मागील काही काळापासून सायबर गुन्हेगारांच्या गटांकडून वित्तीय संस्थांना लक्ष्य करण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक वित्तीय संस्थांवर सायबर हल्ला करून हे गट माहिती चोरतात आणि खंडणी उकळतात. त्याला रॅन्समवेअर असे संबोधले जाते. खंडणीची रक्कम न दिल्यास गोपनीय माहिती जाहीर करण्याची धमकी दिली जाते. इंडस्ट्रीयल अँड कर्मशियल बँक ऑफ चायना (आयसीबीसी) या जगातील आघाडीच्या बँकेवर नुकताच सायबर हल्ला झाला. बँकेची यंत्रणा हॅक करून गोपनीय माहितीची चोरी करण्यात आली. ही माहिती उघड न करण्यासाठी बँकेकडे खंडणी मागण्यात आली. या प्रकरणानंतर लॉकबीट हा आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारांचा समूह चर्चेत आला आहे.

लॉकबीटची सुरुवात कोठून?

सगळ्यात आधी लॉकबीट २०२० मध्ये जगासमोर आला. सायबर गुन्हेगारांच्या मंचावर रशियन भाषेत फसवणूक करणारे सॉफ्टवेअर समोर आले. त्यावेळी लॉकबीट हा रशियास्थित सायबर गुन्हेगारांचा गट असल्याचा अंदाज विश्लेषकांनी मांडला. या गटाने आतापर्यंत कोणत्याही देशाला पाठिंबा दिलेला नाही. याचवेळी एकाही सरकारने या गटाचे समर्थन केलेले नाही. डार्क वेबवर या गटाने नेदरलँडमधील असल्याचे म्हटले असून, पूर्णपणे अराजकीय आणि केवळ पैशांमध्ये रस असल्याचे म्हटले आहे.

Puneri pati shopkeeper display puneri pati on borrow photo viral on social media funny puneri pati
PHOTO: पुणेकरांचा विषयच हार्ड! उधारी रोखण्यासाठी जुगाड; दुकानात लावली अशी पाटी, लोकं स्वप्नातही मागणार नाही उधार 
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
judge detained corruption charges
सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश लाचप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात
25 lakh online fraud of senior citizens in kamothe panvel crime news
कामोठेत जेष्ठाची २५ लाखांची ऑनलाईन फसवणूक
Fraud of Rs 42 lakhs through social media Navi Mumbai crime news
नवी मुंबई: समाजमाध्यमाद्वारे ४२ लाखांची फसवणूक
senior citizen who wants to remarry was defrauded by cyber thieves
पुनर्विवाहाच्या आमिषाने कर्वेनगर भागातील ज्येष्ठाची फसवणूक, ज्येष्ठाला जाळ्यात ओढून पोलीस कारवाईची धमकी
ed to hand over assets worth 125 crores of mehul choksi to banks
पीएनबी गैरव्यवहार प्रकरणः मेहूल चोक्सीविरोधात ईडीची मोठी कारवाई, १२५ कोटींच्या मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकांना सुपूर्त करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात
All about the new wedding invite scam on WhatsApp
सायबरचोरांचे नवे शस्त्र… डिजिटल लग्नपत्रिका! फसवणूक कशी? खबरदारी कोणती?

सर्वाधिक लक्ष्य कोण?

केवळ तीन वर्षांत गटाने जगातील आघाडीच्या रॅन्समवेअरमध्ये स्थान मिळविले आहे. या गटाने सर्वाधिक लक्ष्य अमेरिकेला केले आहे. आतापर्यंत अमेरिकेतील १ हजार ७०० हून अधिक संस्थांना लक्ष्य केले आहे. त्यात उद्योगांपासून वित्तीय सेवा आणि खाद्यपदार्थ ते शाळा, वाहतूक आणि सरकारी संस्थांचा समावेश आहे. नुकतेच लॉकबीटने आघाडीची विमान कंपनी बोईंगला लक्ष्य केले. बोईंगच्या यंत्रणेत शिरकाव करून अंतर्गत माहिती गटाने चोरली. या वर्षाच्या सुरुवातीला या गटाने वित्तीय व्यवहार सेवा क्षेत्रातील आयओएन समूहाच्या यंत्रणेत प्रवेश करून कामकाज विस्कळीत केले होते. या समूहाच्या ग्राहकांमध्ये जगातील सर्वांत मोठ्या बँका, दलाली संस्था आणि हेज फंड यांचा समावेश आहे.

कार्यपद्धती नेमकी कशी?

एखाद्या संस्थेच्या यंत्रणेत रॅन्समवेअर सोडून त्यात बिघाड निर्माण केला जातो. त्यानंतर त्या संस्थेची आणि तिच्या ग्राहकांची गोपनीय माहिती चोरली जाते. ती उघड करण्याच्या नावाखाली मोठी रक्कम खंडणी म्हणून मागितली जाते. ही खंडणी नेहमी आभासी चलनाच्या माध्यमातून मागितली जाते. कारण क्रिप्टोकरन्सीसारख्या आभासी चलनाचा माग काढता येत नाही. याचबरोबर ती स्वीकारणाऱ्या व्यक्तीची ओळखही शोधता येत नाही. त्यामुळेच या गटाचा ठावठिकाणा शोधणे आणि त्यांना पकडणे अशक्य ठरते. याचबरोबर हा गट प्रत्येक सायबर हल्ल्यावेळी वेगवेगळी पद्धती अवलंबतो. त्यामुळे पुढील हल्ला कोणत्या प्रकारचा असेल, याचे अनुमान लावता येत नाही.

कशा प्रकारे रचना ?

लॉकबीटला सर्वाधिक यश मिळण्यामागे तिची रचना हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. अनेक सायबर गुन्हेगार लॉकबीटचा भाग आहेत. समविचारी सायबर गुन्हेगारांची भरती करून हे हल्ले लॉकबीट करते. लॉकबीटच्या संकेतस्थळावर अनेक संस्थांची यंत्रणा हॅक केल्याचा दावा करण्यात आला आहे. याचबरोबर सायबर गुन्हेगारांची भरती करण्यासाठी अर्ज आणि त्यासाठीची नियमावलीही देण्यात आली आहे. मात्र, अर्जदाराकडे लॉकबीटसोबत काम करणाऱ्या एखाद्या सदस्याची शिफारस असावी लागते.

खंडणी कशी उकळतात?

डार्क वेबवर लॉकबीटच्या ब्लॉगमध्ये हल्ला करण्यात आलेल्या संस्थांची यादी दिवसेंदिवस वाढत आहे. या ब्लॉगवर हल्ला करण्यात आलेल्या संस्था आणि तिच्या नावासमोर त्यांना खंडणी देण्यासाठी दिलेली मुदत दिसत असते. या मुदतीचे घड्याळ कायम पुढे सरकत असते. खंडणी न दिल्यास संस्थेची गोपनीय माहिती जाहीर केली जाते.

हेही वाचा… विश्लेषण: स्थलांतरितांसाठी ब्रिटनची ‘रवांडा योजना’ काय आहे? सुनक सरकारसाठी तिचे यशापयश महत्त्वाचे का?

सायबर हल्ल्यानंतर अनेक कंपन्या सायबर सुरक्षा कंपन्यांची मदत घेतात. सायबर सुरक्षा कंपन्या हल्ल्यात चोरीला गेलेली माहिती परत मिळवून हल्ला झालेल्या कंपनीची यंत्रणा पूर्ववत करतात. मात्र, यासाठी काही दिवस अथवा आठवडेही लागू शकतात. त्यामुळे कंपनीला अशा हल्ल्यानंतर फटका बसण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे लॉकबीटशी गुप्त वाटाघाटी करून अनेक कंपन्या मार्ग काढतात. त्या कंपन्यांवरील हल्ल्याची माहिती त्यामुळे समोर येत नाही.

रोखण्यासाठी पावले कोणती?

लॉकबीटला रोखण्यासाठी अनेक देशांनी पावले उचलली आहेत. त्यातील सर्वांत मोठे पाऊल म्हणजे, अमेरिका आणि इतर ४० देशांतील तपास यंत्रणांनी एकत्र येऊन जागतिक पातळीवरील रॅन्समवेअरला आळा घालण्याची मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत हे देश एकमेकांशी गुप्त माहितीची देवाणघेवाण करतात. त्यात सायबर गुन्हेगारांच्या आभासी चलन खात्याच्या तपशीलाचाही समावेश असतो. त्यामुळे या गुन्हेगारांवर नजर ठेवणे शक्य होते.

sanjay.jadhav@expressindia.com

Story img Loader