दयानंद लिपारे

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी १८ हजारावर मताधिक्क्याने विजय मिळवत भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा पराभव करून पक्षाचा हातच नाही तर महाविकास आघाडीतील ऐक्य अधिक मजबूत केले आहे. हा विजय महा विकास आघाडीला बळ देणारा ठरला. हिंदू मतांचे ध्रुवीकरणाचा हुकमी एक्का हाती असतानाही खुद्द भाजपच्या प्रदेश अध्यक्षांच्या जिल्ह्यातील प्रभाव पक्षाला चिंता करायला लावणारा आहे.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
Who is George Soros
जॉर्ज सोरोस कोण आहेत? भाजपला त्यांच्याविषयी इतका राग का? ते खरेच ‘काँग्रेसमित्र’ आणि ‘भारतशत्रू’ आहेत का?
medha Patkar
समता, न्याय मिळण्याच्या दिशेने कायद्यांमध्ये बदल होणे गरजेचे, मेधा पाटकर यांचे मत
Rahul Narvekar
Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
Vidhan Bhavan premises Central Vista vidhan
विधानभवन परिसराचा कायापालट, अध्यक्षपदी फेरनिवड होताच राहुल नार्वेकर यांचा पुनरुच्चार; सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर विकास
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्यानंतर झालेल्या या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली होती. याला भावानिक जोड होती. भाजपने बेरजेचे राजकारण करीत सुरुवातीपासून मुत्सद्दीपणाने पावले टाकायला सुरुवात केली होती. २०१४ मध्ये या मतदारसंघात काँग्रेस कडून निवडणूक लढवलेले सत्यजित कदम यांना उमेदवारी दिली. कदम यांचे जिल्ह्यात राजकीय वजन असणारा नातेवाईकांचा महाडिक परिवार, भाजपला विधानसभेला मिळालेली ४० हजार मते आणि हिंदुत्वाला साद घालणारा शिवसैनिकांची मदत अशी गोळाबेरीज होऊन भाजपचा विजय शक्य आहे, असे आडाखे भाजपकडून मांडण्यात आले होते. भाजप केवळ त्यावर थांबला नाही. राज्यभरातील भाजपचे प्रमुख नेते, कार्यकर्त्यांची फौज, राष्ट्रीय सेवक संघाच्या परिवारातील अनेक कार्यकर्ते घरोघरी प्रचार करीत असल्याने वातावरण भाजपला अनुकूल बनत गेले. याचा दाखला मतदानाच्या आकडेवारीतून दिसून येतो. भाजप या निवडणुकीत दुप्पट म्हणजे ८० हजाराच्या घरात पोहोचला आहे. पराभव झाला तरी एकार्थाने भाजपच्या दृष्टीने ही जमेची बाजू ठरली.

हिंदुत्वाभोवतीचे राजकारण

या मतदारसंघात शिवसेनेने पाचवेळा विजय प्राप्त केला होता. या पार्श्वभूमीवर भाजपने या निवडणुकीत सुरुवातीपासून सैनिकांना भावणारा हिंदुत्वाचा मुद्दा प्रकर्षाने मांडायला सुरुवात केला. काश्मीर फाईल, पावनखिंड यासारखे चित्रपट प्रचाराचा मुख्य भाग बनवून टाकले. कठोर भाषेत अल्पसंख्याकांना लक्ष्य केले गेले. अखेरच्या सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘ कोल्हापुरातील शिवसैनिकांमध्ये हिंदुत्वाचे अस्मिता ठासून भरली असल्याने ते हिंदुत्वाचा धागा म्हणून भाजपलाच मतदान करतील’, असे खुबीने आवाहन केले होते. त्यांच्या प्रभावी वक्तृत्व शैलीमुळे हिंदुत्ववादी मतदारांमध्ये चलबिचलता दिसून आली.

विश्लेषण : पंजाब आणि हरियाणामध्ये वादाचे कारण ठरलेल्या चंदीगढवर कोणाचा अधिकार?

भाजपच्या हिंदुत्वाच्या प्रचाराचा नाही म्हटले तरी आघाडीने धसका घेतला. त्यातूनच प्रचाराला काही तास उरले असताना शिवसेना प्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आभासी सभा घेणे भाग पाडले. मुख्यमंत्र्यांनी ठाकरी शैलीत भाजपच्या हिंदुत्वाचे वाभाडे काढले. ‘आम्ही भाजपला सोडले आहे; हिंदुत्व नाही,’ असे म्हणत शिवसेनेचे हिंदुत्व अधिक कडवट कसे आहे याचे अनेक दाखले दिले. ‘माझा कडवट शिवसैनिक भाजपच्या बेगडी हिंदुत्वाला भुलणार नाही. सत्तेत एकत्र आलेल्या महाविकास आघाडी भाग म्हणून जयश्री जाधव यांच्या पाठीशी तो ठामपणे उभा राहील,’ अशी भावनिक साद घालावी लागली. परिणामी भाजपकडे सरकू लागलेल्या शिवसेना मतदारांच्या केंद्रबिंदूला बांध घालण्याचे काम मुख्यमंत्र्यांच्या भाषणाने केले. या मतदारसंघात उमेदवारीसाठी दावा करणारे शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह शिवसेनेचे एकूण सेनादल सेनाप्रमुखांच्या आदेशामुळे आघाडीच्या प्रचारात प्रामाणिकपणे राहिले. त्यामुळे भाजपला अपेक्षित असणारा शिवसेनेच्या हिंदुत्ववादी ३० हजार मतांचा गठ्ठा कमळ फुलवू शकला नाही. काही प्रमाणामध्ये त्यांची मते निश्चितच वळली असली तरी ती भाजपला विजयाप्रत नेऊ शकली नाहीत. उलट शिवसेनेच्या आणि एकूणच आघाडीच्या ऐक्यामुळे काँग्रेसचा विजय शक्य झाला.

महाविकास आघाडीची सरशीराज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून भाजपने सातत्याने टीकेचे प्रहार चालवले आहेत. पंढरपूरची पोट निवडणूक जिंकल्यानंतर महा विकास आघाडीने जनमत गमावले असल्याचा दावा भाजपकडून ठासून केला जात होता. नांदेड जिल्ह्यातील देगलूर मध्ये काँग्रेसने भाजपचा पराभव करून आघाडीचे स्थान भक्कम असल्याचे दाखवून दिले. १-१ असा बरोबरीत असलेला सामना कोल्हापुरात नेमके कोणते वळण घेणार यावर राज्याच्या राजकारणाचे वारे कोणत्या दिशेने वाहत आहे याची लिटमस चाचणी असल्याने निवडणुकीला अधिक महत्त्व प्राप्त होऊन तिने राज्याचे लक्ष वेधून घेतले. अशा संघर्षात महाविकास आघाडीने विजय मिळवत पोटनिवडणुकीच्या सामन्यात २-१ अशी आघाडी घेत आपले प्राबल्य असल्याचे अधोरेखित केले आहे.

विश्लेषण: भाजपाप्रमाणेच, आपही का सांगतंय बाबासाहेब आंबेडकरांच्या वारशावर दावा…

आघाडीच्या सत्ताकारणात कितीही कुरबुरी असल्या तरी भाजपला रोखण्यासाठी तिन्ही पक्षांची ऐक्य फायदेशीर ठरू शकते याचा प्रत्यय या निकालाने दिले आहे. अस्वस्थ कार्यकर्त्यांत उमेद पेरण्यास हा विजय पुरेसा असल्याचे स्पष्ट होत आहे. शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील,हसन मुश्रीफ, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, उदय सामंत, विनायक राऊत, अमोल कोल्हे, संजय मंडलिक, राजेंद्र पाटील यड्रावकर आदी तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी कुरबुरी विसरून एकदिलाने प्रचाराची मोहीम उघडल्याने आघाडीच्या विजयाचे द्वारही उघडले गेले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आक्रमक रणनीतीला सरस ठरणारी रणनीती आखून सतेज पाटील हे शह देण्यात यशस्वी ठरले.

Story img Loader