमध्ये प्रसिद्ध कसा झाला?

हाचिको हा कुत्रा रोज त्याच्या मालकाची वाट पाहण्यासाठी रेल्वेस्थानकावर यायचा; मात्र ते काही दिसायचे नाहीत. स्थानकावरील कर्मचारीही या कुत्र्याला त्रासले होते. मात्र, युएनो यांच्या हिरोकिची सैटो या विद्यार्थ्याने अकितो जातीच्या कुत्र्याच्या प्रामाणिकपणाबद्दल वेगवेगळ्या नियतकालिकांत अनेक लेख लिहिले होते. १९३२ साली त्यांनी अशाही शिमबून या वृत्तपत्रात असाच एक लेख लिहिला होता. त्यानंतर हाचिको या कुत्र्याची चर्चा होऊ लागली. हाचिको कुत्र्यामुळे या रेल्वेस्थानकाला वेगवेगळ्या देणग्या मिळू लागल्या. या कुत्र्याला पाहण्यासाठी लांबून लांबून लोक यायचे. १९३५ साली वयाच्या ११ व्या वर्षी हाचिको या कुत्र्याचा कॅन्सर, तसेच फिलारियासिस संसर्गामुळे मृत्यू झाला. त्याच्या अंत्ययात्रेत शेकडो लोक सामील झाले होते. बौद्ध भिक्खूंनीही या कुत्र्यासाठी प्रार्थना केली होती.

दुसऱ्या महायुद्धात पुतळा झाला होता खराब

मृत्यूनंतरही हा कुत्रा आजही पुतळ्याच्या माध्यमातून जिवंत आहे. १९३४ साली तेरू अँडो यांनी शिबुया या रेल्वेस्थानकाच्या बाहेर हाचिको ब्रॉन्झ धातूचा एक पुतळा उभारला होता. मात्र, दुसऱ्या महायुद्धादरम्यान हा पुतळा खराब झाला. त्यांतर अँडो यांच्या मुलाने १९४८ साली तेथे नव्या पुतळ्याची स्थापना केली. शिबुया रेल्वेस्थानकाच्या बाहेर हा पुतळा आजही पाहायला मिळतो. २०१५ साली हाचिको कुत्र्याच्या ८० व्या स्मृतिदिनामित्त टोक्यो विद्यापीठातील कृषिशास्त्र विभागाने या कुत्र्याच्या ब्रॉन्झ धातूमधील पुतळ्याचे अनावरण केले होते.

हाचिको कुत्र्यावर अनेक पुस्तके, चित्रपटांची निर्मिती

हाचिकोच्या मृत्यूनंतर त्याची त्वचा जतन करण्यात आली होती. अजूनही टोक्यो येथील राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयात या कुत्र्याची टॅक्सिडर्मी (जतन केलेले शरीर) पाहायला मिळते. अनेक शाळांत छोट्या मुलांना हाचिकोच्या प्रामाणिकपणाची गोष्ट सांगितली जाते. या कुत्र्याची कथा सांगणारी अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अनेक चित्रपटांचीही निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यापैकी हाची : अ डॉग्स टेल, हाचिको मोनोगाटरी अशी काही चित्रपटांची नावे आहेत.