Maharashtra rock art now ‘protected monument’: महाराष्ट्र प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष अधिनियम, १९६० (Maharashtra Ancient Monuments and Archaeological Sites and Remains Act of 1960) या कायद्याच्या अंतर्गत महाराष्ट्र सरकारने गेल्या आठवड्यात रत्नागिरी जिल्ह्यातील २१० चौरस किलोमीटर क्षेत्रातील ७० ठिकाणी पसरलेल्या १,५०० कातळ शिल्पांना ‘संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित केले.

कोकणात विखुरलेल्या रॉक आर्टचा म्हणजेच कातळशिल्पांच्या अंकांनाचा कालखंड हा अश्मयुगीन काळापर्यंत मागे जातो. कोकणात उघडकीस आलेल्या या कातळशिल्पांचा प्रवास मध्याश्मयुगापासून (२०,००० ते १०,०००) ते प्रारंभिक ऐतिहासिक कालखंडापर्यंत झाल्याचे दिसते. या कातळशिल्पांमध्ये आढळून येणारी अँथ्रोमॉर्फिक आणि झूममॉर्फिक चित्रणं मानव आणि पर्यावरण तसेच प्राचीन परिसंस्था यांच्यातील गुंतागुंतीचे संबंध प्रतिबिंबित करतात. आज कातळशिल्पांच्या माध्यमातून कोकण किनारपट्टीला मिळणारी ओळख सहजासहजी मिळालेली नाही, यामागे स्थानिकांनी दोन दशकाहून अधिक कालखंड या शोधासाठी घालवला आहे. सरकारच्या सहभागापूर्वी जवळपास ४५ हून अधिक स्थळांचा शोध घेण्यात आला होता. आज कोकण किनारपट्टीवर १५०० जिओग्लिफसह सुमारे ५२ स्थळं नोंदवण्यात आली आहेत जे विशेष उल्लेखनीय मानले जात आहे. या शोधामुळे आणि नव्याने उघडकीस आलेल्या वारसा स्थळांमुळे संशोधनाची नवीन क्षेत्रं उघडली आहेत, इतकंच नाही तर जागतिक स्तरावर भारतीय वारसा स्थळांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे. कोकणात आढळून आलेली जिओग्लिफ ही तत्कालीन जागतिक अश्मयुगीन ट्रेण्ड दर्शवतात. आपल्याला इतर देशांमध्ये अशाच प्रकारची जिओग्लिफ त्या कालखंडात आढळून येतात. त्यामुळे ही कातळशिल्पं समांतर जाणाऱ्या संस्कृतीची द्योतक ठरली आहेत.

Fossilized dinosaur dung revealing Jurassic era secrets
Fossilized Dinosaur Dung: डायनासोरची विष्टा आणि उलटी सांगतेय त्याच्या अस्तित्त्वाची कथा; नवीन संशोधनाने ज्युरासिक कालखंडाचे कोणते रहस्य उलगडले?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Local fishermen save life of couple stuck in rough sea in ratnagiri
दाम्पत्याला भाट्ये समुद्रात खेळणे पडले महागात; स्थानिक मच्छीमारांनी वाचविले प्राण
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
Nazca lines
Nazca Lines AI discovery: अत्याधुनिक AIने उलगडली प्राचीन कातळशिल्पं!
Rare book Exhibition organized by BNHS
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे दुर्मिळ पुस्तकांचे प्रदर्शन
Kandalwan damage new jetty, Virar Marambalpada,
नवीन जेट्टीच्या रस्त्यासाठी तिवरांची कत्तल? विरारच्या मारंबळपाडा परिसरातील प्रकार; पर्यावरणप्रेमींकडून संताप
Dinosaur, India Dinosaur, Dinosaur Extinction,
भारतातील डायनासोर नामशेष का झाले? समोर आलं महत्त्वाचं संशोधन…

अधिक वाचा: आंबा भारताचा, श्रेय घेतंय पाकिस्तान आणि उत्पादनात अग्रेसर चीन; भारतीय आंबा व्हाया पाकिस्तान चीनमध्ये पोहोचलाच कसा?

कातळशिल्प म्हणजे काय?

कातळशिल्प या प्रकारात जमिनीवर- खडकाळ कातळावर रेती, माती, खडक बाजूला करून मोठ्या आकाराच्या प्रतिमा कोरल्या जातात. या प्रतिमांमध्ये निसर्गात आढळणाऱ्या गोष्टींचा समावेश असतो. एकतर या आकृत्या प्रचंड मोठ्या असतात किंवा लहान प्रतिमांच्या साहाय्याने मोठी प्रतिमा तयार केलेली असते. त्यांच्या मोठ्या आकारामुळे त्या लांबूनसुद्धा दृष्टिपथास पडतात. या आकृत्यांमधून तत्कालीन मानवाचे भौमितिक आकृत्या आणि गणित याविषयीचे ज्ञान प्रतिबिंबित होते. कातळावर मातीचा थर किंवा दगड रचून बाह्यरेखा करणे किंवा मग कातळावरचा पहिला आयोडाइज्ड स्तर कोरून काढणे अशा दोन प्रकारांनी कातळशिल्प तयार केली जातात.

अँथ्रोमॉर्फिक, झूममॉर्फिक आणि भौमितिक आकार

जिओग्लिफमधील चित्रणाचा विचार करता त्यात अँथ्रोमॉर्फिक, झूममॉर्फिक किंवा साध्या भौमितिक आकारांचा समावेश होतो. काही वेळा यात अमूर्त, क्लिष्ट आकृती बंध, आंतरकेंद्रित वर्तुळ, चक्रव्यूह इत्यादी आकारांचे चित्रण केलेलं असतं. या आकारांचा संबंध सहसा धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टींशी जोडला जातो. त्यामुळेच हे आकार सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे आहेत. प्राचीन कातळशिल्प युरोप, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि आशियाच्या काही भागांमध्ये सापडली आहेत. तर अलीकडील शोधात भारतातूनही अशा प्रकारच्या स्थळांची नोंद करण्यात आली आहेत. सर्न अब्बास जायंट, उफिंग्टन व्हाईट हॉर्स, अटाकामा जायंट आणि नाझ्का लाईन ही काही महत्त्वपूर्ण कातळशिल्पांची उदाहरणं आहेत.

भारतातील कातळशिल्प

भारताच्या इतिहासात प्रादेशिक आणि स्वदेशी विविधता दर्शविणाऱ्या रॉक आर्ट या कलाप्रकाराचा समृद्ध वारसा असताना बराच काळ कातळशिल्पांची उदाहरण आपल्याकडे उघडकीस आलेली नव्हती. रॉक आर्ट या प्रकारासाठी मध्यप्रदेशातील भीमबेटका हे दगडावर रंगवलेल्या चित्रांसाठी प्रसिद्ध आहे. या चित्रांचा काळ हा अश्मयुगीन असून भारतीय इतिहासात या भित्तिचित्रांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर लडाखमध्ये अनेक ठिकाणी दगडावर कोरीवकाम केलेली चित्र आढळतात. परंतु सपाट जमिनीवर अशाप्रकारचे अश्मयुगीन चित्रण भारतीय उपखंडात फारसे आढळत नव्हते.

अज्ञातपर्व उघडले

१९८० च्या दशकातच रत्नागिरीपासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या निवळी येथील एका उत्साही व्यक्तीने रस्त्याच्याकडेला असलेल्या मोठया खुणा आणि आकृतिबंध पाहिले आणि नोंद केली. अभियंता आणि पेट्रोग्लिफ संरक्षक सुधीर रिसबुड यांनी पृथ्वीच्या पृष्ठभागावरील या कातळशिल्पांचा शोध घेतल्याने नवीन संशोधनाचा मार्ग मोकळा झाला आणि कोकण किनारपट्टीच्या इतिहासातील आणखी एक अज्ञातपर्व उघडले. पुढील २५ वर्षांमध्ये, रिसबुड आणि त्यांचे मित्र धनंजय मराठे यांनी इतर अज्ञात स्थळांवर संशोधन केले आणि परिसरातील ४२ जिओग्लिफ्स शोधून काढले. या प्रयत्नाला मोठ्या संख्येने उत्साही आणि स्वयंसेवकांनी योगदान दिले आहे. त्यामुळे हे नागरी पुरातत्त्वाचे महत्त्वाचे उदाहरण ठरले आहे.

जांभरुण व कशेळी

२०१२ साली महाराष्ट्र सरकारने या कातळशिल्पांकडे लक्ष पुरवण्यास सुरुवात केली. २०१९ पर्यन्त १००० जिओग्लिफ्ससह ५२ स्थळांचा शोध घेण्यात आला. राज्य सरकारने गेल्या रविवारी “संरक्षित स्मारके” म्हणून २०२२ मध्ये युनेस्कोच्या तात्पुरत्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट केलेल्या कातळशिल्पांना नामांकित केले आहे. सुमारे १५०० कातळशिल्प कोकण किनारपट्टीवर विखुरलेली आहेत. ही कातळशिल्प समृद्ध सांस्कृतिक लँडस्केपचे प्रतीक आहे. कोकणातील जांभा दगडावर आजवर अशा प्रकारे सर्वाधिक कातळशिल्पे पहिल्यांदाच सापडली आहेत. जांभरुण येथे ५० जिओग्लिफ्स सापडली आहेत आणि कशेळी येथे एका महाकाय हत्तीच्या रूपरेषेबाजूने सुमारे ७० ते ८० आकृत्या कोरलेल्या आहेत, शिवाय त्याच्या बाजूलाच सूक्ष्मदगडी हत्यारेही सापडली.

अधिक वाचा: बारसूचा वाद: राज ठाकरे यांनी उल्लेख केलेले मायनाक भंडारी कोण होते?

हडप्पा – मोहेंजोदारोशी तुलना

या दोन परिसरांव्यतिरिक्त उक्षी, देवीहसोळ, रुंधे तळी, देवाचे गोठणे, कुडोपी येथेही कातळशिल्पांचे उत्कृष्ट नमुने सापडले आहेत. परंतु, बारसू येथे ६२ जिओग्लिफ्सच्या अस्तित्त्वामुळे तो कोकणच्या किनारपट्टीवरील कातळशिल्पांचा सर्वात मोठे समूह ठरला आहे. बारसू येथे १७.५ बाय ४.५ मीटर क्षेत्रफळ पसरलेल्या कातळशिल्पांपैकी एकामध्ये दोन झेप घेणाऱ्या वाघांसह एक आकृती दर्शविली आहे. चार मीटर उंचीवर उभा असलेला माणूस वाघांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असल्यासारखे हातवर केल्याचे दाखवले आहे. रुंद उघड्या तोंडासह वाघ आयताकृती आकारात शैलीबद्ध आहे. त्यांचा आक्रमक पवित्रा असूनही तो अतिशय स्थिर असल्याचे दिसून येते. मानवी धडाच्या शेजारी मासा, ससा आणि मोराच्या आकृत्या दाखवल्या आहेत, तर शरीराच्या दुसऱ्या बाजूला असलेले चित्र ओळखण्यापलीकडे जीर्ण झालेले आहेत. अभ्यासकांनी या माशांच्या आकाराची तुलना हडप्पा आणि मोहेंजोदारो येथे सापडलेल्या आकृतिबंधाशी केलेली आहे.

जगातील सर्वात मोठे कातळशिल्प

२०२१ मध्ये फ्रेंच संशोधक कार्लो आणि योहान ओएथेमर यांनी आर्किऑलॉजिकल रिसर्च इन एशिया मध्ये प्रकाशित केलेल्या शोधनिबंधात राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील आठ जिओग्लिफ्सचा अहवाल दिला आहे. त्यांनी गूगल अर्थ आणि ड्रोन इमेजरी वापरून क्षेत्राचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाच्या आधारे त्यांनी बोहा गावाजवळ विस्तृत जिओग्लिफ्स असल्याची माहिती दिली. ही जिओग्लिफ्स २०.८ हेक्टरहून जास्त क्षेत्रात पसरलेली आहेत. या जिओग्लिफ्सच्या रेषा जमिनीत सुमारे १० सेमी खोल आणि २० ते ५० सेमी रुंद कोरलेल्या आहेत. इतकंच नाही तर तीन स्मारकांचे दगड प्रमुख बिंदूंवर ठेवलेले आहेत. आतापर्यंत, हे जागतिक स्तरावर ज्ञात असलेले सर्वात मोठे जिओग्लिफ आहे. यापूर्वीचा विक्रम ऑस्ट्रेलियातील मॅरी मॅनच्या नावावर आहे. राजस्थानातील हे जिओग्लिफ सर्वात मोठे असू शकतात परंतु ते सर्वात जुने नाहीत. संशोधकांचा असा विश्वास आहे की, ते फक्त १५० वर्ष जुने आहे.

थरच्या वाळवंटाव्यतिरिक्त, अलीकडेच कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कोल्लूर प्रदेशाताही जिओग्लिफ्स नोंदवले गेले आहे. २०१९ साली याच भागात एका मोठ्या आकृतिबंधासह तुळू लिपी आढळून आली होती. अगदी अलीकडे, तेलंगणातील मेडचल- मलकाजगिरी जिल्ह्यात ३,००० वर्षे जुने लोहयुगाशी संबंधित जिओग्लिफ सापडले आहे. शोधांच्या या नवीन युगाची ही फक्त सुरुवात मानली जात आहे. सांस्कृतिक आकृतिबंधाच्या या नवीन स्वरूपाची ओळख नुकतीच सुरू झाली असली तरी, संशोधकांना अद्याप त्याचा कालक्रम आणि त्याचा समाजाशी असलेला परस्परसंबंध निश्चित करणे बाकी आहे.

Story img Loader