एअर इंडियाच्या विमानात सलग दोन वेळा मद्यधुंद अवस्थेत असलेल्या प्रवाशाने लघुशंका केल्याचा प्रकार घडला आहे. एका प्रकरणात २६ नोव्हेंबर रोजी वृद्ध महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याप्रकरणी आरोपी शंकर मिश्रा यास पोलिसांनी अटक केली आहे. तर ६ डिसेंबर रोजी घडलेल्या दुसऱ्या प्रकरणात आरोपीने महिलेच्या ब्लँकेटवर लघुशंका केली होती, या प्रकरणात आरोपीने लेखी माफी मागितल्यानंतर प्रकरण मिटले. पहिल्या प्रकरणात पीडित वृद्ध महिलेने स्वतःहून पोलिसांत तक्रार दिल्यामुळे हा प्रकार उजेडात आला. ज्यावेळी हा घृणास्पद प्रकार घडला त्यावेळी विमानातील क्रू सदस्यांनी माझी मदत केली नाही, असा आरोप पीडित महिलेने केला होता.

या सर्व प्रकरणानंतर टाटा ग्रुपचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी सदर प्रकरणात एअर इंडियाकडून जलदगतीने कार्यवाही होण्याची आवश्यकता होती, असे म्हटले आहे. तर एअर इंडियाचे सीईओ आणि एमडी कॅम्पबेल विल्सन यांनी चौकशी सुरु असेपर्यंत पायलट आणि चार क्रू सदस्यांना काम थांबविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच एअर इंडियामध्ये मद्य पुरविण्याच्या धोरणाबाबत पुर्नविचार केला जाईल, असेही ते म्हणाले. या सगळ्या पार्श्वभूमीवर विमानात मद्य का दिलं जातं? किती दिलं जातं? आणि ते सर्व प्रवाशांना मिळतं का? याबद्दलची थोडक्यात माहिती.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

मद्य देण्याचा नियम काय आहे?

विमानात प्रवाशी १०० मिली पेक्षा जास्त मद्य आपल्या हँडबॅगेत घेऊन जाऊ शकत नाही, असे एका ठिकाणी नमूद केले आहे. मात्र बाहेरचे मद्य विमानात घेता येत नाही, असाही एक नियम आहे. प्रवासादरम्यान विमान कंपन्यांकडून किती मद्य दिले जावे, याचेही नियम ठरलेले आहेत. एअर इंडियाच्या नियमानुसार एका वेळी एकच ड्रिंक (पेग) दिले जाऊ शकते. जर बीअर असेल तर एक मग (३५० मिली), वाईन असेल तर एक आऊंस (३० मिली) आणि विस्की किंवा रम असेल तर एक छोटी बाटली दिली जाते. तसेच डोमेस्टिक म्हणजेच देशांतर्गत विमान प्रवासात कोणतीही कंपनी प्रवाशांना मद्य देत नाही. केवळ आंतरराष्ट्रीय विमान प्रवासातच मद्य पुरविले जाते. यातही १८ वर्षांच्या वरील व्यक्तींनाच मद्य दिले जाते.

मद्य केव्हा दिले जाते?

एअर इंडियाच्या नियमानुसार, जर विमानाचे उड्डाण चार तासांहून कमी कालावधीचे असेल तर दोन पेक्षा जास्त ड्रिंक देता येत नाहीत. जर चार तासांपेक्षा जास्त काळाचा प्रवास असेल तर तासाच्या हिशोबाने ड्रिंक दिले जातात. म्हणजेच चार तासांचा प्रवास असेल तर केवळ दोनच ड्रिंक आणि सहा तासांचा प्रवास असेल तर चार ड्रिंक दिले जातात. यासोबतच असाही एक नियम आहे की, जर एखाद्या प्रवाशाचे तीन ड्रिंक झाले असतील तर त्याला तीन तासांपर्यंत कोणतेही मद्य देता येत नाही. तीन तासांचा ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा मद्य दिले जाऊ शकते. मात्र बिझनेस क्लासमधील प्रवाशांना हा नियम लागू होत नाही. जर क्रू सदस्यांना वाटले की, एखादा प्रवासी नशेच्या अमलाखाली गेला आहे तर त्याला पुढचे ड्रिंक देण्यास नकार दिला जाऊ शकतो. पण हे क्रू सदस्याच्या त्यावेळच्या निर्णयप्रक्रीयेवर अवलंबून असते.

शंकर मिश्रा प्रकरणात किती मद्य दिले गेले

एअर इंडियाच्या मद्य देण्याच्या धोरणानुसार कुणालाही अतिरीक्त मद्य दिले जात नाही. मद्याचा कोटा आधीच ठरलेला असतो. प्रवाशी कोणत्या क्लासमध्ये प्रवास करतोय, यावर हे निर्धारीत असते. शंकर मिश्राच्या प्रकरणात त्याच्या शेजारी बसलेल्या महिलेने सांगितले आहे की, मिश्राने लंचच्या आधी चार ड्रिंक घेतल्या होत्या.

२६ नोव्हेंबर रोजी एअर इंडियाच्या एआय – १०२ या न्यूयॉर्कहून दिल्ली येथे येणाऱ्या फ्लाईटमधील बिझनेस क्लासमध्ये लघुशंका करण्याचा प्रकार घडला होता. शंकर मिश्रा याने मद्यधुंद अवस्थेत वृद्ध महिलेच्या अंगावर लघुशंका केली. लघुशंका केल्यानंतरही तो तिथेच उभा होता, त्यानंतर शेजारच्या सीटवरील प्रवाशांनी त्याला हटकल्यानंतर तो तिथून स्वतःच्या जागेवर जाऊन बसला. पीडित महिलेने क्रू मेंबरकडे याची तक्रार केली. मात्र तिला मदत मिळू शकली नाही. या घटने नंतर ४ जानेवारी रोजी पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. आरोपी शंकर मिश्राला बंगळुरु येथून अटक करण्यात आली आहे. त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Story img Loader