राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमधील रस्त्यांची तुलना थेट खासदार हेमा मालिनी यांच्या गालाशी केली. तसेच त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना टोला लगावला. मात्र, गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्यावरून राज्यात मोठा गदारोळ झाला. भाजपासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही गुलाबराव पाटलांवर टीका केली. स्वतः हेमा मालिनी यांनीही यावर प्रतिक्रिया दिल्यानं या विषयाची चर्चा देशातही झाली. याच प्रकरणात सुरुवातीपासून नेमकं काय झालं याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट.

गुलाबराव काय म्हणाले होते?

नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात शिवसेना नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सभा घेतली. या सभेत आपल्या मतदारसंघातील रस्ते आपण हेमा मालिनींच्या गालासारखे केले असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं.

State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
massive agitation organised against mla bhaskar jadhav in vikas jadhav attack case
हल्ल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास जाधव आक्रमक, आमदार भास्कर जाधवांविरोधात विराट मोर्च्याचे आयोजन
bahujan vikas aghadi future in vasai virar after defeat all three candidates along with hitendra thakur
वसई-विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बविआचे भवितव्य काय?

“माझं आव्हान आहे ३० वर्ष राहिलेल्या आमदाराला, माझ्या धरणगावला या आणि तिथले रस्ते पाहा. सगळे रोड-रस्ते अभिनेत्री हेमा मालिनीच्या गालासारखे आहेत. जर रस्ते तसे नसतील तर राजीनामा देऊन टाकेन. महाराष्ट्राला ज्ञान काय शिकवताय, पहिले बोदवडचा रस्ता तरी चांगला करा. हा योगायोग आहे की या जळगाव जिल्ह्याचं भाग्य खूप चांगलं राहिलंय. इथला कोणताही आमदार मंत्री झाल्यावर पाण्याचीच खाती मिळाली. एकनाथ खडसे जलसंपदा मंत्री, गिरीश महाजन जलसंपदा मंत्री आणि गुलाबराव पाटील पाणीपुरवठा मंत्री झाले,” असं गुलाबराव पाटील सभेत बोलताना म्हणाले होते.

चित्रा वाघ काय म्हणाल्या होत्या?

गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्यावर भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी सडकून टीका केली. चित्रा वाघ म्हणाल्या, “गुलाबराव पाटील हा राज्याचा पाटील आहे. शिवसेनेच्या नेत्यांना नेमकं काय झालंय? संजय राऊतांनंतर आता गुलाबराव पाटील यांनी खासदार हेमा मालिनी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केलंय. गुलाबराव पाटील आणि रांझ्याचा पाटील यांची वृत्ती एकच आहे. रांझ्याच्या पाटलाची पाटीलकी छत्रपती शिवाजी महाराजांनी काढून घेतली होती.” हे सरकार गुलाबराव पाटलांचं मंत्रीपद काढून घेणार आहे का? असा सवाल चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलाय.

Koo App
शिवीगाळ करणारे संजय राऊत उजळ माथ्यानं फिरताहेत.. गुलाबराव पाटलांना हेमा मालिनीचे गाल दिसताहेत.. पण पोलिस यंत्रणांना यांत महिलांचा विनयभंग दिसत नाही… मी #maharashtra_hmo ना आवाहन करतीये..तात्काळ गुन्हा दाखल करा..नाहीतर गाल पाहणा-यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.. #CMOMaharashtra #HMOMaharashtra #DGPMaharashtra #BJPMaharashtra #BJPMumbai
View attached media content
– Chitra Kishor Wagh (@ChitraKishorWaghCRKB) 19 Dec 2021

“सर्वज्ञांनी संजय राऊत शिवीगाळ करूनही उजळ माथ्यानं महाराष्ट्रभर फिरत आहेत. दुसरीकडे गुलाबराव पाटलांना हेमा मालिनीचे गाल दिसताहेत, पण महाराष्ट्राच्या पोलीस यंत्रणांना यात महिलांचा विनयभंग दिसत नाही. हे दुर्दैव आहे. माझं महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना आवाहन आहे की या गुलाबराव पाटलांविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करा. नाहीतर गाल पाहणाऱ्यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही,” असंही चित्रा वाघ म्हणाल्या.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर काय म्हणाल्या?

गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणादरम्यान विकास कामासंदर्भात बोलत असताना अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या गालांप्रमाणे गुळगुळीत रस्ते बनवण्याच्या वक्तव्य केलं. यावर महिला आयोगातर्फे तीव्र आक्षेप नोंदविण्यात आला होता. या वक्तव्यावर गुलाबराव पाटील यांनी माफी न मागितल्यास त्यांच्यावर कायदेशीर नोटीस पाठवण्याचा इशारा देखील महिला आयोगातर्फे रूपाली चाकणकर यांनी दिलेला होता.

हेमा मालिनी काय म्हणाल्या?

हेमा मालिनी यांना गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्यावर विचारलं असता त्या म्हणाल्या, “माझे गाल आणि रस्त्यांची तुलना करण्याचा ट्रेंड काही वर्षांपूर्वी लालूजींनी सुरू केला होता. तो आजही सुरू आहे. त्यानंतर सर्वजण असं बोलू लागले. एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीने असं वक्तव्य केलं तर हरकत नाही. पण एखाद्या खासदार किंवा आमदाराने अशाप्रकारे बोलणं योग्य नाही.”

अखेर गुलाबराव पाटलांकडून वादग्रस्त वक्तव्यावर जाहीर माफी

अखेर मंत्री गुलाबराव पाटील यांनी धुळे जिल्ह्यातील साक्री येथे दिलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत जाहीर माफी मागितली. भाषणातील माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करत माफी मागतो, असे यावेळी गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले.

गुलाबराव पाटील म्हणाले, “जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील एका कार्यक्रमात मी रस्त्यांबाबत वक्तव्य केले होते. चांगले रस्ते असावेत अशी अपेक्षा त्यामागे होती. परंतु माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो.”

हेही वाचा : “…तर गाल पाहणाऱ्यांचे थोबाड फोडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही”, संजय राऊत-गुलाबराव पाटलांचं नाव घेत चित्रा वाघांचा इशारा

“हेमा मालिनी यांच्याबद्दल आपल्या मनात नेहमीच आदर”

“प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांच्याबद्दल आपल्या मनात नेहमीच आदर आहे. तसेच महिलांविषयीही आपल्या मनात नेहमी आदराचीच भावना होती, आजही आहे आणि यापुढेही राहील,” असेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले.

Story img Loader