केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ अर्थात सीबीडीटीने (CBDT) सर्व करदात्यांना त्यांचे पनकार्ड आधार कार्डशी जोडण्यासाठी ३१ मार्च २०२३ ची अंतिम मुदत दिली आगहे. या मुदतीपर्यंत जर पॅन आधारशी जोडले नाही तर १ एप्रिल २०२३ पासून पॅनकार्ड निष्क्रिय केले जाणार आहे. भांडवली बाजार नियामक मंडळ अर्थात सेबीनेही (SEBI) निर्देश दिले आहेत की, गुंतवणूकदारांनी मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत पॅन कार्ड – आधार कार्ड लिंक करावे. दोन्ही कार्ड लिंक करणाऱ्या गुंतवणूकदारांनाच यापुढे भांडवली बाजारात व्यवहार करता येणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पॅन कार्डला आधारशी जोडण्यामागील कारण काय आहे?
एका व्यक्तीच्या नावावर अनेक पॅन कार्ड असल्याचे आणि अनेक व्यक्तींना एकच पॅन कार्ड वितरित केल्याचे लक्षात आल्यानंतर प्राप्तिकर विभागाने (Income Tax) पॅन कार्ड आधार कार्डसोबत जोडण्याची घोषणा केली. पॅनचा डेटाबेस बळकट करण्यासाठी त्यामधील डुप्लिकेनश काढणे गरजेचे होते. त्यासाठी आधार कार्ड असलेल्या करदात्यांना दोन्ही कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. यापुढे पॅनसाठी अर्ज करताना किंवा उत्पन्नाचा परतावा मिळवत असताना त्याठिकाणी आधार कार्ड क्रमांक देणे अनिवार्य असणार आहे.
आधारशी पॅन लिंक करणे कुणासाठी आवश्यक?
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) मार्च २०२२ रोजी काढलेल्या पत्रकानुसार प्राप्तिकर कायद्यामध्ये दुरुस्ती करून १ जुलै २०१७ च्या आधी ज्या लोकांना पॅन कार्ड मिळाले आहे, त्या सर्वांनी पॅन कार्ड आधारशी लिंक करणे सक्तीचे करण्यात आले आहे. हे करण्यासाठी ३१ मार्च २०२३ ही शेवटची मुदत देण्यात आली आहे. जर या मुदतीआधी लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण केली नाही तर १ एप्रिल २०२३ पासून पॅन कार्ड निष्क्रिय होईल, असेही सीबीडीटीने सांगितले.
आधारशी पॅन कार्ड लिंक करणे कुणाला आवश्यक नाही?
खालील वर्गवारीनुसार या लोकांना आधार-पॅन लिंक करणे अनिवार्य नसणार आहे.
- ८० वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या व्यक्ती
- प्राप्तिकर कायद्यानुसार अनिवासी भारतीय
- भारताच्या नागरिक नसलेल्या व्यक्ती
लिंक प्रक्रिया केली नाही तर काय होईल?
वर नमूद केल्याप्रमाणे पॅन कार्ड – आधार कार्ड लिंक न केल्यास पॅन कार्ड निष्क्रिय होणार आहे, हे सीबीडीटीने याआधीच सांगितले आहे. असे झाल्यास संबंधित व्यक्ती पॅन कार्ड वापरणे किंवा गुंतवणूक करण्यासाठी ग्राह्य धरता येणार नाही. ज्यांचे पॅन रद्द होईल त्यांना प्राप्तिकर कायद्यानुसार जे काही पुढील परिणाम असतील त्यांना तोंड द्यावे लागेल. जे या आदेशाची पूर्तता करणार नाहीत, त्यांच्यावर पुढील कारवाई होऊ शकते.
- अशा व्यक्ती पॅन वापरून प्राप्तिकर भरण्यास सक्षम असणार नाहीत.
- प्रलंबित कर भरण्याची प्रक्रिया केली जाणार नाही.
- प्रलंबित परतावा निष्क्रिय पॅन कार्डधारकांना मिळणार नाही.
- एकदा पॅन निष्क्रिय झाले तर चुकीच्या रिटर्नबाबात कोणतीही प्रलंबित कार्यवाही पूर्ण करता येणार नाही.
- एकादा का पॅन निष्क्रिय झाले तर उच्च दराने कर कपात केली जाऊ शकते.
याबरोबरच पॅन कार्ड निष्क्रिय झालेल्या व्यक्तींना बँकेसोबत व्यवहार करताना अडचण निर्माण होऊ शकते. बँक व्यवहार करण्यासाठी पॅन हा महत्त्वाचा केवायसी निकष आहे.
सेबीने गुंतवणूकदारांसाठी लिंक करणे अनिवार्य का केले?
पॅन हा ओळखपत्रासाठी वापरला जाणार एक महत्त्वाचा पुरावा आहे. तसेच केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रांमध्येही पॅनकार्डचा मुख्य समावेश आहे. सेबीच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या सर्व कंपन्यांमध्ये आणि मार्केट इन्फ्रस्ट्रक्चर संस्थेमध्ये (Miis) केवायसी कारण्यासाठी पॅन कार्ड हा महत्त्वाचा घटक मानला जातो.
सिक्युरिटीज मार्केटमध्ये सतत आणि सुरळीत व्यवहार करण्यासाठी सीबीडीटीने ३० मार्च २०२२ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार ३१ मार्च २०२३ पर्यंत दोन्ही कार्ड लिंक करावे लागतील. जे लोक लिंक करणार नाहीत, त्यांची खाती केवायसी नसलेली खाती समजली जातील आणि जोपर्यंत आधार व पॅन कार्ड लिंक होत नाही, तोपर्यंत सिक्युरिटीज आणि इतर व्यवहारांवर निर्बंध येऊ शकतात.
पॅन व आधार लिंक कसे करणार?
- https://incometaxindiaefiling.gov.in/ या आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- त्यावर नोंदणी केली नसेल तर आधी नोंदणी करा. तुमचा पॅन कार्ड नंबर इथे यूजर आयडी असेल.
- पासवर्ड, यूजर आयडी आणि जन्मतारीख टाकून लॉग इन करा.
- तिथे तुम्हाला ‘लिंक आधार’ (Link Aadhar) हा पर्याय दिसेल. जर हा पर्याय दिसत नसेल तर मेन्यु > प्रोफाइल सेटींग्ज > लिंक आधार या स्टेप्स वापरा.
त्यानंतर पॅन कार्डवरून लॉग इन केल्यामुळे तुमची जन्मतारीख, लिंग ही माहिती आपोआप भरली जाईल. - त्यांनंतर आधार कार्ड आणि पॅन कार्डबाबत माहिती तिथे भरा.
- जर ही माहिती अचूक असेल तर ‘लिंक नाऊ’ हा पर्याय दिसेल तो निवडा.
- यानंतर एका मेसेजद्वारे तुम्हाला आधार आणि पॅन लिंक झाले असल्याचे सांगण्यात येईल. अशा प्रकारे ऑनलाईन प्रक्रियेद्वारे तुम्ही पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करू शकता.