लष्कर-ए-तैयबा या अतिरेकी संघटनेचा संस्थापक सदस्य आणि हाफिज सईदचा जवळचा सहकारी हाफिज अब्दुल सलाम भुट्टावी याचा मृत्यू झाला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने याबाबतची माहिती गुरूवारी (११ जानेवारी २०२४) दिली. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुरीदके या भागातील तुरुंगात २९ मे २०२३ रोजी हृदयविकारामुळे त्याचा मृत्यू झाला होता. सात महिन्यानंतर या माहितीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर भुट्टावी नेमका कोण होता? त्याच्या मृत्यूमुळे नेमके काय बदलणार? हे जाणून घेऊ या…

अंत्यसंस्कारावेळी एलईटीच्या सदस्यांची उपस्थिती

प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने (पीटीआय) याआधी गेल्या वर्षी ३१ मार्च रोजी भुट्टावी यांच्या मृत्यूचे वृत्त दिले होते. मुरीदके या भागात भुट्टावी याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. यावेळी लष्कर ए तैयबा (एलईटी) संघटनेच्या अनेक सदस्यांनी हजेरी लावली होती.

Gold seized Mumbai airport, Mumbai airport,
मुंबई विमानतळावरून पावणेतीन कोटींचे सोने जप्त, दोन कर्मचाऱ्यांना अटक
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
Mumbai police absconded
मुंबई: १९ वर्षांपासून फरार आरोपी आरोपीला अखेर पकडले
vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
aimim akbaruddin Owaisi marathi news
Akbaruddin Owaisi: “काँग्रेसमुळे मुस्लिमांवर ‘ही’ वेळ”, एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांचा काँग्रेसवर आरोप
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून

भुट्टावी नेमका कोण होता?

भुट्टावी याचा जन्म पाकिस्तानमधील कासूर जिल्ह्यातील पट्टोकी येथे १९४६ साली झाला. भुट्टावी हा लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेचा सहसंस्थापक होता. तसेच तो मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार समजल्या जाणाऱ्या हाफिज सईद याचा प्रमुख साथीदार होता. २००२ च्या मध्यात लाहोरमध्ये लष्कर ए तैयबा या संघटनेच्या विस्तारात भुट्टावी याने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

हाफिजच्या अनुपस्थितीत भुट्टावीने पाहिले काम

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने दिलेल्या निवेदनानुसार तो लष्कर ए तैयबा ही दहशतवादी संघटना आणि याच संघटनेचा भाग असलेल्या जमात उद दावा या संघटनेचा तो काळजीवाहू प्रमुख बनला होता. “नोव्हेंबर २००८ मधील मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर काही दिवसांनी हाफिज साईद याला अटक करण्यात आली. हाफिज हा जून २००९ पर्यंत तुरुंगातच होता. या काळात भुट्टावी याने संघटनेची रोजची कामे पाहिली. हाफिज सईदला मे २००२ मध्येही अटक झाली होती,” असे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने (यूएनएससी) आपल्या निवेदनात सांगितले.

भुट्टावी दहशतवाद्यांना प्रेरित करायचा

लष्कर ए तैयबा आणि जमात उद दावा या संघटनांचे फतवे जारी करण्याचेही तो काम करायचा. मुंबईवर हल्ला करण्यासाठी त्याने दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मुंबईवर दहशतवादी हल्ला करून शहीद व्हा असे सांगत तो दहशतवाद्यांना प्रेरित करायचा, असेही यूएनएससीने सांगितले आहे.

मार्च २०१२ मध्ये भुट्टावी याचा दहशतवाद्यांच्या यादीत समावेश

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या आयएसआयएलने तसेच अल कायदा प्रतिबंध समितीने मार्च २०१२ मध्ये भुट्टावी याचा दहशतवाद्यांच्या यादीत समावेश केला. दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत करणे, या कारवाया करण्यासाठी नियोजन आखणे, अशा कारवायांना प्रोत्साहन देणे, या कारवायांची तयारी करणे अशा कृत्यांत भुट्टावी याचा समावेश असल्याचे यावेळी सांगण्यात आले होते.

शेखूपुरा जिल्हा कारागृहात भुट्टावीला हृदयविकाराचा झटका

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार २०१९ पर्यंत भुट्टावी तुरुंगात होता. दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी त्याला १६ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. “भुट्टावी याला लाहोरपासून ६० किमी दूर असलेल्या शेखूपुरा जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले होते. तो ऑक्टोबर २०१९ पर्यंत तुरुंगात होता. दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत दिल्याप्रकरणी त्याला ही शिक्षा ठोठावण्यात आली होती. २९ मे २०२३ रोजी त्याला छातीत अचानकपणे त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्याचा मृत्यू झाला,” असे जेयूडीच्या एका सदस्याने सांगितले.

सईदची मागणी अमान्य

पाकिस्तानमधील पंजाब सरकारने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार २०१९ सालापासून सईद हा कोट लखपात तुरुंगात आहे. त्याने भुट्टावी याच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. मात्र ही मागणी अमान्य करण्यात आली होती.