‘केपीएमजी’ या आघाडीच्या अकाऊंटिंग संस्थेने नोकरी आणि राजीनाम्याबाबत २०२२ या वर्षाचा ‘सीईओ ऑऊटलूक’ हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार ३९ टक्के कंपनींच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नवी नोकरभरती बंद केली आहे. तर ४६ टक्के अधिकारी येत्या सहा महिन्यात नोकरकपात करण्याच्या तयारीत आहेत. ‘केपीएमजी’ने ११ देशांच्या जवळपास १ हजार ३२४ कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधल्यानंतर हा अहवाल बनवला आहे. यासाठी या कंपनीने भारतासह अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनेडा, चीन, फ्रान्स, इटली, जर्मनी आणि जपानमध्ये सर्वेक्षण केले आहे.
विश्लेषण : तुमच्या सध्याच्या मोबाईल फोनवर तुम्हाला 5G सेवेचा वापर करता येईल का?
या अहवालात संपत्ती व्यवस्थापन, ऑटोमोटिव्ह, बँकिंग, ग्राहक आणि रिटेल, ऊर्जा, पायाभूत सुविधा, विमा, जीवन विज्ञान, उत्पादन, तंत्रज्ञान आणि दूरसंचार या क्षेत्रांचा अभ्यास करण्यात आला आहे. “आर्थिक उलथापालथीमुळे नोकरकपातीचे संकट वाढत चालले आहे. ३९ टक्के मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नव्या उमेदवारांना नोकरी देणे बंद केले आहे. तर ४६ टक्के अधिकाऱ्यांकडून नोकरकपात करण्यात येणार आहे. असे असले तरी येत्या तीन वर्षांतील चित्र आशादायी आहे. या काळात नऊ टक्के नोकरकपात केली जाण्याची शक्यता आहे”, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
राजीनामा सत्र का सुरू आहे?
टेक्सॉस विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक अन्टोंनी क्लोत्झ यांनी जगभरातील कर्मचारी राजीनामा का देत आहेत याबाबत अभ्यास केला. ‘वर्क फ्रॉम होम’, प्रवासातील अडचणी, खडतर प्रकल्प यामुळे कर्मचारी नोकरीचा राजीनामा देत असल्याचे क्लोत्झ यांच्या अभ्यासातून पुढे आले आहे. ‘प्राईसवॉटरहाऊसकुपर्स’ या कंपनीने २४ ‘मे’ला ‘ग्लोबल वर्कफोर्स होप्स अँड फीअर्स २०२२’ हा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार पाच जणांपैकी एक व्यक्ती नोकरीत बदल करण्यासाठी तयार असल्याचे समोर आले आहे. नोकरीत बदल करू इच्छिणाऱ्यांमध्ये १८ ते २५ वयोगटातील कर्मचारी जास्त असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर २६ ते ४१ या वयोगटातील २३ टक्के लोक चांगली संधी मिळाल्यास नोकरी सोडण्यास तयार असल्याचे अहवालात म्हटले आहे. येत्या १२ महिन्यांमध्ये वेतनावाढीचा दबाव सर्वाधिक असेल, याकडेही या अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे.
अहवालातील ठळक मुद्दे काय आहेत?
- हवी तशी नोकरी शोधण्यास कर्मचाऱ्यांना अपयश येत आहे.
- कार्यक्षमतेनुसार काम मिळत नाही, याबाबत अनेक कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. कामाच्या स्वरुपाबाबत कर्मचारी असमाधानी आहेत.
- कामाचा योग्य मोबदला मिळत नाही. याशिवाय कामाच्या ठिकाणचे सहकारी काळजी करत नाहीत. बॉसकडून दखल घेतली जात नाही, हे नोकरी सोडण्यामागचे महत्त्वाचे कारण आहे.
- पुरुषांपेक्षा महिला वेतनासंदर्भात कमी समाधानी असतात. वेतनवाढ किंवा पदोन्नतीसाठी त्यांनी मागणी करण्याची शक्यता कमी असते, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
- करिअरची प्रगती खुंटणे, उद्योगाचे बदललेले स्वरुप, पगाराबाबत असमाधानी असणे, ही राजीनामा देण्याची काही ठळक कारणे असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.