– प्रबोध देशपांडे

बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या भेंडवळ गावात प्राचीन घटमांडणी परंपरा जोपासली जाते. घटमांडणीच्या भाकितावरून बळीराजा आपल्या पीक-पाण्याचे नियोजन करीत असल्याने या घटमांडणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असते. पाऊस, पीक परिस्थिती, हवामान, राजकीय, आर्थिक, संरक्षण व सामाजिक परिस्थिती याचा वेध घेणारी भेंडवळची घटमांडणी दरवर्षी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर केली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी या घटात झालेल्या बदलावरून भविष्य वर्तविण्यात येते.

When and where will flood-affected Ektanagari residents be relocated
पूरग्रस्त एकतानगरीचे होणार स्थलांतर नक्की कधी आणि कुठे?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Cow milk subsidy of Rs 57 crores to farmers in Satara news
साताऱ्यातील शेतकऱ्यांना ५७ कोटींचे गायीच्या दुधाचे अनुदान
Local fishermen save life of couple stuck in rough sea in ratnagiri
दाम्पत्याला भाट्ये समुद्रात खेळणे पडले महागात; स्थानिक मच्छीमारांनी वाचविले प्राण
public health department target tb screening of 1 crore people
३ कोटी लोकांची क्षयरोग तपासणी
Moshi International Exhibition Center, garbage dump,
पुणे : मोशीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र कचऱ्याच्या विळख्यात
Chief Minister Ladki Bahin Yojana received great response from Pimpri Chinchwad city
पिंपरीत सर्वाधिक लाडक्या बहिणीचे अर्ज बाद
Two youths from Motala taluk along with international Attal gang robbed National Bank in Telangana state
तेलंगणा बँक दरोड्याचे ‘बुलढाणा कनेक्शन’ ! दोन आरोपी मोताळा तालुक्यातील

परंपरा केव्हापासून जोपासली जात आहे?

भेंडवळ घटमांडणीची परंपरा सुमारे ३७० वर्षांपासून दरवर्षी विश्वासाने जपली जात आहे. चंद्रभान महाराजांचा वसा त्यांच्या वंशजांनी आजही टिकवून ठेवला. आता पुंजाजी महाराज वाघ व सारंगधर महाराज हे घटाची पाहणी करून भाकीत व्यक्त करतात. रामचंद्र वाघ यांनी सुमारे १६५० साली वातावरणातील बदलावरून नक्षत्रांचा अभ्यास केला. पुढे पाऊस, पिकांची भविष्यवाणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्यांनीच ही घटमांडणी सुरू केली, असे सांगण्यात येते. घटमांडणी अक्षय्य तृतीयेला होते. त्यातील बदलावरून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी अंदाज सांगण्यात येतो.

कशी होते घटमांडणी?

भेंडवळच्या घटमांडणीची एक विशिष्ट पद्धत आहे. त्यानुसार घटामध्ये अठरा धान्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, करडी मसूर, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा गोलाकार मांडली जातात. मध्यभागी खोल खड्डा करून त्यात पावसाळ्याच्या चार महिन्यांचे प्रतीक असलेली चार मातीची ढेकळे त्यावर पाण्याने भरलेली घागर, घागरीवर पापड, भजा, वडा, सांडोई, कुरडई, तर खाली विड्याच्या पानावर सुपारी ठेवून प्रतीकात्मक मांडणी केली जाते.

भाकीत कशावरून व्यक्त केले जाते?

घटामध्ये रात्रभर होणाऱ्या नैसर्गिक बदलाचे पहाटे सूक्ष्म निरीक्षण करून हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पाऊस, हवामान, पीक, अर्थव्यवस्था तसेच देशाचे राजकीय तथा नैसर्गिक संकटाबाबत चाहुल देणारे भाकीत वर्तवण्यात येते. या भविष्यवाणीवर शेतकऱ्यांचा अतुट विश्वास आहे. या भाकिताचा आधार घेऊन ते आपल्या पिकपाण्याचे नियोजन करीत असतात. मातीच्या ढेकळावरून चार महिन्यांच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला जातो. विविध धान्यांवरून आगामी हंगामातील पिके कसे राहतील, हे सांगण्यात येते. चारा-पाणीसाठी सांडाई, कुरडई, तर पुरी निसर्गाशी संबंधित राहते. करंजीवरून देशाची आर्थिक परिस्थिती सांगण्यात येते. भादली हे रोगराईचे, तर पान-विडा राजाच्या गादीचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. राजा म्हणजे पंतप्रधान. पान, विड्यात होणाऱ्या बदलावरून भविष्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले जाते. मसूर हे पीक परकीय घुसखोरीचे द्योतक आहे.

शेतकऱ्यांसाठी भाकीत महत्त्वाचे का?

घटमांडणीचे भाकीत ऐकण्यासाठी विदर्भ, खान्देश, मराठवाड्यासह अनेक भागातून शेतकरी मुक्कामाला येऊन परिसरात हजारोंच्या संख्येने एकत्रित जमतात. शेतकरीच नव्हे तर बी-बियाणे कंपन्यांचे प्रतिनिधीही शेतकऱ्यांचा आगामी काळातील कल लक्षात घेण्यासाठी येथे गर्दी करतात. शेतकरी वर्ग घटमांडणीचे भाकीत घेऊन पुढील हंगामाची पेरणी काय करायची, हे ठरवत असतात. पावसाची महिनावार माहिती आणि पीक परिस्थितीचा अंदाजही वर्तविण्यात येत असल्याने निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांसाठी ही घटमांडणी आशेचा किरण बनली आहे.

हेही वाचा : बुलढाणा: पाणीप्रश्न पेटला! ग्रामस्थ बेहाल, टँकर, विहिरीद्वारे भागविली जातेय तहान

घटमांडणीला शास्त्रीय आधार आहे का?

घटमांडणीला कुठलाही शास्त्रीय आधार नसला तरी आजही परंपरेचे बळीराजाच्या मनातील महत्त्व कमी झालेले नाही. भेंडवळची प्राचीन घटमांडणी परंपरा विज्ञानाच्या आधुनिक युगातही जपली जात असून, याच्या भविष्यवाणीविषयी शेतकऱ्यांमध्ये कमालीची उत्सकता पाहायला मिळते. घटमांडणीनंतर वर्तवलेली पाऊस, पीक-पाणी, राजकीय, आर्थिक भाकिते बऱ्याचदा खरी ठरली आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समिती याला निव्वळ ठोकताळे म्हणत असले, तरी शेतकऱ्यांचा भेंडवळ घटमांडणीवर दृढ विश्वास कायम आहे.

prabodh.deshpande@expressindia.com

Story img Loader