सध्या जगभरात करोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनने धुमाकुळ घातला आहे. भारतातही झपाट्याने करोना रूग्णांची संख्या वाढते आहे. विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणात संसर्ग क्षमता असलेल्या या ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाली आहे की नाही हे ओळखण्यासाठी अँटीजन किंवा आरटीपीसीआर चाचणी पुरेशी नाही. हा संसर्ग शोधण्यासाठी विशेष अशी जिनोम सिक्वेंसिंग चाचणी करावी लागते. यानंतर हा संसर्ग झालाय की नाही हे स्पष्ट होतं. त्यामुळेच अनेकांना या जिनोम सिक्वेंसिंग चाचणीविषयी कुतुहल निर्माण झालं आहे. जिनोम सिक्वेंसिंग म्हणजे काय, इतर चाचण्यांमध्ये न सापडणारा ओमायक्रॉन विषाणू या चाचणीत कसा सापडतो आणि ही चाचणी कशी करतात असे प्रश्न अनेकांच्या मनात आहेत. याच प्रश्नांचा हा खास आढावा.

जिनोम सिक्वेंसिंग काय आहे?

जिनोम सिक्वेंसिंग ही अशी चाचणी आहे ज्यामध्ये आरएनए (RNA) रेणूचा उपयोग करून अनुवंशिक माहिती मिळवली जाते. यामुळे संसर्ग झालेल्या विषाणूची महत्त्वपूर्ण माहिती मिळते. याशिवाय या विषाणूत किती बदल झालेत, तो शरीरित कसा प्रवेश करतो आणि त्याच्या संसर्ग क्षमता काय अशी सर्व माहिती या तंत्रज्ञानाचा वापर करून शोधता येतं. हे तंत्र शिकण्यासाठी आधी करोना विषाणू शरीरात प्रवेश कसा करतो हे समजून घेणं गरजेचं आहे. जसे आपल्या शरीर डीएनएपासून बनतं, तसेच संसर्ग देखील डीएनए किंवा आरएनएतून होतो. करोना विषाणू हा आरएनए विषाणू आहे.

TET, AI Technology TET, TET candidates,
टीईटी परीक्षेत एआय तंत्रज्ञान वापरल्याचा परिणाम काय? किती उमेदवारांनी दिली परीक्षा?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Loksatta explained Why has the central government recommended the influenza vaccine
केंद्र सरकारने इन्फ्लूएन्झा लशीची शिफारस का केली आहे? भारताला फ्लूचा विळखा?
BCCI conducts 6 hour review meeting with Indian team management
BCCI : टीम इंडियाच्या पराभवावर सहा तास चालली बीसीसीआयची बैठक, रोहित-गंभीरला विचारले ‘हे’ तीन महत्त्वाचे प्रश्न
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास
MPSC Mantra State Services Main Exam Science and Technology
MPSC मंत्र: राज्यसेवा मुख्य परीक्षा; विज्ञान व तंत्रज्ञान
peticoat cancer
साडी नेसणार्‍या महिलांना ‘पेटिकोट कॅन्सर’चा धोका? हा प्रकार काय आहे? अभ्यास काय सांगतो?
New Spider Species Baner Hill, Baner Hill,
कोळ्याच्या नवीन प्रजातीचा बाणेर टेकडी येथे शोध, काय आहे वेगळेपण?

वेगवेगळे करोना विषाणू कसे शोधतात?

सर्वात आधी संबंधित व्यक्तीची आरटी-पीसीआर चाचणी करून संसर्ग झाला आहे की नाही हे तपासतात. यानंतर त्या व्यक्तीचे नमुने बायोसेफ्टी लेव्हल थ्री फॅसिलिटीला (BSL 3) पाठवले जातात. तेथे नमुन्यातून आरएनए वेगळा केला जातो आणि तो खराब होऊ नये उणे ८० डिग्री सेल्सियसला साठवला जातो. त्यानंतर आरएनएवर प्रक्रिया करून त्याचं रुपांतर डीएनएत केलं जातं. कारण डीएनएच्या तुलनेत आरएनए फार चंचल असतो.

हेही वाचा : “करोनाला रोखण्यात नाईट कर्फ्यूचा उपयोग नाही, भारतासारख्या देशांनी…”, WHO च्या मुख्य वैज्ञानिकांनी स्पष्टच सांगितलं!

चाचणीसाठी स्थिर डीएनएची गरज असते. डीएनएची रचना वेगवेगळ्या भागांमध्ये कट केली जाते. प्रत्येक तुकड्याला स्वतंत्र नाव दिलं जातं. त्याची गुणवत्ता आणि प्रमाण तपासलं जातं. या प्रक्रियेतून तयार झालेला नमुना पुढे डीएनए सिक्वेंसिंगसाठी मशिनमध्ये टाकला जातो. यात अनेक केमिकलचा उपयोग करून करोना विषाणूचा शोध घेतला जातो.