Koregaon Bhima Shaurya Din 207: भारतीय सैन्य पराक्रम, निष्ठा आणि धैर्यासाठी प्रसिद्ध आहे. रेजिमेंट हे भारतीय सैन्यातील मूलभूत एकक आहे. रेजिमेंट या शब्दाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. रेजिमेंट हा शब्द एक समान ओळख, लोकाचार आणि परंपरा असलेल्या सैनिकांच्या समूहाचे प्रतिनिधित्व करतो. हे एक प्रशासकीय आणि लढाऊ युनिट आहे. त्यांची भूमिका आणि रचना रेजिमेंटच्या प्रकारावर अवलंबून असते. भारतीय सैन्यात वेगवेगळ्या रेजिमेंट्स आहेत. त्यातील अनेकांना ऐतिहासिक संदर्भ असून त्या ब्रिटिश भारतीय लष्कराशी संबंधित आहेत. या रेजिमेंट्स त्यांच्या लढाऊ वैशिष्ट्यांसाठी ओळखल्या जातात. महार रेजिमेंट ही त्यांच्या शौर्य, सहनशक्ती आणि समृद्ध ऐतिहासिक परंपरेसाठी ओळखली जाते. तिची स्थापना, विकास आणि योगदान भारतीय समाजातील सामाजिक आणि राजकीय बदल तसेच महार समाजाच्या लष्करी परंपरांचे प्रतिबिंब आहे. महाराष्ट्रातील महार समाजातील सैन्यांचा समावेश असलेली एक रेजिमेंट असावी असा या रेजिमेंटमागचा हेतू असला तरी आज महार रेजिमेंट मध्ये महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहार यांसारख्या विविध राज्यांतील, विविध समुदायांतील समाजांचा समावेश आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
महार समाजाच्या प्राचीन लष्करी परंपरा
महार समाजाचा लष्करी सेवेशी जुना आणि घनिष्ठ संबंध आहे. महार समाजातील मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याच्या सैन्यात सैनिक म्हणून सेवा करत असत. किल्ल्यांचे संरक्षण आणि परकीय आक्रमकांविरुद्ध लढण्यातील त्यांच्या भूमिकेमुळे ते प्रभावी योद्धे म्हणून ओळखले गेले. महार समाजाच्या आधुनिक लष्करी योगदानाची पहिली घटना १८१८ साली कोरेगावच्या लढाईत पाहायला मिळते. ही तिसऱ्या इंग्रज- मराठा युद्धाचा एक भाग होती. या लढाईत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यातील महार सैनिकांच्या एका छोट्या तुकडीने पेशव्यांच्या मोठ्या सैन्याविरुद्ध आपले स्थान टिकवून ठेवले. त्यांच्या शौर्य आणि रणांगणातील कौशल्यामुळे ब्रिटिशांना विजय मिळवण्यात मदत झाली आणि त्याच विजयाच्या स्मरणार्थ पुण्याजवळ कोरेगाव येथे विजय स्मारक बांधण्यात आले.
ब्रिटिशांच्या धोरणात्मक बदलामुळे १८९२ मध्ये महार सैनिकांची भरती थांबवण्यात आली. १८५७ च्या भारतीय स्वातंत्र्य संग्रामानंतर ब्रिटिशांनी सैन्यात भरतीसाठी ‘मार्शल रेस’ (Martial Races) धोरण स्वीकारले. या धोरणानुसार विशिष्ट समुदाय जसे की शीख, राजपूत आणि गोरखा यांना प्राधान्य देण्यात आले. महार सैनिकांचा समावेश या यादीत नव्हता. त्यामुळे ब्रिटीश भारतीय सैन्याने महार समाजातील सैनिकांची भरती हळूहळू थांबवली आणि १८९२ मध्ये त्यांचा सहभाग पूर्णतः बंद झाला. मात्र दुसऱ्या महायुद्धाच्या काळात (१९४१) या धोरणात बदल करण्यात आला. सैन्याची वाढती गरज लक्षात घेऊन महार सैनिकांना पुन्हा सैन्यात सामील करून घेण्यासाठी महार रेजिमेंटची स्थापना करण्यात आली. १९४१ साली बेळगाव येथे महार रेजिमेंटची स्थापना झाली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महार रेजिमेंट
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महार रेजिमेंटच्या पुनर्स्थापनेसाठी प्रयत्न केले. त्यांचे वडील सुभेदार रामजी मालोजी सकपाळ हे ब्रिटीश भारतीय सैन्यात सैनिक होते आणि त्यांनी महार समाजातील लष्करी परंपरा टिकवून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या मुद्द्यावर आवाज उठवला. त्यांनी महार समाजातील लष्करी परंपरा आणि त्यांची शौर्यपूर्ण सेवा ओळखून त्यांना पुन्हा सैन्यात परत आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी ब्रिटीश अधिकाऱ्यांना महार समाजाच्या शौर्य आणि लष्करी कौशल्यांचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या मते महार समाजाचा सैन्यातील सहभाग पुन्हा सुरू करणे केवळ राष्ट्रीय सुरक्षेसाठीच नव्हे तर समाजाच्या सन्मानासाठीही आवश्यक होते.
महार रेजिमेंटची स्थापना (१९४१)
दुसऱ्या महायुद्धाच्या उद्रेकामुळे भारतीय सैन्याचा विस्तार करणे ब्रिटीशांसाठी आवश्यक ठरले. त्यामुळे सैन्य भरतीच्या धोरणांचे पुनरावलोकन करून त्यापूर्वी दुर्लक्षित समुदायांचा समावेश करण्यात आला. महार समाजाच्या ऐतिहासिक लष्करी कौशल्याची ओळख पटवून, ब्रिटिशांनी महार रेजिमेंटची स्थापना १ ऑक्टोबर १९४१ रोजी कर्नाटकातील बेळगाव येथे केली. या रेजिमेंटचे पहिले कमांडिंग ऑफिसर ब्रिगेडियर एफ. एफ. ओ’डॉनेल यांनी या रेजिमेंटच्या स्थापनेत आणि प्राथमिक प्रशिक्षणात महत्त्वाची भूमिका बजावली. दुसऱ्या महायुद्धाची गरज म्हणून महार समाजाच्या ऐतिहासिक लष्करी कौशल्याचा उपयोग करण्याच्या स्पष्ट उद्देशाने रेजिमेंटची उभारणी करण्यात आली. स्थापनेच्या सुरुवातीच्या काळात या रेजिमेंटने बर्मा मोहीम आणि इतर आग्नेय आशियातील रणांगणामध्ये सेवा दिली.
कोरेगाव स्तंभ आणि महार रेजिमेंटचा लोगो
१८१८ च्या कोरेगावच्या लढाईतील महार सैनिकांच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी पुण्याजवळ कोरेगाव येथे हा स्तंभ उभारण्यात आला होता. महार रेजिमेंटची स्थापना १९४१ मध्ये झाली. त्यावेळी रेजिमेंटचा लोगो कोरेगावच्या स्तंभावर आधारित होता. स्वातंत्र्यानंतर भारतीय सैन्याने त्याच्या प्रतिकांमध्ये बदल केले. महार रेजिमेंटच्या लोगोमध्ये क्रॉस्ड विकर्स मध्यम मशीन गनचा (crossed Vickers Medium Machine Guns) समावेश करण्यात आला.
अधिक वाचा: ‘या’ जाती बौद्ध धर्म का स्वीकारतात? त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान काय?
स्वातंत्र्योत्तर काळ आणि भारतीय सैन्यातील समावेश
१९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महार रेजिमेंटचा समावेश भारतीय सैन्यात करण्यात आला आणि ती देशाच्या संरक्षण दलांचा एक महत्त्वाचा घटक ठरली. सुरुवातीला या रेजिमेंटमध्ये फक्त महार सैनिकांची भरती करण्याची प्रथा कायम होती, परंतु स्वातंत्र्यानंतर भारतीय सैन्याच्या सर्वसमावेशकतेच्या तत्त्वाशी ती अनुरूप झाली.
पाकिस्तान आणि चीनशी युद्धे
महार रेजिमेंटने १९४७-१९४८ भारत पाकिस्तान युद्ध, १९६२ साली भारत चीन युद्ध, १९६५ आणि १९७१ साली भारत पाकिस्तान युद्ध या सर्व युद्धांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कारगिल (१९९९) युद्धात महार रेजिमेंटने ऑपरेशन विजय दरम्यान कारगिल संघर्षात सक्रिय सहभाग घेतला होता. जम्मू आणि काश्मीरमधील दुर्गम पर्वतीय प्रदेशात धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांचा पुन्हा ताबा घेण्याच्या कठीण कार्यात या रेजिमेंटच्या सैनिकांनी असाधारण शौर्य आणि रणनीतिक कौशल्य दाखवले होते. पारंपरिक युद्धाशिवाय महार रेजिमेंट जम्मू-काश्मीर आणि ईशान्येकडील राज्यांमधील दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये सक्रियपणे सहभागी झाली आहे. या रेजिमेंटचा शिस्तबद्ध दृष्टिकोन आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या क्षमतेमुळे ती भारताच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग ठरली आहे. याशिवाय, महार रेजिमेंटने संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत भारताच्या आंतरराष्ट्रीय शांतता राखण्याच्या प्रयत्नांमध्येही योगदान दिले आहे. या रेजिमेंटच्या सैनिकांनी आफ्रिका, आशिया आणि मध्य पूर्व या प्रदेशांतील मोहिमांमध्ये सेवा दिली असून जागतिक शांतता आणि स्थिरतेबद्दल भारताची बांधिलकी टिकवून ठेवली आहे.
बोधवाक्य आणि प्रतिकात्मकता
महार रेजिमेंटचे बोधवाक्य यश आणि सिद्धी हे आहे. महार रेजिमेंटने आपल्या सेवेसाठी अनेक सन्मान आणि पुरस्कार मिळवले आहेत, त्यात परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीर चक्र यांचा समावेश आहे.
महार रेजिमेंटचा इतिहास तिच्या सैनिकांच्या शौर्य, सहनशीलता आणि समर्पणाची साक्ष देतो. महार समाजाच्या लष्करी परंपरेपासून ते आधुनिक भारतातील तिच्या गौरवशाली सेवांपर्यंत ही रेजिमेंट शौर्य आणि सेवाभावाच्या आदर्शांचे प्रतीक आहे. भारताच्या संरक्षणासाठी दिलेले तिचे योगदान आणि सामाजिक बदलाला चालना देण्याच्या भूमिकेमुळे ती भारतीय सैन्याच्या वारशाचा एक महत्त्वाचा घटक ठरली आहे.
References
- Singh, M. (1989). Regimental History of the Indian Army: Mahar Regiment. Delhi: Manohar Publishers.
- Prasad, B. (1956). Official History of the Indian Armed Forces in World War II. Combined Inter-Services Historical Section, Ministry of Defence, Government of India.
- Indian Army Official Website
- Marston, D. (2014). The Indian Army and the End of the Raj. Cambridge University Press.