Snake Named After Leonardo DiCaprio: पश्चिम हिमालयात संशोधकांच्या एका टीमने शोधलेल्या नवीन सापाच्या प्रजातीला हॉलीवूड अभिनेता आणि निर्माता लिओनार्डो डिकॅप्रिओ यांच्या नावावरून नाव देण्यात आले आहे. त्यांने पर्यावरण संरक्षणासाठी दिलेल्या योगदानाच्या सन्मानार्थ त्याचे नाव या नव्या शोधलेल्या सापाच्या प्रजातीला देण्यात आले आहे.

या प्रजातीचा शोध कसा लागला?

‘Anguiculus dicaprioi’ किंवा DiCaprio’s Himalayan snake या नावाची नवीन प्रजाती संशोधकांनी शोधली आहे. २०२० साली भारत, जर्मनी आणि युनायटेड किंगडममधील संशोधकांच्या टीमने भारतातील सरपटणाऱ्या प्राण्यांवरील प्रकल्पाचा भाग म्हणून कमी ज्ञात प्रजातींच्या सापांचा शोध घेत घेण्यास सुरुवात केली होती. त्याच शोधाचे फलित म्हणून या सापाच्या प्रजातीचा शोध लावण्यात आला होता. त्यांच्या शोधाची आणि नवीन प्रजातीच्या अभ्यासाची माहिती सोमवारी ‘सायंटिफिक रिपोर्ट्स’ या पीअर-रिव्ह्यू केलेल्या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आली. संशोधकांनी या नवीन प्रजातीचे वर्गीकरण ‘अंगुईक्युलस’ या नवीन वंशात केले आहे. या शब्दाचा लॅटिनमध्ये अर्थ ‘लहान साप’ असा होतो.

saurabh gadgil Success Story
Success Story: भारतातील अब्जाधीशांच्या यादीत पुण्यातील ‘या’ व्यक्तीच्या नावाचा समावेश; १९२ वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Skoda Kylaq vs Maruti Brezza Engine Feature Price Compare
मारुतीला टक्कर द्यायला लवकरच येणार स्कोडाची ‘ही’ एसयूव्ही, इंजिन स्पेसिफिकेशनमध्ये कोण ठरेल वरचढ? घ्या जाणून…
pune husband kills wife
चारित्र्याच्या संशयातून महिलेच्या डोक्यात सिलिंडर घालून खून, विश्रांतवाडी भागातील घटना; पती गजाआड
Nilima Sheikh Kashmir paintings
कलाकारण: काश्मीरची पिछवाई…
Why is youth stuck in craze of online gaming
तरुणाई का अडकते आहे ऑनलाइन गेमिंगच्या विळख्यात?
Ratan Tata Passed Away Ratan Tata Death Harsha goenka Sundar Pichai Tribute tweet
Ratan Tata Death: “घड्याळाची टिकटीक थांबली…” हर्ष गोयंका यांची मन हेलावणारी पोस्ट; पिचाई म्हणाले, ‘भारताला…’
Donald trump Vladimir putin
विश्लेषण: ‘मित्र’ पुतिन यांच्या सतत संपर्कात असतात ट्रम्प? नव्या पुस्तकातील दाव्याने युक्रेनच्या चिंतेत भर?

अधिक वाचा: 2,000-year-old temple:समुद्राखाली सापडलेले २००० वर्षे प्राचीन मंदिर कोणता इतिहास सांगते? 

संशोधकांनी प्रकल्पाचा एक भाग म्हणून हिमाचल प्रदेशातील पश्चिम हिमालयातील डोंगराळ भागांना भेट दिली होती. त्यावेळी त्यांना मातीच्या रस्त्यावर काही तपकिरी रंगाचे साप आढळले. हे साप उन्हात बसलेले दिसले आणि पकडले जाईपर्यंत निश्चल राहिले, त्यांनी चावण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही, असे शोधनिबंधात नमूद केले आहे. या सापांच्या अभ्यास, त्यांचे डीएनए विश्लेषण आणि इतर सापांशी तुलना केल्यानंतर या नवीन प्रजातीचा शोध लागला.

या प्रजातीची वैशिष्ट्ये काय आहेत?

हिमाचल प्रदेशातील चंबा आणि कुल्लूसारख्या भागांमध्ये आढळण्याव्यतिरिक्त या नवीन प्रजातीचे साप नैनीताल (उत्तराखंड) आणि नेपाळमधील चितवन नॅशनल पार्कमध्येही आढळले आहेत, असे मिझोराम विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागातील प्राध्यापक आणि संशोधनाच्या टीमचे सदस्य एचटी. लालरेमसंगा यांनी सांगितले. संशोधन टीममधील इतर संशोधकांमध्ये झीशान ए मिर्झा, विरेंदर के भारद्वाज, सौनक पाळ, गेरनोट वोगेल, पॅट्रिक डी कॅम्पबेल आणि हर्षील पटेल यांचा समावेश आहे. संशोधनानुसार या नवीन प्रजातीला अनेक दात असून ती लहान आकाराची आहे, त्यांचा आकार सुमारे २२ इंच लांबीपर्यंत वाढतो. या सापांवर लहान गडद तपकिरी ठिपके असून त्यांची मान रुंद असते, मजबूत कवटी आणि तिरकस उंचवलेलं नाक ही या सापाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. हे साप समुद्रसपाटीपासून सुमारे ६,००० फूट उंचीवर राहतात.

Leonardo DiCaprio
लिओनार्डो डिकॅप्रिओ (स्रोत: रॉयटर्स)

या प्रजातीला लिओनार्डो डिकॅप्रिओ यांचं नाव का देण्यात आलं?

अभ्यासात नमूद केल्याप्रमाणे, या प्रजातीचे विशिष्ट नाव ‘डिकॅप्रिओई’ हे अमेरिकन अभिनेता, चित्रपट निर्माता आणि पर्यावरणवादी लिओनार्डो डिकॅप्रिओ यांना सन्मान देणारे आहे. त्याने जागतिक हवामानबदल, जैवविविधतेची वाढती हानी आणि प्रदूषणामुळे उद्भवणाऱ्या मानवी आरोग्याच्या समस्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी सक्रियपणे काम केले आहे. याशिवाय, त्याने क्षेत्रीय संवर्धनाच्या उपक्रमांसाठी आणि संशोधनासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. या नव्या सापाच्या प्रजातीला सुचवलेले सामान्य नाव ‘डिकॅप्रिओ हिमालयीन साप’ असल्याचे शोधनिबंधात नमूद करण्यात आले आहे.

अधिक वाचा: Mumbai’s first encounter: मुंबईतील पहिलं एन्काऊंटर मन्या सुर्वे, नेमकं काय घडलं होतं?

लिओनार्डो डिकॅप्रिओ याचा जागतिक पर्यावरणासाठी लागलेला हातभार?

लिओनार्डो डिकॅप्रिओ त्याच्या पर्यावरणीय कार्यांसाठी प्रसिद्ध आहेत. त्याने जागतिक पर्यावरणीय समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि संवर्धनाच्या प्रयत्नांना सक्रिय पाठिंबा देण्यासाठी दीर्घकाळ काम केले आहे.

१. लिओनार्डो डिकॅप्रिओ फाउंडेशन (LDF):

१९९८ साली त्याने लिओनार्डो डिकॅप्रिओ फाउंडेशनची स्थापना केली. हे फाउंडेशन पृथ्वीवरील धोक्यात आलेल्या परिसंस्थांचे संतुलन पुनर्स्थापित करण्यावर आणि हवामान बदलाच्या तातडीच्या समस्यांचे निराकरण करण्यावर लक्ष केंद्रित करते. या फाउंडेशनने ५० पेक्षा जास्त देशांमध्ये २०० हून अधिक प्रकल्पांना निधी दिला आहे.

२ .हवामानबदलाविषयी जागरूकता:

डिकॅप्रिओ हवामान बदलावर जागरूकता निर्माण करण्यासाठी सक्रिय कार्यरत आहे. त्याने बिफोर द फ्लड (२०१६) नावाचा माहितीपट तयार केला. ज्यामध्ये हवामानबदलाचे विध्वंसक परिणाम आणि त्याविषयी घेण्यात यावी अशी तातडीची भूमिका आवश्यकता भर देण्यात आला आहे.

३. UN शांतिदूत:

२०१४ साली, डिकॅप्रिओ यांची हवामान बदलावर विशेष लक्ष केंद्रित करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांचे शांतिदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याने UN हवामान परिषदेत एक प्रभावी भाषण केले आणि जागतिक नेत्यांना जागतिक तापमानवाढीच्या वाढत्या धोक्याच्या विरोधात कार्य करण्याचे आवाहन केले होते.

४. संवर्धन आणि वन्यजीव संरक्षणाचे समर्थन:

डिकॅप्रिओ याने वाघ, हत्ती, शार्क आणि इतर धोक्यात आलेल्या प्रजातींच्या संरक्षणासाठी विविध उपक्रमांना पाठिंबा दिला आहे त्याने वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होणे आणि अवैध शिकार यांविरोधात काम केले आहे.

५. पर्यावरणीय संस्थांशी सहकार्य:

डिकॅप्रिओ यांनी WWF, आंतरराष्ट्रीय प्राणी कल्याण निधी (IFAW), आणि नैसर्गिक संसाधन संरक्षण परिषद (NRDC) सारख्या अनेक पर्यावरणीय संस्थांसोबत काम केले आहे आणि संवर्धनाच्या प्रयत्नांसाठी लाखो डॉलर्सचे योगदान दिले आहे.

६. माहितीपट निर्मिती:

बिफोर द फ्लड व्यतिरिक्त, डिकॅप्रिओ याने द एलेव्हन्थ अवर (२००७) नावाचा मानव आणि निसर्ग यांच्या संबंधांवर प्रकाश टाकणारा माहितीपट तयार केला. तसेच त्याचा आइस ऑन फायर (२०१९) नावाचा माहितीपट हवामानसंकटाचे संभाव्य समाधान शोधण्यावर भर देणारा आहे.

७. जागतिक जनजागृती अभियान:

डिकॅप्रिओ त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि सार्वजनिक कार्यक्रमांद्वारे सतत पर्यावरणीय जागरुकतेवर भर देतो, उदा. वर्षावनांचे संरक्षण, स्वच्छ समुद्र, किंवा शाश्वत विकास यांसाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी तो सोशल मीडिया हॅण्डल्सचा वापर करतो. या सर्व प्रयत्नांमुळे डिकॅप्रिओ केवळ एक प्रसिद्ध हॉलीवूड स्टार म्हणूनच नव्हे तर पृथ्वीच्या संरक्षणासाठी काम करणारा आघाडीचा पर्यावरण कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो. म्हणूनच लिओनार्डो डिकॅप्रिओ याचे नाव विविध प्रजातींना देण्यात आलं आहे.

अधिक वाचा: Viral Black Cat-Golden Retriever: ‘ब्लॅक कॅट’ गर्लफ्रेंड म्हणजे काय? हा व्यक्तिमत्त्वाचा प्रकार नातेसंबंधांवर कसा परिणाम करू शकतो?

त्यांच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या महत्त्वाच्या प्रजाती कोणत्या?

१.लिओपेलिस डिकॅप्रिओई (Leopelis DiCaprioi): एक बेडूक प्रजाती, ज्याचे नाव डिकॅप्रिओ याच्या नावावर ठेवण्यात आले आहे. हा बेडूक पश्चिम आफ्रिकेतील जंगलांमध्ये आढळतो.

२. लिओनार्डो डिकॅप्रिओ कॅमीलियन (Calumma leonardi): मादागास्करमध्ये आढळणाऱ्या एका कॅमिलियन प्रजातीला डिकॅप्रिओ यांचे नाव देण्यात आले आहे.

३. लिओनार्डोडीकाप्रोई (Grouvellinus leonardodicaprioi): या प्रजातीचा एक दुर्मिळ बीटल (भुंगा) मलेशियातील बोर्नियोमध्ये आढळतो.

Grouvellinus leonardodicaprioi
ग्रुव्हेलिनस लिओनार्डोडीकाप्रोई (फोटो: विकिपीडिया)

४. अंगुईक्युलस डिकॅप्रिओई (Anguiculus dicaprioi): ही नवीन सापाची प्रजाती पश्चिम हिमालयात शोधली गेली.

Himalayan Snake Photo: Virender Bharadwaj
फोटो: वीरेंद्र भारद्वाज

या प्रजातींना डिकॅप्रिओ याचे नाव देणे हा त्याच्या पर्यावरणीय कार्यासाठी दिला गेलेला सन्मान आहे, कारण त्याने जागतिक पर्यावरणीय समस्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.