गेल्या वर्षी कझाकिस्तानमधील तेलाचा शोध घेणाऱ्या एका विहिरीतून मिथेन वायूची आतापर्यंतची सर्वात धोकादायक गळती झाली होती. ती घटना खूपच चर्चेतही आली होती. तेव्हा सुमारे १ लाख २७ हजार टन मिथेन गॅसची गळती झाल्याचं सांगितलं जात आहे. सुमारे सहा महिने चाललेल्या तेलाचा शोध घेणाऱ्या विहिरीत अचानक स्फोट झाल्याने आग लागली, तेव्हा हा प्रकार घडला. मिथेन हा कार्बन डाय ऑक्साईडपेक्षा खूप शक्तिशाली हरितगृह वायू आहे. खरं तर ही कदाचित मानवनिर्मित मिथेन गळतीची दुसरी सर्वात मोठी घटना असावी. जीवाश्म इंधन प्रक्रियेतून होणारी गळती हा मिथेन उत्सर्जनाचा सर्वात मोठा स्रोत असून, यातून जवळपास ४० टक्के मानव निर्मित मिथेन उसर्जित होतो. कझाकिस्तानमध्ये नेमके काय घडले आणि त्याचा पर्यावरणावर कसा परिणाम झाला हे जाणून घेऊ.

तज्ज्ञ काय म्हणतात?

ग्रीनहाऊस गॅस इक्विव्हलन्सी कॅल्क्युलेटर ही अमेरिकन संस्था पर्यावरण बदलावर लक्ष ठेवते. संस्थेच्या म्हणण्यानुसार, एवढ्या मोठ्या प्रमाणात गॅस गळतीचा परिणाम संपूर्ण वर्षभर जाणवला होता. मॅनफ्रेडी कॅलटागिरोन हे संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय मिथेन उत्सर्जन वेधशाळेचे प्रमुख आहेत. “गळतीचे प्रमाण आणि वेळ निश्चितच खूप असामान्य आहे,” असेही त्यांनी सांगितले. ही गळती ९ जून २०२३ रोजी सुरू झाली. विहीर खोदत असताना स्फोट झाल्याने ही घटना घडली. ही घटना दक्षिण-पश्चिम कझाकिस्तानमधील मँगिस्ताऊ भागात घडली. या घटनेनंतर तेथे आग लागली, ती वर्षाच्या अखेरपर्यंत धगधगत होती. २५ डिसेंबर २०२३ रोजी ही आग आटोक्यात आली. पाच उपग्रह उपकरणांद्वारे शास्त्रज्ञांनी सहा महिन्यांत ११५ वेळा गळती शोधून काढली. स्थानिक अधिकाऱ्यांनी बीबीसीला सांगितले की, सध्या ही तेलाची विहीर सिमेंटने सील करण्यात आली आहे. नैसर्गिक वायू हा प्रामुख्याने मिथेनपासून तयार केला जातो, जो एक पारदर्शक वायू आहे. परंतु जेव्हा सूर्यप्रकाश मिथेन वायूतून आर पार जातो, तेव्हा तो उपग्रहाद्वारे सहजपणे शोधता येऊ शकणारे निशाण मागे सोडतो. या प्रकरणात कझाकिस्तानस्थित बुझाची नेफ्ट या विहिरीच्या मालकांना ३५० दशलक्ष टेंगे (७७४,००० डॉलर) पेक्षा जास्त दंड ठोठावला जाणार आहे, असंही बीबीसीने सांगितले. खरं तर या गळतीची चौकशी फ्रेंच संस्था कायरोसने केली असून, गेल्या महिन्यात त्याचे निष्कर्षही समोर आलेत. त्यांचे विश्लेषण आता नेदरलँड्स इन्स्टिट्यूट फॉर स्पेस रिसर्च आणि स्पेनच्या पॉलिटेक्निक युनिव्हर्सिटी ऑफ व्हॅलेन्सियाद्वारे केले जात आहे. या आधारे या एका विहिरीतून १ लाख २७ हजार टन मिथेनची गळती झाल्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. मानवामुळे झालेल्या मिथेन गळतीची ही आतापर्यंतची दुसरी सर्वात मोठी असू शकते.

Global Warming, Chandrapur , International Conference on Climate Change-2025,
‘ग्लोबल वॉर्मिंग’विरोधात शंखनाद, चंद्रपुरात पर्यावरण बदलावर…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Greenhouse gas emissions from country decreased 7 93 percent in 2020
हरित वायू उत्सर्जनात मोठा दिलासा, जाणून घ्या, हरित वायू उत्सर्जनाची स्थिती
Mumbai woman entered house in Malad and tried to rob 91 year old woman
कात्रजमध्ये पेट्रोल पंपावरील कामगाराला मारहाण करुन रोकड लूटीचा प्रयत्न; शहरात लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ
readers feedback on loksatta editorial readers reaction on loksatta articles
लोकमानस : उत्तर निसर्गकेंद्री विकासाचे…
Atal Setu , Atal Setu one year , Atal Setu Transport ,
वर्षभरात अटल सेतूवरुन धावली ८२ लाख ८१ हजार वाहने, सेतू वाहतूक सेवेत दाखल होऊन एक वर्षे पूर्ण
Petrol Diesel Rate In Maharashtra
Petrol Diesel Rate: महाराष्ट्रातील काही शहरांत इंधनाच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव
Dr. K. Kathiresan fears marine carbon sequestration collapse from 2025 due to plastic pollution
समुद्रात कार्बन शोषणारी यंत्रणा कोलमडण्याची शक्यता, शास्त्रज्ञ डॉ. के. कथीरेसन यांनी व्यक्त केली भिती

हेही वाचाः भारताने EFTA सह व्यापार करारावर केली स्वाक्षरी; त्याचे महत्त्व काय?

कझाकिस्तान गळतीचा पर्यावरणावर काय परिणाम होणार?

यूएस एन्व्हायर्नमेंटल प्रोटेक्शन एजन्सीच्या ग्रीनहाऊस गॅस इक्विव्हलन्सी कॅल्क्युलेटरच्या मते, मिथेन हा हवामान बदलासाठी कारणीभूत ठरणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे, कार्बन डाय ऑक्साईडनंतर तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या काही शतकांमध्ये त्याचे वातावरणातील प्रमाण दुप्पट झाले आहे आणि औद्योगिक क्रांतीनंतर जागतिक तापमानात सुमारे ३० टक्के वाढ झाली आहे. कझाकिस्तान मिथेन गळती ही तेल आणि वायू क्षेत्रातील अशा गळतीच्या लांबलचक यादीत नवी भर घालणारी आहे. अमेरिकेपासून तुर्कमेनिस्तानपर्यंत जगभरातील तेल आणि वायू क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर मिथेन गळती होत आहे, ज्याला सुपर एमिटर इव्हेंट म्हणून ओळखले जाते,” असे यूएस एन्व्हायरोन्मेंटल प्रोग्रॅमने म्हटले आहे. यातील बहुतेक गळती उपकरणांत झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे होते. विशेष म्हणजे २०२३ मध्ये वातावरणात हरितगृह वायूचे प्रमाण सर्वाधिक होते. मिथेनचे प्रमाण ११ पार्ट्स प्रति अब्ज (ppb) वाढले.

हेही वाचाः विश्लेषण : उचित खटल्याविनाच झुल्फिकार अली भुत्तोंना फासावर चढवले… पाकिस्तान सुप्रीम कोर्टाला आताच का उपरती? काय होते प्रकरण?

येत्या काळात तापमानवाढ मर्यादित करण्यासाठी आणि हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मिथेन उत्सर्जनात होणारी वाढ थांबवण्याची आवश्यकता आहे, असे इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी (IEA) म्हटले आहे. खरं तर सरासरी जागतिक तापमान आधीच औद्योगिकीकरणामुळे पूर्वीच्या काळापेक्षा किमान १.२ अंश सेल्सिअसने वाढले आहे. २०१५ पॅरिस करारातही यासंदर्भात चिंता व्यक्त करण्यात आली होती. देशांनी मिथेन आणि कार्बन डायऑक्साइड यांसारख्या हरितगृह वायूंना आळा घालण्यासह काही पावले तातडीने अंमलात आणणे आवश्यक असल्याचंही IEA ने सांगितले.

Story img Loader