स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ तीन दिवसांच्या भारत दौर्यावर आले आहेत. स्पेनचे पंतप्रधान १८ वर्षांनंतर भारतात आले आहेत. गुजरातमध्ये टाटा-एअरबस C295 विमान सुविधेच्या संयुक्त उद्घाटनानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर वडोदराच्या लक्ष्मी विलास राजवाड्यामध्ये जाणार आहेत, जिथे त्यांच्यासाठी राजेशाही थाटात जेवणाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असलेले स्पेनचे पंतप्रधान सोमवारी पहाटे वडोदरा येथे दाखल झाले. या हाय-प्रोफाइल भेटीपूर्वी, वडोदरा आणि ते ज्या हॉटेलमध्ये रहात आहेत, तेथे पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. राजवाड्यात होणार्या या हाय-प्रोफाइल बैठकीमुळे हा वाडा पुन्हा चर्चेत आला आहे. लक्ष्मी विलास राजवाडा कुठे आहे? त्या वाड्याचा इतिहास काय? त्याला जगातील सर्वात मोठ्या राजवाड्याचा दर्जा कसा मिळाला, त्याविषयी जाणून घेऊ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा