भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) खासदार व अभिनेत्री कंगना रणौतने गुरुवारी शेअर केलेल्या एका छायाचित्रात संसदेबाहेर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागे एक महिला कमांडो असल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर या छायाचित्राची तुफान चर्चा झाली आहे. छायाचित्रामध्ये पंतप्रधान मोदी महिला कमांडरच्या पुढे चालताना दिसत आहेत. कंगणा रणौत यांनी या छायाचित्राला ‘लेडी एसपीजी’ अशी कॅप्शन दिली आहे. त्यामुळे महिला सक्षमीकरण आणि सुरक्षा भूमिकांमध्ये त्यांच्या वाढत्या उपस्थितीबद्दलही चर्चा सुरू झाली आहे. काय आहे या व्हायरल फोटोमागील सत्य? पंतप्रधानांच्या सुरक्षेत तैनात असणारे एसपीजी कमांडो कोण असतात? त्यांना कोणते विशेषाधिकार असतात? त्याविषयी जाणून घेऊ.

व्हायरल छायाचित्रातील महिला कोण आहे?

व्हायरल छायाचित्रामधील महिला स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी)चा भाग असल्याचे अनेकांना वाटते; परंतु त्यांची ओळख आणि नेमकी भूमिका अद्याप अज्ञात आहे. महिला कमांडो अनेक वर्षांपासून एसपीजीच्या सुरक्षा फ्रेमवर्कचा अविभाज्य घटक आहेत. ‘एसपीजी’मध्ये सध्या सुमारे १०० महिला कमांडो आहेत, असे वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे. संसदेतील व्हायरल झालेल्या छायाचित्रात एक महिला अधिकारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शेजारी दिसत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे अनेक महिला एसपीजी कमांडोदेखील उच्चभ्रू ‘क्लोज प्रोटेक्शन टीम’चा एक भाग आहेत. परंतु, सूत्रांनी ‘एनडीटीव्ही’ला सांगितले की, छायाचित्रातील महिला एसपीजीमधील नसून, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ)मध्ये सहायक कमांडंट आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वैयक्तिक सुरक्षा अधिकारी (पीएसओ) म्हणून त्या काम करतात, असे वृत्त एका ‘मीडिया आउटलेट’ने दिले.

Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
kedar shinde post for suraj chavan
“सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत
Shinde Fadnavis move by transferring Gadchiroli District Collector Gadchiroli news
गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली करून शिंदेना फडणवीसांचा शह?
News BJP
BJP : भाजपा निवडणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष, कुठल्या खास निकषांवर होणार निवड?
Shambhuraj Desai, tourism Maharashtra ,
महाराष्ट्राला पर्यटनामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य बनवू, पर्यटनमंत्री शंभूराज देसाईंची ग्वाही
devendra fadnavis gadchiroli guardian minister
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना हवंय ‘या’ जिल्ह्याचं पालकमंत्रीपद; मित्रपक्षांनी सहमती दिल्यास जबाबदारी स्वीकारणार!
Kedar shinde suraj Chavan jhapuk jhupuk movie muhurta photos viral
केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा मुहूर्त पार पडला, सूरज चव्हाणसह मालिकाविश्वातील ‘हे’ लोकप्रिय चेहरे झळकणार
अनेक महिला एसपीजी कमांडोदेखील उच्चभ्रू ‘क्लोज प्रोटेक्शन टीम’चा एक भाग आहेत. (छायाचित्र-एडी जीपीआय/एक्स)

हेही वाचा : गरोदर आहोत हे महिलांना कळतच नाही? काय आहे ‘क्रिप्टिक प्रेग्नन्सी’? याची इतकी चर्चा का?

दरम्यान, हे छायाचित्र पोस्ट करीत चिक्कबल्लापूरचे भाजपा खासदार डॉ. के. सुधाकर यांनी ‘एक्स’वर या महिला अधिकाऱ्याचा फोटो पोस्ट करीत लिहिले, “पंतप्रधान एसपीजीमध्ये महिला कमांडो! ‘अग्निवीर’पासून फायटर पायलटपर्यंत, पंतप्रधानांच्या एसपीजीमध्ये लढाऊ पदांपासून कमांडोंपर्यंत सशस्त्र दलांमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीयरीत्या वाढला आहे आणि महिला आघाडीवर आहेत. भारताचे सशस्त्र दल महिलांसाठी संधी वाढवत आहे. त्यांना हवाई संरक्षण, सिग्नल्स, आयुध, इंटेलिजेन्स, अभियंते आणि सर्व्हिस कॉर्प्समधील युनिट्स कमांड देण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले.

कोण असतात एसपीजी कमांडो?

स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी) पंतप्रधान, माजी पंतप्रधान आणि त्यांच्या निकटवर्तीयांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी स्थापन करण्यात आला होता. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपमधील कमांडो हे जगातील सर्वोत्तम सुसज्ज सुरक्षा कमांडोंपैकी एक मानले जातात. एसपीजी कमांडो अधिकारी नेतृत्व, व्यावसायिकता व जवळचे संरक्षण यांसाठी विशेष प्रशिक्षण घेतात. त्यांना दिले जाणारे प्रशिक्षण हे जगातील सर्वांत कठीण प्रशिक्षणांपैकी एक असे असते. या गटाच्या स्थापनेपासून, एसपीजीने त्यांच्या संरक्षणाखाली असलेल्यांची सुरक्षा सुधारण्यासाठी त्यांच्या पद्धतींमध्ये सातत्याने सुधारणा केल्या आहेत. हा गट सुरक्षा उपाय मजबूत करण्यासाठी इंटेलिजन्स ब्यूरो आणि विविध राज्ये, तसेच केंद्रशासित प्रदेश पोलीस दल यांच्याशी समन्वय साधून काम करीत असतो. या गटाची स्थापना १९८५ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर करण्यात आली होती.

एसपीजी गट सुरक्षा वाढविण्यासाठी गुप्तचर विभाग आणि स्थानिक पोलीस दलांबरोबर काम करते. सुरुवातीला मंजूर झालेल्या एसपीजी कायद्यात माजी पंतप्रधानांचा समावेश नव्हता. परंतु, १९९१ मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीयांना किमान १० वर्षे संरक्षण मिळावे यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात आली. सरकार नियमितपणे धोक्याच्या पातळीच्या आधारावर प्रदान केलेल्या सुरक्षेचे पुनरावलोकन करते. एसपीजी कमांडो उच्च कार्यक्षमता असलेल्या हँडगन वापरतात, ज्या अगदी अचूक आणि वापरायला हलक्या असतात.

व्हायरल छायाचित्राची सोशल मीडियावर चर्चा

सोशल मीडियावर अनेकांनी कंगना रणौत यांनी शेअर केलेल्या व्हायरल छायाचित्राचे महिला सक्षमीकरणाचे सशक्त उदाहरण म्हणून कौतुक केले आहे. ‘एक्स’वर एका वापरकर्त्याने लिहिले, “पहिल्यांदा एका महिलेला एसपीजी कमांडो म्हणून पाहत आहे. हेच खरे महिला सक्षमीकरण आहे.” आणखी एका वापरकर्त्याने लिहिले, “तुम्हाला माहीत आहे की, आपल्या देशाचे पंतप्रधान स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणजेच एसपीजीच्या संरक्षणाखाली आहेत. आतापर्यंत पुरुष एसपीजी कमांडो नेहमीच पंतप्रधानांच्या मागे दिसत. या फोटोमध्ये तुम्ही पहिल्यांदाच पंतप्रधानांच्या मागे एक महिला एसपीजी कमांडो पाहू शकता. हेच खरे महिला सक्षमीकरण आहे.”

हेही वाचा : अस्थम्याच्या रुग्णांसाठी मोठी बातमी; गेमचेंजर ट्रीटमेंटचा शोध, ५० वर्षांतील सर्वांत मोठे यश, कसा होणार फायदा?

परंतु, काही वापरकर्त्यांनी निदर्शनास आणले की, छायाचित्रातील महिला बहुधा एसपीजीची नाही. “त्या एसपीजीच्या नाहीत, तर त्या भारतीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या व्हीआयपी सुरक्षा कर्मचारी आहेत,” असे एका वापरकर्त्याने लिहिले. “आजच्या भारतात, कोणत्याही लिंगाच्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या प्रतिभेसाठी समान संधी मिळेल; मग ती स्त्री असो वा पुरुष. हे पाहणे कौतुकास्पद आहे आणि एखाद्या महिलेद्वारे भारताच्या पंतप्रधानांचे संरक्षण केले जाणे ही मोठी गोष्ट आहे,” असे आणखी एका वापरकर्त्याने लिहिले.

Story img Loader