एखाद नातं म्हटलं की त्यात प्रेम, विश्वास, मतभेद सारं काही आलंच… हाच भावबंध आपल्याला थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यात दिसतो. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी नायगांवसारख्या एका लहानश्या खेड्यात झाला. पुढे त्यांनी भिडेवाडा, पुणे येथे स्थापन केलेल्या विविध जातींतील मुलींसाठी पहिली शाळा चालविली. सावित्रीबाईंचा त्याग, समर्पण हे अतुलनीय होते. अशा या विलक्षण स्त्रीची महती वर्णावी तितकी कमीच. सावित्रीबाईंचे ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले: काळ आणि कर्तृत्त्व’ या लेखात वर्णन करताना डॉ. मा. गो. माळी लिहितात, “शेतकऱ्याची एक निरक्षर मुलगी, लग्नानंतर शिक्षण घेते; शिक्षिका होते; मराठी, इंग्रजी व संस्कृत भाषा अवगत करते, व्यासंग वाढवून लोकशिक्षणासाठी गद्य- पद्य रचना करते, समाजसेविका होते, फुल्यांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाचे समर्थपणे नेतृत्त्व करते”. सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिबा यांना लिहिलेली पत्रे ही त्यांच्या आणि ज्योतिबा यांच्यातील प्रेमाची साक्ष देतात. ही पत्रे महत्त्वपूर्ण आहेत, कारण त्यामध्ये या जोडप्याला संघर्षासाठी कारणीभूत असलेल्या व्यापक चिंता, समाजातील सर्वात वंचित घटकांची मुक्ती आणि संपूर्ण मानवी सन्मान आणि स्वातंत्र्य मिळविण्यासाठी संघर्ष समाविष्ट आहे. अज्ञान, धर्मांधता, वंचितता आणि भूक यापासून मुक्त असलेल्या नवीन आणि मुक्त समाजासाठीची ही दृष्टी हा या जोडप्याला जोडणारा धागा होता. १९ व्या शतकातील महाराष्ट्रीय समाजातील मोठा वर्ग ज्योतिबा फुलेंच्या पुनर्रचनावादी कट्टरतावादाच्या विरोधात होता. याच पार्श्वभूमीवर सावित्रीबाईनी समाजात होणाऱ्या तत्कालीन ऑनर किलिंगला उघडपणे विरोध केला होता. त्यांच्या याच धडाडीचे वर्णन करणारा पुढील प्रसंग.
आंतरजातीय विवाहाविरोधात होणाऱ्या हत्त्यांना (ऑनर किलिंग) उघडपणे विरोध करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले; काय होता तो प्रसंग?
Savitribai Phule Birth Anniversary: त्यांच्या हस्तक्षेपामुळे प्रेमीयुगुलांचे प्राण कसे वाचले आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी घेतलेली भूमिका याविषयी सविस्तर माहिती या पत्रात सापडते.
Written by डॉ. शमिका सरवणकर
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 03-01-2024 at 09:53 IST
मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Krantijyoti savitribai phule who openly opposes honor killings against inter caste marriages what was the occasion svs