केंद्र सरकारने सैन्यभरतीसाठी जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेविरोधात सुरुवातीला देशभरातून विरोध झाला. अनेक ठिकाणी तरुणांनी हिंसक आंदोलन केले. त्यानंतर पहिल्या वर्षासाठी या योजनेतील वयोगट २१ वरुन २३ वर करण्यात आला. सध्या अग्निवीर योजनेच्या पहिल्या बॅचचे प्रशिक्षण सुरु झाले आहे. विशेष म्हणजे यात अनेक युवतींचा देखील समावेश आहे. भूदल, हवाई दल आणि नौदल अशी विभागणी करुन तीनही दलासाठी वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण सुरु असून सहा महिन्यांपर्यंत हे प्रशिक्षण चालेल. त्यानंतर अग्निवीरांना प्रत्यक्ष सैन्यात काम करण्याची संधी दिली जाईल. जून २०२२ मध्ये केंद्र सरकारने अग्निपथ योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत अग्निवीरांना चार वर्षांपर्यंत सैन्यात काम करण्यासाठी भरती केले आहे. तीनही दलांमध्ये अग्निवीरांना काम करण्याची संधी मिळेल. या योजनेत सहभागी होण्यासाठी १७.५ ते २१ वर्ष असा वयोगट निश्चित करण्यात आला आहे. पुढच्यावर्षीपासून मात्र २१ वर्षांची मर्यादा पाळली जाईल. चार वर्ष सैन्यात काम केल्यानंतर २५ टक्के अग्निवीरांना सैन्यात सामावून घेतले जाईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा