China BRI आग्नेय आशियातील सर्व देश रेल्वेमार्गाने जोडण्याच्या प्रकल्पात सहभागी होण्याविषयी चीन गांभीर्याने विचार करत आहे, असे प्रतिपादन मलेशियाच्या दौऱ्यावर असलेले चीनचे पंतप्रधान ली क्वियांग यांनी अलीकडेच केले. मलेशियाच्या ईस्ट कोस्ट रेल लिंक (इसीआरएल) च्या गोम्बाक इंटीग्रेटेड टर्मिनल स्टेशनच्या भूमिपूजन समारंभास ते उपस्थित होते. तब्बल १० अब्ज अमेरिकन डॉलर्स किमतीच्या या प्रकल्पाद्वारे दक्षिण चीनमधील कुन्मिंग हे शहर थेट मलेशियाच्या एका टोकास असलेल्या सिंगापूरला जोडले जाणार आहे. आग्नेय आशियातील सर्व देशांना जोडणारा एक प्रकल्प चीननेच प्रस्तावित केला आहे. इसीआरएलमुळे कुन्मिंग थेट सिंगापूरला जोडले जाण्यास मदतच होणार आहे.

आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेला जोडणाऱ्या बेल्ट अॅण्ड रोड इनिशिएटिव्ह (बीआरआय) या प्रकल्पाला थेट आग्नेय आशियाला जोडून सिंगापूरपर्यंत नेण्याचा चीनचा विचार आहे. विस्तारवादी चीनची नजर आग्नेय आशियावर असल्याचे या निमित्ताने पुन्हा सिद्ध झाले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kunming to singapore railway china malaysia bri ecrl what is chinas interest vp
First published on: 29-06-2024 at 12:38 IST