What Is Koo app And How It Works: टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी ४४ अब्ज डॉलर्सच्या करारासह ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठे बदल घडवून आणले. व्हेरिफिकेशन ब्ल्यू टिकबाबत बदल, हजारो कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यापासून ते अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर वापसीपर्यंत अनेक निर्णय हे वादग्रस्त ठरले, मात्र वेळोवेळी मस्क आपल्या निर्णयावर ठाम राहिलेले पाहायला मिळाले. कदाचित यामुळेच जगभरातील वापरकर्ते ट्विटरसाठी पर्याय शोधू लागले आहेत. अशातच भारताचा ऍप कू (KOO) च्या वापरला अनेकांनी पसंती दर्शवली आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार ब्राझीलमध्ये कू ऍप वापरकर्त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या ऍपची नेमकी काय वैशिष्ट्य आहेत हे आज आपण जाणून घेऊयात…

Koo नेमकं आहे काय?

मार्च २०२० मध्ये अप्रमेया राधाकृष्ण आणि मयंक बिदावतका यांनी Koo हे बहुभाषिक मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म स्थापन केले होते, जे सध्या १०० हुन अधिक देशांमध्ये व ११ भाषांमध्ये उपलब्ध आहे. हे ऍप आतापर्यंत जगभरातील ५० दशलक्षाहून अधिक डाउनलोड केले गेले असून यावर ७,५०० हून अधिक प्रतिष्ठित व्यक्तींचे अकाउंट असल्याचा दावा कंपनीकडून केला जातो. Koo सुरुवातीला कन्नडमध्ये लाँच केले गेले आणि नंतर इंग्रजी आणि इतर भारतीय भाषा जसे की हिंदी, तेलगू, तमिळ, बंगाली, गुजराती, मराठी, आसामी आणि पंजाबीमध्ये उपलब्ध करण्यात आले होते.

Jaya Kishori Viral Photo fact check
जया किशोरींनी सुरू केले मॉडेलिंग! व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण; वाचा, नेमकं सत्य काय?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
What is LIC Bima Sakhi Yojana ?
LIC ची विमा सखी योजना काय आहे? महिन्याला ७ हजार रुपये देणाऱ्या खास स्कीमच्या अटी आणि नियम काय आहेत?
News About Osho
Osho : आचार्य रजनीश अर्थात ओशो कोण होते? त्यांच्या विषयीची ही रहस्यं तुम्हाला ठाऊक आहेत का?
maharashtra vidhan sabha mpsc
MPSC मंत्र : महाराष्ट्र विधानसभा; पारंपरिक आणि तथ्यात्मक प्रश्न
ai complexity
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता नियमनाची किचकट प्रक्रिया
Dombivli tax arrears people, Dombivli property seal,
डोंबिवलीत मालमत्ता कर थकबाकीदारांच्या गाळ्यांना टाळे
Who is Telangana Thalli?
Telangana Thalli : ‘तेलंगणा थळ्ळी’ कोण आहेत? त्यांच्या नव्या पुतळ्यावरुन नेमका वाद का पेटला आहे?

Koo चा इंटरफेस, काहीसा ट्विटरप्रमाणेच असून पिवळ्या व पांढऱ्या रंगात पाहायला मिळतो. मे 2021 मध्ये, Koo ने ‘टॉक टू टाइप’ हे नवीन वैशिष्ट्य सादर केले जे त्याच्या वापरकर्त्यांना अॅपच्या व्हॉइस असिस्टंटसह पोस्ट करता येतात. अन्यही सर्व फीचर्सहे ट्विटर प्रमाणेच आहेत, ज्यात आपण हॅशटॅग वापरून पोस्ट करू शकता, इतरांचे अकाउंट नमूद करू शकता, आपल्याला नमूद केलेल्या पोस्टवर प्रतिक्रिया देऊ शकता इत्यादी. याशिवाय आपण Koo वर पोस्ट कधीही शेड्यूल करून ठेवू शकता

Koo ची प्रगती कशी सुरु झाली?

मे २०२० मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्याधुनिक भारतीय अॅप्स तयार करण्यासाठी जाहीर केलेल्या ‘आत्मनिर्भर भारत अॅप इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये Koo ‘सोशल नेटवर्किंग’ श्रेणीमध्ये विजेता ऍप ठरला होता. तेव्हापासून, माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ट्विटरसह Koo चा वापर करण्यास सुरुवात केली आणि परिणामी प्लॅटफॉर्मच्या वाढीला चालना मिळाली.

मंत्र्यांचा आवडता Koo

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, हे ट्विटरवर ९.५ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स असताना, Koo वर साइन अप करणाऱ्या पहिले मंत्री होते. पाठोपाठ केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, लेखक अमिश त्रिपाठी, श्री सद्गुरू, क्रिकेटपटू अनिल कुंबळे खासदार तेजस्वी सूर्या आणि आशुतोष राणा यांनीही Koo वर अकाउंट उघडले होते.

Koo ब्राझीलमध्ये इतका प्रसिद्ध आहे कारण..

ट्विटर-प्रतिस्पर्धी Koo चे जगभरात वापरकर्ते आहेत. १८ नोव्हेंबर रोजी पोर्तुगीज भाषेसह ब्राझीलमध्ये लॉन्च झाल्यावर अवघ्या ४८ तासांच्या आत १ दशलक्ष डाउनलोड नोंदवण्यात आले होते. या जबरदस्त प्रतिसादामुळे, कंपनीने मागील काही दिवसांपासून अँड्रॉइड प्ले स्टोअर आणि ऍपल अॅप स्टोअर या दोन्हींवर अव्वल स्थान पटकावले आहे. या प्लॅटफॉर्मवर सध्या अभिनेता बाबू सांताना, गायिका क्लॉडिया लिट्टे आणि लेखिका रोसाना हर्मन यांसारख्या लोकप्रिय ब्राझिलियन सेलिब्रिटीज आहेत.

हे ही वाचा << विश्लेषण: श्रद्धा आणि आफताब पूनावालाच्या पहिल्या भेटीस कारण ठरलेलं Bumble App नेमकं आहे तरी काय?

Koo च्या लोकप्रियतेची अनेक कारणे चर्चेत असताना सर्वात मजेशीर कारण म्हणजे काहींच्या मते Koo हा शब्द पोर्तुगीज भाषेत अर्थ एक शिवी आहे. Koo ने यावर स्पष्टीकरण देताना हसतच या ऍपचे नाव हे एका गोंडस पिवळ्या पक्ष्याचा आवाजावरून ठेवल्याचे सांगितले आहे. दरम्यान, मागील काही दिवसात अनेक Koo वापरकर्त्यांनी ट्विट केले की या ऍपवर बाल लैंगिक शोषण सामग्री (CSAM) शेअर केली जात आहे. जो बाझिलियन कायद्यांनुसार गुन्हा आहे.याबाबत तपास सुरु असल्याची माहिती Koo तर्फे देण्यात आली आहे.

Story img Loader