– विनायक डिगे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
राष्ट्रीय एक्झिट परीक्षेची (नेक्स्ट) सुरुवात डिसेंबर २०२३ पासून करण्यात येणार आहे. वैद्यकीय क्षेत्राच्या अभ्यासक्रमांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आणि विषयवार गुणदान जाणून घेतल्यास विद्यार्थ्यांना अभ्यासाची तयारी करणे सोपे होईल.
‘नेक्स्ट’ कशी असेल?
‘नेक्स्ट’ दोन टप्प्यांत होईल. पहिला टप्पा हा सिद्धांतावर, तर दुसरा टप्पा हा प्रात्यक्षिकांवर आधारित असेल. ‘नेक्स्ट १’ ही परीक्षा ‘एमबीबीएस’च्या अंतिम वर्षाच्या परीक्षेची जागा घेईल. सध्या ‘एमबीबीएस’ची अंतिम परीक्षा ही विद्यापीठ स्तरावर घेण्यात येते. भारतातील वैद्यकीय शिक्षणाचे ‘नेक्स्ट’मुळे प्रमाणीकरण होईल.
‘नेक्स्ट’१ परीक्षा कधी देता येईल?
‘नेक्स्ट १’ ही परीक्षा अखिल भारतीय स्तरावर केंद्रीय पद्धतीने घेण्यात येईल. ‘एमबीबीएस’च्या अंतिम वर्षानंतर आणि इंटर्नशिप सुरू करण्यापूर्वी विद्यार्थी ही परीक्षा देतील. ही परीक्षा उत्तीर्ण होणारे विद्यार्थीच इंटर्नशिपसाठी पात्र ठरतील. या परीक्षेत मिळणारे गुण हे देशातील सरकारी व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील एमडी, एमएस, डीएनबी आणि डिप्लोमा या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. ‘एमबीबीएस’ परीक्षेला प्रवेश घेतल्यानंतर पुढील १० वर्षांच्या आत ‘नेक्स्ट’ परीक्षा देणे आवश्यक आहे. याशिवाय ‘नेक्स्ट’ परीक्षा देण्याच्या संख्येवर कोणतेही नियंत्रण असणार नाही. ही १० वर्षांची मर्यादा फक्त ‘नेक्स्ट’ परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आहे.
‘नेक्स्ट’ १ परीक्षेचे महत्त्व काय?
‘नेक्स्ट’ १ परीक्षेसाठी ५० पर्सेंटाइल मिळवणे बंधनकारक आहे. ज्या विद्यार्थ्याला ‘नेक्स्ट’ १ परीक्षेमध्ये ५० पर्सेंटाइल नाहीत ते विद्यार्थी इंटर्नशिपसाठी पात्र ठरतील मात्र इंटर्नशिपनंतर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ‘नेक्स्ट’ १ मध्ये मिळालेल्या गुणांचा विचार केला जाईल. ‘नेक्स्ट’ १ मध्ये मिळालेले गुण हे पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पुढील तीन वर्षे वैध असतील. त्यामुळे विद्यार्थ्यांची इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर ‘नेक्स्ट’ १ मधील गुणांच्या आधारे पुढील तीन वर्षांत पदव्युत्तर अभ्यासक्रमाला अर्ज करण्यासाठी पात्र ठरेल.
‘नेक्स्ट’ १चा अभ्यासक्रम कसा असेल?
‘नेक्स्ट’ १ सिद्धांतावर आधारित असेल. ‘नेक्स्ट’ १ च्या अभ्यासक्रमात नवीन भारतीय एमबीबीएस अभ्यासक्रमातील सर्व १९ विषयांचा समावेश असेल. त्यामुळे ‘नेक्स्ट’१ मध्ये पहिल्या वर्षांपासून शेवटच्या वर्षांपर्यंतचे शिकवले जाणारे सर्व प्रीक्लिनिकल, पॅराक्लिनिकल आणि क्लिनिकल विषयांचा समावेश असेल.
हेही वाचा : विश्लेषण: शाळेत पुन्हा परीक्षा सुरू केल्याचे परिणाम काय?
‘नेक्स्ट’ १ चे स्वरूप कसे असेल?
‘नेक्स्ट’ १ मध्ये सिद्धांतावर आधारित बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न असतील. त्याचे एक योग्य उत्तर देणे अपेक्षित आहे. सर्व विषयांचा अभ्यासक्रम ‘नेक्स्ट’ १ च्या मध्ये समाविष्ट करण्यात आला असला तरी गुणदान नीट पीजी परीक्षा किंवा एमसीआयपेक्षा वेगळे असेल. परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा (एफएमजीई) क्लिनिकल विषयांना प्री आणि पॅराक्लिनिकल विषयांपेक्षा तुलनेत जास्त गुण असतील.
परदेशी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘नेक्स्ट’ महत्त्वपूर्ण का?
ज्या विद्यार्थ्यांना भारतात वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळत नाही किंवा ज्यांना भारतातील वैद्यकीय शिक्षणाचा खर्च परवडत नाही किंवा ज्यांना परदेशातील मोठ्या विद्यापीठातून वैद्यकीय शिक्षण घ्यायची इच्छा असते, असे विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी परेदशाची वाट धरतात. मात्र या विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात प्रॅक्टिस करायची असल्यास त्यांना परदेशी वैद्यकीय पदवीधर परीक्षा (एफएमजीई) द्यावी लागते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय त्यांना प्रॅक्टिस करता येत नाही. भारतीय वैद्यक परिषदेच्या माध्यमातून ही परीक्षा घेण्यात येते. २००२ पासून ही परीक्षा घेण्यात येत आहे. ही परीक्षा वर्षातून दोन वेळा जून आणि डिसेंबरमध्ये घेण्यात येते. आता या परीक्षेऐवजीही ‘नेक्स्ट’ लागू करण्याचा विचार सुरू आहे.
हेही वाचा : लोकसंख्यावाढीसाठी दक्षिण कोरिया करणार विद्यार्थ्यांची परीक्षा सोपी; प्रजनन दर आणि परीक्षेचा काय संबंध?
‘नेक्स्ट’ २ कशी असेल?
‘नेक्स्ट’ २ ही एक सर्वसमावेशक प्रात्यक्षिक किंवा क्लिनिकल परीक्षा असेल. ती इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर घेतली जाईल. त्यात वैद्यकीय निदान, रुग्णाची तपासणी आणि क्लिनिकल निर्णय घेण्याबराबेरच भारतातील आधुनिक वैद्यक पद्धतीच्या सरावासाठी आवश्यक व्यावहारिक आणि संप्रेषण कौशल्यांचे मूल्यमापन केले जाईल. ‘नेक्स्ट’ २ विद्यापीठ स्तरावर घेण्यात येईल. वैद्यकीय आणि संलग्न विषय, शस्त्रक्रिया आणि संबंधित विषय, प्रसूती आणि स्त्रीरोग, बालरोग, नेत्ररोग, अस्थिव्यंगशास्त्र, शारीरिक औषध आणि पुनर्वसन या विषयांवर आधारित ही परीक्षा असेल. ‘नेक्स्ट’ १ प्रमाणे अखिल भारतीय स्तरावर ही परीक्षा होणार नाही. इंटर्नशिप झाल्यानंतरच ‘नेक्स्ट’ २ साठी विद्यार्थी पात्र ठरतील. त्यामुळे या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण एक वर्ष इंटर्नशिप करावी लागणार आहे. ‘नेक्स्ट’ १ चे कोणतेही गुण ‘नेक्स्ट’ २ साठी ग्राह्य धरले जाणार नाहीत. त्यामुळे ‘नेक्स्ट’ २ ही पदव्युत्तर प्रवेशासाठी फक्त पात्रता परीक्षा असेल.