India-Pakistan Tashkent Agreement Lal Bahadur Shastri Death : ११ जानेवारी १९६६ रोजी स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचं निधन झालं. भारत-पाकिस्तान युद्ध समाप्तीच्या १९६५ च्या करारावर स्वाक्षरी केल्यानंतर काही तासांतच त्यांची प्राणज्योत मालवली. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने लाल बहादूर शास्त्री यांचं निधन झालं असं त्यावेळी सांगण्यात आलं होतं. या घटनेला जवळपास ५० वर्षांहून अधिक कालावधी लोटला. मात्र, आजही त्यांच्या मृत्यूबाबत अनेकांच्या मनात विविध प्रश्न आहेत. दरम्यान, लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूनंतर इंदिरा गांधी यांनी १५ दिवसातच पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी नेमकं काय घडलं होतं, याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा : काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दोनदा पराभव केला होता? काय घडलं होतं तेव्हा?

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

‘जय जवान, जय किसान’चा दिला नारा

‘जय जवान, जय किसान’चा नारा देणारे लाल बहादूर शास्त्री अतिशय लोकप्रिय नेते होते. स्वच्छ प्रतिमा आणि साधेपणासाठी त्यांना ओळखलं जायचं. १९०४ मध्ये वाराणसीजवळील मुगलसराय येथे लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म झाला होता. तरुण वयातच त्यांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी स्वत:ला समर्पित केलं होतं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रशासकीय क्षमता आणि प्रामाणिकपणामुळे लाल बहादूर शास्त्री यांना काँग्रेसमध्ये मोठी लोकप्रियता मिळाली. त्यांनी अनेक महत्वाच्या पदांवर काम केले.

रेल्वे अपघातानंतर दिला होता राजीनामा

१९५६ मध्ये लाल बहादूर शास्त्री रेल्वेमंत्री असताना भारतात दोन मोठे रेल्वे अपघात झाले होते. या अपघातात शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी शास्त्री यांनी दोनदा आपल्या पदाचा राजीनामा दिला. पहिल्या अपघातानंतर पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही. परंतु, दुसरा अपघात झाल्यानंतर शास्त्री यांनी पुन्हा रेल्वेमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यावेळी नेहरूंना त्यांचं मन वळवण्यात अपयश आलं. लोकसभेतील भाषणादरम्यान पंतप्रधान नेहरूंनी उच्च आदर्श, निष्ठा आणि कठोर परिश्रमाबद्दल लाल बहादूर शास्त्री यांचे कौतुक केले होते. शास्त्री यांच्यासारखा चांगला सहकारी कोणालाही मिळणार नाही, असं ते म्हणाले होते.

नेहरूंच्या मृत्यूनंतर भारताचे पंतप्रधान

१९६४ मध्ये नेहरूंच्या निधनानंतर लाल बहादूर शास्त्री यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. त्यावेळी पक्षातील सर्वच नेते त्यांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करत होते. अतिशय कठीण काळात देशाचे नेतृत्व करण्याच्या शास्त्रींच्या कार्यक्षमतेवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. दरम्यान, इंडियन एक्स्प्रेसने आपल्या संपादकीयमध्ये असं म्हटलं आहे की, “संयमाने ऐकून घेण्याची आणि ठामपणे निर्णय घेण्याची क्षमता ही लोकशाही नेतृत्वाची ओळख आहे. शास्त्रींच्या या क्षमतेची अजून चाचणी होणे बाकी आहे.”

पाकिस्तानच्या हल्ल्याला दिलं चोख प्रत्युत्तर

लाल बहादूर शास्त्री यांनी भारतातील कृषि व्यवस्थेला चालना देण्यासाठी अनेक आर्थिक धोरणांचे समर्थन केले. ऑगस्ट १९६५ मध्ये पाकिस्तानने भारतावर हल्ला करून काश्मीर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, लाल बहादूर शास्त्री यांनी त्यांचा प्रयत्न यशस्वीरित्या हाणून पाडला. पाकिस्तानच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी शास्त्री यांनी भारतीय जवानांना आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडण्याची परवानगी दिली. त्यावेळी झालेल्या युद्धात भारतीय लष्कराने लाहोरपर्यंतचा भाग जिंकला होता.

संयुक्त राष्ट्राच्या हस्तक्षेपानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाला. त्यावेळी ताश्कंद येथे दोन्ही देशांमध्ये युद्ध समाप्तीचा करार करण्यात आला. १० जानेवारी १९६६ रोजी दुपारी ४ वाजता पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री आणि पाकिस्तानचे अध्यक्ष मोहम्मद अयूब खान यांनी ताश्कंद येथे करारावर स्वाक्षरी केली. ज्याचा उद्देश भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता सुनिश्चित करण्यासाठी एक कायमस्वरूपी चौकट प्रदान करणे होता. दरम्यान, या करारावर स्वाक्षरी केल्यानंतर काही तासांतच शास्त्री यांचं अकाली निधन झालं. त्यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला.

लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यू कसा झाला?

लाल बहादूर शास्त्री यांचे चरित्रकार आणि ताश्कंदमधील भारतीय शिष्टमंडळाचा भाग असलेले श्रीवास्तव म्हणाले की, पंतप्रधानांनी संध्याकाळी उशिरा हलकं जेवण केलं. रात्री ११.३० वाजता ते एक ग्लास दूध घेऊन झोपी गेले. जवळपास दीडच्या बेतात पंतप्रधानांना अचानक खोकला आला. त्यांनी तातडीने डॉक्टरांना फोन करून बोलावून घेतलं. मात्र, डॉक्टरांच्या येण्याआधी १ वाजून ३२ मिनिटांनी शास्त्री यांची प्राणज्योत मालवली.

पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर अनेक कयास लावण्यात आले. त्यांना विष देण्यात आलं होतं का असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. शास्त्री यांचे पार्थिव भारतात आणल्यानंतर त्यांचे शरीर निळे झाले होते. त्यामुळे त्यांचा मृत्यूबाबत आणखीच शंका निर्माण झाल्या. लाल बहादूर शास्त्री यांचे चरित्रकार श्रीवास्तव आपल्या ‘Lal Bahadur Shastri: A Life of Truth in Politics (1996)’ या पुस्तकात लिहितात की, “शरीर-संरक्षण प्रक्रियेमुळे शास्त्री यांचे अंग निळे झाले होते. मृत्यूनंतर काही तास त्यांच्या चेहऱ्याचा रंग अगदी सामान्य होता.”

Maharashtra Politics : भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत?

शास्त्री यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन का केले नाही?

लाल बहादूर शास्त्री यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं नाही. त्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबत आणखी शंका उपस्थित केल्या जात होत्या. दरम्यान, शवविच्छेदन का करण्यात आलं नाही, याबाबत श्रीवास्तव लिहितात की, “यूएसएसआरमधील डॉक्टरांच्या पथकाने आणि पंतप्रधानांच्या वैयक्तिक डॉक्टरांनी हृदयविकाराच्या झटक्यानेच त्यांचा मृत्यू झाला असे स्पष्ट केले होते. कारण, याआधीही पंतप्रधान शास्त्री यांना दोनवेळा हृदयविकाराचा झटका आलेला होता. कुटुंबियांनीही त्यांच्या शवविच्छेदनाची मागणी केली नव्हती. म्हणून आम्ही शवविच्छेदन न करण्याचा निर्णय घेतला.”

पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनावर अनेक प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आले. यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी पंतप्रधानांच्या मृत्यूबद्दल अनेक वेळा माहिती मागितली. यानंतर ताश्कंदमधील सोव्हिएत गुप्तचर संस्था केजीबीने शास्त्रींच्या व्हिलामध्ये काम करणारा बटलर अहमद सत्तारोव नामक व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी देखील करण्यात आली. मात्र, चौकशीतील अहवाल समोर आला नाही. भारत सरकारने या प्रकरणी कारवाई का केली नाही, असा प्रश्न आजही अनेकांच्या मनात आहे.

लाल बहादूर शास्त्रींच्या मृत्यूचे गुढ कायम

१९७७ मध्ये सत्तेत आलेल्या जनता सरकारने राज नारायण यांच्या नेतृत्वाखाली लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश दिले. परंतु, त्यातून कोणताही ठोस निष्कर्ष निघाला नाही. काही दिवसांनी शास्त्री यांची देखभाल करणारे डॉक्टर चुग आणि त्यांच्या कुटुंबियांचा ट्रकचा धडकेत मृत्यू झाला. या अपघातातून त्यांची एक मुलगी थोडक्यात वाचली. शास्त्री यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्यूबाबत अनेकवेळा माहिती मागितली, मात्र त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. २०१९ मध्ये एका माहिती अधिकारातून शास्त्री यांच्या मृत्यूची माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. तेव्हा पंतप्रधान कार्यालयाने या घटनेशी संबंधित एकही फाइल सार्वजनिक करण्यास नकार दिला.

Story img Loader