चीनच्या अध्यक्षपदी क्षी जिनपींग यांची पुन्हा एकदा निवड झाल्यामुळे चीनमध्ये तसेच इतर देशांतही आंदोलन केले जात आहे. चीनमधील ‘झिरो कोव्हिड पॉलिसी’ला विरोध केला जात आहे. तसेच जिनपिंग यांना पदच्यूत्त करावे, अशी मागणी केली जात आहे. चीनची राजधानी बिजिंग येथे झळकलेल्या काही पोस्टर्समुळे हे आंदोलन पेटले आहे. दरम्यान, हे आंदोलन का होत आहे? आंदोलनामागे कोण आहे? हे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात.
मागील आठवड्यात १३ ऑक्टोबर रोजी हैदियान जिल्ह्यातील सिटाँग ब्रिजवर एका अज्ञात व्यक्तीने दोन मोठे पोस्टर्स लावले होते. हे पोस्टर्स लावणाऱ्याला आता ‘ब्रिज मॅन’ म्हटले जात आहे. डोक्यावर बांधकाम करताना वापरले जाणारे हेल्मेट आणि टी शर्ट परिधान करून त्याने हे पोस्टर्स लावले होते. तसेच ध्वनिक्षेपकात घोषणाबाजी करत त्याने या पुलावर टायर्स जाळली होती. याबाबातचे वृत्त बीबीसीने दिले आहे. या ब्रिज मॅनने चीनमधील झिरो कोव्हिड पॉलिसी आणि क्षी जिनपिंग यांच्याविरोधात घोषणाबाजी केली होती. ब्रिज मॅनच्या याच आंदोलनामुळे चीमध्ये क्षी जिनपिंग यांच्याविरोधात आंदोलन उभे राहिले आहे.
हेही वाचा >>>> विश्लेषण : शाहीद महमूद आहे तरी कोण? ज्याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यात चीनने UN मध्ये आडकाठी आणली
बॅनरवर काय लिहिलेले होते?
दी गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार या बॅनवर क्षी जिनपिंग यांना पदच्यूत्त करण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच चीनच्या झिरो कोव्हिड पॉलिसीला विरोध करण्यात आला होता. “मला पीसीआर टेस्ट नव्हे तर अन्न हवे आहे. आम्हाला लॉकडाऊन नव्हे तर स्वातंत्र्य हवे आहे. आम्हाला खोटे बोलणे नकोय तर सन्मान हवाय. आम्हाला सांस्कृतिक क्रांती नव्हे तर सुधारणा हव्या आहेत. आम्हाला नेता नव्हे तर मत हवे आहे. आम्हाला गुलाम नव्हे तर नागरिक हवे आहेत,” असे या बॅनरवर लिहिलेले होते.
हेही वाचा >>>> विश्लेषण: ओला दुष्काळ म्हणजे नेमकं काय? असा दुष्काळग्रस्त भाग कसा जाहीर करतात? ओल्या दुष्काळाचे निकष कोणते?
ब्रिज मॅनची चर्चा झाल्यानंतर चीन सरकारने या आंदोलनाशी निगडित असलेले सर्व व्हिडीओ सोशल मीडियावरून हटवण्याचे आदेश दिले. तसेच फोटो आणि या आंदोलनाशी संदर्भ असलेले शब्दही वापरण्यास मनाई करण्याती आली. उदाहरणादाखल हैदियान, बिजिंग प्रोस्टेस्टर्स, सिटॉंग ब्रिज अशा प्रकारचे सर्व शब्द सोशल मीडियावरून हटवण्यात आले आहेत. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार हिरो, करेज, ब्रिज या शब्दांचा सोशल मीडियावर वापर करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. ब्रिज मॅनच्या या आंदोलनानंतर बिजिंग शहरातील सर्व पुलांवर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच ठिकठिकाणी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
हेही वाचा >>>> विश्लेषण : केरळच्या राज्यपालांची मंत्र्याला बडतर्फ करण्याची धमकी; कायद्याने खरचं हे अधिकार आहेत?
‘ब्लूमबर्ग’च्या वृत्तानुसार, VoiceofCN हा लोकशाहीचं समर्थन करणाऱ्या अज्ञात चिनी नागरिकांचा एक गट असून त्यांचं एक इन्स्टाग्राम अकाऊंट आहे. VoiceofCN च्या म्हणण्यानुसार चीनमध्ये हे आंदोलन बिजिंगसोबतच अन्य शहरांमध्येही पसरले आहे. शेंझहेन, बिजिंग, गुआंगझू, हाँगकाँग या शहरांत क्षी जिनपिंग यांच्याविरोधात आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात तरुण, विद्यार्थी सक्रियपणे सहभागी होत असल्याचे दिसत आहे. प्रसाधनगृहांमध्ये या आंदोलनासंदर्भातील पोस्टर्स लावले जात आहेत. प्रसाधनगृहांत सीसीटीव्ही नसल्यामुळे आंदोलकांनी आपला निषेध व्यक्त करण्यासाठी हा मार्ग स्वीकारला आहे.
हेही वाचा >>>> विश्लेषण : रेवडी संस्कृती, त्याभोवतीचा वाद आणि इतिहास काय आहे?
आंदोलनाची धग अन्य देशांमध्ये
बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार बिजिंग येथील ब्रिजवर ज्या प्रमाणे पोस्टर लावून आंदोलन करण्यात आले होते, अगदी त्याच पद्धतीने अमेरिका, ब्रिटन, युरोप, ऑस्ट्रेलिया देशातील वेगवेगळ्या विद्यापीठांतही चीनविरोधात आंदोलन केले जात आहे. “आम्ही चीनमधील लोक आहोत. कोणत्याही बंधनाशिवाय आमच्या मनातील संदेश आम्हाला पोहोचवायचा आहे,” अशा आशयाचे पोस्टर अमेरिकेतील मैने येथील कोल्बे महाविद्यालयात लावण्यात आले होते. ‘जिनपिंग आमचे राष्ट्राध्यक्ष नाहीत,’ ‘बाय बाय जिनपिंग’ अशा आशयाचेही पोस्टर्स काही ठिकाणी लावण्यात आले होते.