एखाद नातं म्हटलं की त्यात प्रेम, विश्वास, मतभेद सारं काही आलंच… हाच भावबंध आपल्याला थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यात दिसतो. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी नायगांवसारख्या एका लहानश्या खेड्यात झाला. पुढे त्यांनी भिडेवाडा, पुणे येथे स्थापन केलेल्या विविध जातींतील मुलींसाठी पहिली शाळा चालविली. सावित्रीबाईंचा त्याग, समर्पण हे अतुलनीय होते. अशा या विलक्षण स्त्रीची महती वर्णावी तितकी कमीच. सावित्रीबाईंचे ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले: काळ आणि कर्तृत्त्व’ या लेखात वर्णन करताना डॉ. मा. गो. माळी लिहितात, “शेतकऱ्याची एक निरक्षर मुलगी, लग्नानंतर शिक्षण घेते; शिक्षिका होते; मराठी, इंग्रजी व संस्कृत भाषा अवगत करते, व्यासंग वाढवून लोकशिक्षणासाठी गद्य- पद्य रचना करते, समाजसेविका होते, फुल्यांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाचे समर्थपणे नेतृत्त्व करते”. सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिबा यांना लिहिलेली पत्रे ही त्यांच्या आणि ज्योतिबा यांच्यातील प्रेमाची साक्ष देतात. ही पत्रे महत्त्वपूर्ण आहेत, कारण त्यामध्ये या जोडप्याला संघर्षासाठी कारणीभूत असलेल्या व्यापक चिंता, समाजातील सर्वात वंचित घटकांची मुक्ती आणि संपूर्ण मानवी सन्मान आणि स्वातंत्र्य मिळविण्यासाठी संघर्ष समाविष्ट आहे. अज्ञान, धर्मांधता, वंचितता आणि भूक यापासून मुक्त असलेल्या नवीन आणि मुक्त समाजासाठीची ही दृष्टी हा या जोडप्याला जोडणारा धागा होता. १९ व्या शतकातील महाराष्ट्रीय समाजातील मोठा वर्ग ज्योतिबा फुलेंच्या पुनर्रचनावादी कट्टरतावादाच्या विरोधात होता. याच पार्श्वभूमीवर सावित्रीबाईनी समाजात होणाऱ्या तत्कालीन ऑनर किलिंगला उघडपणे विरोध केला होता. त्यांच्या याच धडाडीचे वर्णन करणारा पुढील प्रसंग.

अधिक वाचा: ‘भारतरत्न’ची ७० वर्षे; का व कधी सुरू झाला हा सर्वोच्च नागरी सन्मान? 

Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Vivah muhurat 2025 Marriage Dates in 2025 Hindu Panchang
Vivah Muhurat 2025 : नवीन वर्ष २०२५ मध्ये विवाहासाठी किती शुभ मुहूर्त, पाहा जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या तारखांची यादी
Numerology number 8
Numerology : ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते शनीची कृपादृष्टी, मान-सन्मानासह कमावतात प्रचंड संपत्ती; भाग्यापेक्षा असतो कर्मावर विश्वास
assembly election 2024 Frequent party and constituency changes make trouble for Ashish Deshmukh
वारंवार पक्ष व मतदारसंघ बदल आशीष देशमुखांना भोवणार
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
Dev deepawali 2024
देव दिवाळीपासून शनी-गुरूचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
Numerology: People Born on These Dates Are Blessed by Lord Shani
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते नेहमी शनि देवाची कृपा

पत्राचा विषय

२९ ऑगस्ट १८६८ नायगाव, पेटा खंडाळा साताऱ्यावरून सावित्रीबाई यांनी ज्योतिबा फुले यांना पत्र लिहिले होते. हे पत्र तत्कालीन सामाजिक निषिद्धतेबद्दल भाष्य करणारे आहे. एक ब्राह्मण मुलगा आणि एक अस्पृश्य मुलगी यांच्यातील प्रेमसंबंध; क्रोधीत गावकर्‍यांचे क्रूर वर्तन याबाबत सावित्रीबाईंनी कसे पाऊल टाकले, त्यांच्या हस्तक्षेपामुळे प्रेमीयुगुलांचे प्राण कसे वाचले आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी घेतलेली भूमिका याविषयी सविस्तर माहिती या पत्रात सापडते. आज २१ व्या शतकातही भारतात सुरू असलेले ऑनर किलिंगचे भयंकर वास्तव, त्या भोवतीचा द्वेषपूर्ण प्रचार, या मुळे हे पत्र आजही तितकेच महत्त्वपूर्ण ठरते.

पत्राचा मजकूर

पत्राच्या सुरुवातीस त्या ज्योतिबा फुले यांचा उल्लेख ‘सत्याचे अवतार’ असा करतात. नमस्कार करून पत्राची सुरुवात करतात. पत्राच्या मजकुरात त्या लिहितात, मला तुमचे पत्र मिळाले. आम्ही येथे ठीक आहोत. मी पुढच्या महिन्याच्या पाच तारखेला येईन. काळजी करू नका. दरम्यान येथे एक विचित्र घटना घडली. एक गणेश नावाचा ब्राह्मण गावोगावी फिरत असे, धार्मिक विधी करीत आणि लोकांना त्यांचे भविष्य सांगत असे. हे त्याचे उदरनिर्वाहाचे साधन होते. गणेश आणि महार (अस्पृश्य) समाजातील शारजा नावाची किशोरवयीन मुलगी प्रेमात पडले. जेव्हा लोकांना या गोष्टीची माहिती मिळाली तेव्हा ती सहा महिन्यांची गरोदर होती. संतप्त झालेल्या लोकांनी त्यांना पकडून गावातून पळवून लावले, त्यांना मारण्याची धमकी दिली. मला या घटनेची माहिती मिळताच मी घटनास्थळी धाव घेतली आणि ब्रिटीश कायद्यानुसार प्रेमीयुगुलांच्या हत्येचे गंभीर परिणाम दाखवून त्यांना घाबरवले. माझे म्हणणे ऐकून जमावाने त्यांचा विचार बदलला. सदुभाऊ रागाने म्हणाले की धूर्त ब्राह्मण मुलगा आणि अस्पृश्य मुलगी यांनी गाव सोडून जावे. याला दोन्ही पीडितांनी संमती दिली. माझ्या हस्तक्षेपाने त्यांचे प्राण वाचल्याने ते जोडपे माझ्या पाया पडून रडू लागले. कसेबसे मी त्यांना धीर दिला आणि शांत केले. आता मी त्या दोघांना तुमच्याकडे पाठवत आहे. अजून काय लिहू?, असे लिहून शेवटी तुमची सावित्री असे त्या नमूद करतात.

अधिक वाचा: भीमा- कोरेगाव: १८१८ साली आजच्या दिवशी नेमके काय घडले होते? गॅझेटियर काय सांगते?

एकूणच या पत्रावरून तत्कालीन समाजातील अनेक प्रथा समजण्यास मदत होते. आंतरजातीय प्रेमसंबंध, कुमारी माता आणि त्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन या पत्रातून अधोरेखित होतो. या पत्राचा उल्लेख आपल्याला डॉ. मा. गो. माळी संपादित सावित्री बाई फुले, समग्र वाङ्मय या ग्रंथात सापडतो.