अनेक लोक भविष्यासाठी आर्थिक तजवीज म्हणून एलआयसी विमा काढतात, मात्र आर्थिक अडचण आल्यानंतर काहींना विम्याचा कालावधी पूर्ण करण्याआधीच ही ‘पॉलिसी’ बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागतो. अशावेळी पॉलिसी नेमकी कशी बंद करायची? त्याचे नियम काय असतात? कितव्या वर्षी पॉलिसी बंद केल्यास भरलेल्या रकमेतील किती रक्कम परत मिळते आणि किती नुकसान सहन करावं लागतं याबाबतचं हे विश्लेषण…

पॉलिसीचा कालावधी पूर्ण होण्याआधीच बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ग्राहकांना परताव्याच्या स्वरुपात मिळणारी रक्कम म्हणजे सरेंडर व्हॅल्यू. कुणाला किती सरेंडर व्हॅल्यू मिळणार हे त्या व्यक्तीने विमा काढून किती वर्षे झाले आणि किती रक्कम भरली यावरच अवलंबून असतं. यानुसार, विमाधारकाने तीन वर्षे हप्ता भरल्यानंतर पॉलिसी बंद केली तर त्याला सरेंडर व्हॅल्यू मिळते. मात्र, विमा सुरू केल्यानंतर तीन वर्षांच्या आधीच पॉलिसी बंद केली तर सरेंडर व्हॅल्यू म्हणून कोणतीही रक्कम मिळत नाही.

TCS , quarterly results , Infosys, Wipro,
ससा कासवाची गोष्ट : ‘टीसीएस’ला फळले… इन्फोसिस, विप्रोच्या तिमाही निकालांचे काय ?
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Third consecutive losing session for Sensex Nifty
‘आयटी’ वगळता सारेच घसरणीला! सेन्सेक्स-निफ्टीसाठी सलग तिसरे नुकसानीचे सत्र
Why is desulfurization mandatory to reduce air pollution in thermal power plants and how much will it increase electricity prices
विश्लेषण: ‘डीसल्फरायझेशन’ हवे की वीज दरवाढ… की प्रदूषण?
Tamil Nadu, Governor Ravi, Governor Ravi address,
विश्लेषण : तमिळनाडूत सलग तिसऱ्या वर्षी राज्यपाल रवी यांचा अभिभाषणापूर्वीच सभात्याग, राज्यपालांचे अभिभाषण बंधनकारक असते का?
State orders inspection of hospitals registered under Nursing Home Act
खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप! आरोग्य विभागाकडून राज्यभरात तपासणी मोहीम; जिल्हास्तरावर पथकांची नियुक्ती
Loksatta editorial on allegations on dhananjay munde in beed sarpanch santosh Deshmukh murder case
अग्रलेख: वाल्मीकींचे वाल्या!
Prakash Abitkar, Prakash Abitkar Pune, Officer Action ,
काम न करणाऱ्यांची गय नाही! कामचुकार अधिकाऱ्यांना आरोग्यमंत्र्यांनी घेतले फैलावर

किती पैसे परत मिळतात?

पॉलिसी तिच्या निर्धारित कालावधीच्या आधी बंद केल्यास विमाधारकाला मोठा आर्थिक नुकसान सहन करावं लागतं. तुम्ही सलग तीन वर्षे विमा हप्ता भरला तर सरेंडर व्हॅल्यू मिळण्यास विमाधारक पात्र होतो. अशा परिस्थितीत त्याला भरलेल्या हप्त्याच्या ३० टक्के मिळते. मात्र, यात विम्याच्या पहिल्या हप्त्याचा समावेश नसतो. पहिला हप्ता सोडून जी रक्कम भरली असेल त्याच्या ३० टक्के रक्कम सरेंडर व्हॅल्यू म्हणून मिलते. विशेष म्हणजे सरेंडर व्हॅल्यू ठरताना अतिरिक्त हप्ता, कर कपात किंवा विम्यावर एलआयसीकडून मिळणारा बोनस याचा समावेश नसतो.

विमा बंद करण्यासाठी काय करावं लागतं?

तुम्हाला तुमचा विमा बंद करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला एलआयसीचा सरेंडर फॉर्म आणि एनईएफटी फॉर्म भरणे आवश्यक आहे. यासोबतच विमाधारकाला आपल्या पॅन कार्डची कॉपी व पॉलिसीचे मूळ कागदपत्रे जोडावी लागतात. तसेच आपण ही पॉलिसी का सोडत आहोत याचं कारणही लिखित स्वरुपात द्यावं लागतं.

हेही वाचा : विश्लेषण : एलआयसी आयपीओचा शेअर बाजारावर काय परिणाम?

अर्ज करताना कोणत्या कागदपत्रांची गरज?

१. मूळ पॉलिसी बाँड
२. एलआयसी सरेंडर फॉर्म क्र. ५०७४
३. बँकेच्या खात्याचे तपशील
४. एलआयसीचा एनईएफटी फॉर्म (सरेंडर फॉर्मचा वापर करत नसाल तर)
५. आधार कार्ड, चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), पॅन कार्डसारखे मूळ ओळखपत्र

Story img Loader