स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ तीन दिवसांच्या भारत दौर्‍यावर आले आहेत. स्पेनचे पंतप्रधान १८ वर्षांनंतर भारतात आले आहेत. गुजरातमध्ये टाटा-एअरबस C295 विमान सुविधेच्या संयुक्त उद्घाटनानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर वडोदराच्या लक्ष्मी विलास राजवाड्यामध्ये जाणार आहेत, जिथे त्यांच्यासाठी राजेशाही थाटात जेवणाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असलेले स्पेनचे पंतप्रधान सोमवारी पहाटे वडोदरा येथे दाखल झाले. या हाय-प्रोफाइल भेटीपूर्वी, वडोदरा आणि ते ज्या हॉटेलमध्ये रहात आहेत, तेथे पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. राजवाड्यात होणार्‍या या हाय-प्रोफाइल बैठकीमुळे हा वाडा पुन्हा चर्चेत आला आहे. लक्ष्मी विलास राजवाडा कुठे आहे? त्या वाड्याचा इतिहास काय? त्याला जगातील सर्वात मोठ्या राजवाड्याचा दर्जा कसा मिळाला, त्याविषयी जाणून घेऊ.

लक्ष्मी विलास राजवाडा गुजरातच्या वडोदरामध्ये स्थित आहे. त्याच्या कलात्मक वैशिष्ट्यांमुळेच या राजवाड्याला एक ओळख मिळाली आहे. राजवड्यातील काही वास्तू सामान्यजनांसाठी खुले असल्याने लाखोंच्या संख्येने पर्यटक या वाड्याला भेट देतात. या वास्तूचे बांधकाम इंडो सारसेनिक शैलीत करण्यात आले आहे.

congress party office delhi
चांदणी चौकातून: गजबज…
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
History of Ajrak
History of Ajrakh: इजिप्तपासून ते मोहेंजोदारोपर्यंत आधुनिक अजरकचा इतिहास आहे तरी किती जुना?
mohan vankhande sangli
सांगली: वनखंडे यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर भाजपबरोबर आघाडीतही अस्वस्थता
Shivaji Maharaj and Tulaja Bhavani
Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांची भवानीभक्ती आणि युद्धतंत्र; बखरकारांनी नेमके काय संदर्भ दिले आहेत?
tallest building in Nagpur, High court Nagpur Bench,
नागपुरातील सर्वात उंच इमारतीबाबत अखेर न्यायालयाचा निर्णय आला, आता ही इमारत…
Bangladesh Jeshoreshwari Temple
Bangladesh : बांगलादेशातील जेशोरेश्वरी मंदिरातून देवी कालीचा मुकुट चोरीला; पंतप्रधान मोदींनी दिला होता भेट
abhyudaya nagar residents to get 635 sq ft home in redevelopment
रहिवाशांना ६३५ चौरस फुटांचे घर; अभ्युदयनगर वसाहत पुनर्विकास; बांधकामासाठी आज निविदा

हेही वाचा : विधानसभा निवडणुकीत शेतीचे मुद्दे किती प्रभावी? राज्यातील शेतीची सद्यस्थिती काय?

राजवाड्याची वैशिष्ट्ये

१. ऐतिहासिक लक्ष्मी विलास राजवाडा माजी बडोदा राजघराण्याचे निवासस्थान आहे. याला सहा दशलक्ष रुपये खर्चून १९ व्या शतकात इंडो सारासेनिक शैलीत बांधण्यात आले आहे.

ऐतिहासिक लक्ष्मी विलास राजवाडा माजी बडोदा राजघराण्याचे निवासस्थान आहे. (छायाचित्र-इंडियन एक्स्प्रेस)

२. ५०० एकर परिसरात पसरलेला हा राजवाडा आतापर्यंत बांधण्यात आलेले सर्वात मोठे खाजगी निवासस्थान आहे आणि बकिंगहॅम पॅलेसच्या आकाराच्या चौपट आहे. ही वास्तू बकिंगहॅम पॅलेसपेक्षा चौपट मोठी असल्याचे सांगितले जाते.

३. गायकवाड घराण्याच्या काळात लक्ष्मी विलास राजवाड्यात सुशोभीत दरबार हॉलमध्ये राजेशाही आणि मान्यवरांसाठी भव्य मेजवानी आणि मैफिलीचे आयोजन केले जात असे. सोमवारी (२८ ऑक्टोबर) राजवाड्यात पहिल्यांदाच दोन देशांतील प्रमुख नेत्यांचे स्वागत होईल.

४. या राजवाड्याला गुजरातचा सर्वात आश्चर्यकारक राज-युग राजवाडा म्हणून ओळखले जाते. राजवाड्याच्या आतील भागात शस्त्रसंग्रहालय, तसेच विविध कलाकृती आहेत; ज्यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीची छाप स्पष्टपणे दिसून येते.

५. राजवाड्यात प्रसिद्ध कलाकार राजा रविवर्मा यांच्या चित्रांचा संग्रहदेखील आहे. त्यांना बडोद्याच्या तत्कालीन महाराजांनी नियुक्त केले होते.

६. लक्ष्मी विलास राजवाडा संगमरवरी, मोजेक टाइल्स आणि असंख्य कलाकृतींनी सजवलेला आहे. यात तळवे, कारंजे, गोल्फ कोर्स आणि सयाजीरावांचे वैयक्तिक संग्रहालयदेखील आहे.

७. मैदानात नवलखी पायरी विहीर आहे. गुजरातमधील पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी बांधलेली ही एक प्राचीन जलव्यवस्था आहे.

राजवाड्यात प्रसिद्ध कलाकार राजा रविवर्मा यांच्या चित्रांचा संग्रहदेखील आहे. (छायाचित्र-इंडियन एक्स्प्रेस)

८. राजवाड्याच्या परिसरात बँक्वेट्स, मोती बाग पॅलेस आणि महाराजा फतेह सिंग संग्रहालयदेखील आहे.

९. मोतीबाग क्रिकेट मैदानात बडोदा क्रिकेट असोसिएशनची कार्यालये आणि टेनिस व बॅडमिंटनचे इंडोअर कोर्टदेखील आहे.

१०. बडोद्यावर राज्य करणाऱ्या गायकवाड घराण्याने १९ व्या शतकात बांधलेल्या या राजवाड्याची रचना मुख्य वास्तुविशारद मेजर चार्ल्स मांट यांनी इंडो सारासेनिक रिव्हायव्हल शैलीमध्ये केली होती.

हेही वाचा : कमी झोपेमुळे मेंदू वेळेआधी वृद्ध होतो? नवीन अभ्यास काय सांगतो?

या कार्यक्रमानंतर पेड्रो सांचेझ अधिकृत कार्यासाठी मुंबईला जातील, जिथे ते व्यापारी आणि उद्योगपती, थिंक टँक आणि चित्रपट उद्योगातील प्रमुख व्यक्तींशी संवाद साधतील. त्यादरम्यान अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा आहे. सांचेझ यांच्या दौऱ्याला भारत आणि स्पेनसाठी व्यापार आणि गुंतवणूक, आयटी, पायाभूत सुविधा, नवीकरणीय ऊर्जा, संरक्षण आणि सुरक्षा, फार्मा, कृषी तंत्रज्ञान, बायोटेक, संस्कृती आणि पर्यटन यांसारख्या क्षेत्रांमध्ये संबंध मजबूत करण्याची संधी म्हणून पाहिले जात आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे सांगणे आहे.