पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑक्टोबर रोजी देशात ५जी सुविधा लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर साधारण तीन आठवड्यानंतर त्यांच्या हस्ते भारतात ही नेटवर्क सुविधा लॉन्च करण्यात आली. भारतात ५ जी सेवा लॉन्च करण्यात आलेली असली अद्याप बहुतांश नागरिकांना या सुविधेचा लाभ मिळत नाहीये. ही सेवा सध्यातरी ठराविक शहरांपुरती मर्यादित आहे. हाय स्पीड इंटरेनेटचा आनंद घेण्यासाठी सामान्यांना डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागेल, असे म्हटले जात आहे. याच पार्श्वभूमीवर ५ जी सेवा अद्याप सामान्यांपर्यंत का पोहोचलेली नाही? नागरिकांकडे सध्या असलेल्या मोबाईल फोनमध्येच ५ जी सेवेचा लाभ घेता येईल का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हेही वाचा >>> विश्लेषण: पाकिस्तानातील एका रेल्वे स्थानकाशी आहे जगभरातील शीख समुदायाचं भावनिक नातं; १०० वर्षांपूर्वीची घटना ठरली कारण!
काय आहे ५ जी?
५ जी ही वायरलेस तंत्रज्ञानाची पुढची पिढी आहे. ही जलद नेटवर्क सेवा देते. ५ जी सेवेमुळे ४ जीच्या तुलनेत इंटरनेटचा वेग वाढेल. ५ जी केवळ स्मार्टफोन पुरतेच मार्यादित न राहता ते इतर तंत्रज्ञान लोकांपुढे आणण्यात मदत करेल. स्वयंचलित कार, व्हर्च्युअल रिअॅलिटी, क्लाऊड गेमिंग आणि स्मार्ट शहर, यामध्ये ५ जी सेवा मदत करेल.
आतापर्यंत कोणकोणत्या कंपन्यांकडून ५जी नेटवर्क सुविधा देण्यात येत आहे?
भारतात सध्यातरी भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ या दोन कंपन्यांमार्फत ५ जी नेटवर्क सुविधा दिली जात आहे. या कंपन्यांनी सध्या देशातील काही मोजक्या शहरांमध्ये ही सुविधा पुरवण्याचे जाहीर केलेले आहे. भारती एअरटेलकडून दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, सिलीगुडी, नागपूर, वाराणसी, तर रिलायन्स जिओकडून ट्रायल बेसीसवर मुंबई, दिल्ली, कोलकाता, वारणसी या शहरांत ५ जी नेटवर्क सुविधा दिली जात आहे. सध्या या शहरांमध्ये ५ जी सेवा सुरु असली तरी, शहरांमधील सर्वच ठिकाणी इंटरनेट स्पीड सारखी नाहीये.
हेही वाचा >>> विश्लेषण: राष्ट्रपतींचे अंगरक्षक कोण आहेत? ‘सिल्वर ट्रम्पेट’ आणि ‘ट्रम्पेट बॅनर’ म्हणजे नेमकं काय?
येत्या मार्च २०२४ पर्यंत संपूर्ण भारतात ५ जी सेवा पुरवण्याचे भारती एअरटलने आश्वासन दिलेले आहे. तर रिलायन्स जिओने डिसेंबर २०२३ पर्यंत देशातील प्रत्येक गावात, तालुक्यात तसेज जिल्ह्यात ५ जी सेवा प्रदान करणार असल्याचे सांगितले आहे. वोडाफोन आयडिया लवकरच ५ जी सेवा सुरू करण्याची शक्यता आहे. ५ जी नेटवर्क सेवा सुरू करण्याची प्रक्रिया ही किचकट आणि महागडी आहे. संपूर्ण देशात ही सेवा सुरू करण्यासाठी रिलायन्स जिओ २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे सांगितलेले आहे.
हेही वाचा >>> विश्लेषण : ट्विटरची मालकी एलॉन मस्ककडे, आता पुढे काय? तुमचा डेटा सुरक्षित राहणार का?
सगळेच स्मार्टफोन ५ जी इंटरनेट सेवेसाठी योग्य आहेत का?
देशभरात ५ जी नेटवर्क नेट सेवा सुरू होण्यास सध्यातरी वेळ आहे. मात्र सध्या स्मार्टफोन वारकर्ते त्यांच्याकडे असलेल्या मोबाईल फोनवर या इंटरनेट सेवेचा लाभ घेऊ शकतात का? असा प्रश्न हमखास विचारला जातो. मात्र याचे उत्तर नाही असे आहे. सध्या वापरात असलेले सरसकट मोबाईल फोन ५ जी नेटवर्क सेवेला सपोर्टिव्ह नाहीत. सध्या भारतात असलेल्या साधारण ६०० दशलक्ष स्मार्टफोन्सपैकी फक्त ५० ते ६० दशलक्ष मोबाईल्स ५ जी नेटवर्क सुविधेला सपोर्टिव्ह आहेत. या ५० ते ६० दशलक्ष मोबाईल वापरकर्त्यांनादेखील ते राहात असलेल्या भागात ५ जी नेटवर्क सुविधा विनाअडथळा अनुभवता येत नाहीये. मुळात ५ जी सुविधेस सपोर्टिव्ह असणारे स्मार्टफोन्स ५ जीच्या n१, n१२, n७८, n२८, n५८ अशा फ्रिक्वेन्सी बँड्सना सपोर्ट करणारे असणे गरजेचे आहे.
हेही वाचा >>> विश्लेषण : रशिया-युक्रेन युद्धामुळे जगावर अण्वस्त्र हल्ल्याचा धोका, पण पोटॅशियम आयोडाईड गोळ्यांची मागणी का वाढली?
सध्याचे बरेच मोबाईल फोन्स हे ५ जी नेटवर्क सुविधेला सपोर्ट करणारे नसण्यामागे एक कारण आहे. तज्ज्ञांच्या मते जेव्हा देशात ४ जी नेटवर्क सुविधा सुरू करण्यात आली होती, तेव्हा मोबाईल निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडे बराच वेळ होता. मात्र यावेळी तशी स्थिती नाही. याच कारणामुळे सध्या बरेच स्मार्टफोन हे ५ जी सुविधेला सपोर्टिव्ह नाहीत.