भारतातील राजकीय पक्षांसाठी मतमोजणीचा दिवस महत्त्वाचा आहे. ५४३ लोकसभा मतदारसंघांत सात टप्प्यांत झालेल्या सुमारे दोन महिन्यांच्या मतदानानंतर आज (४ जून) सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ३१.२ कोटी महिलांसह ६४.२ कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
दिवसाच्या शेवटी भारताची १८ वी लोकसभा अस्तित्वात येणार असून, नवे पंतप्रधान निवडले जाणार आहेत. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्ष (BJP) सलग तिसऱ्यांदा सत्ता टिकवून ठेवेल की विरोधी पक्ष इंडिया आघाडी भाजपाला परत सत्तेत येण्यापासून रोखण्यात यश मिळवेल? हे लवकरच समजणार आहे. जसजशी मतमोजणी प्रक्रिया सुरू होते, निकालाच्या दिवशी काय होते, याबद्दल तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. त्यासंदर्भातील काही गोष्टी जाणून घेऊ यात.
मतदानाच्या दिवशी काय होते?
लोकसभा निवडणुकीसाठी मतदान ४ जून रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झाले आहे.
हेही वाचाः यावर्षी तब्बल ८० देशांमध्ये होत आहे निवडणूक; भारतातील निवडणूक सर्वांहून वेगळी का?
मतमोजणीच्या वेळी पर्यवेक्षण कोण करते?
निवडणूक अधिकारी हा निवडणूक आणि मतमोजणीसाठी जबाबदार असतो.
मतमोजणीच्या दिवसाची निवड कोण करते?
मतमोजणीची तारीख आणि वेळ हे निवडणूक आयोग ठरवत असते. निवडणूक अधिकारी त्यासंदर्भात निर्णय घेत असतात.
RO कोण आहेत?
निवडणूक अधिकाऱ्या(RO)ची निवड सरकार किंवा स्थानिक प्रशासन करीत असते. प्रत्येक मतदारसंघानुसार त्याची निवड केली जाते. त्यावर निवडणूक अधिकारी लक्ष ठेवून असतो. निवडणूक अधिकाऱ्याला सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्या(ARO)द्वारे मदत केली जाते. जो मतमोजणी केंद्रात उपस्थित आहे. मतमोजणीसाठी सहाय्यक आणि सूक्ष्म निरीक्षक यांच्याकडे अधिकार पत्र असून, ते मतमोजणीवर नजर ठेवणार आहेत.
मते कशी मोजली जातात?
निवडणूक अधिकाऱ्याच्या थेट देखरेखीखाली मोजणी पर्यवेक्षकांद्वारे मत मोजली जातात. संसदीय मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील मतांची मोजणी एकाच केंद्रात केली जाते. उमेदवारांसह त्यांचे मतमोजणी प्रतिनिधी आणि निवडणूक प्रतिनिधीदेखील मतमोजणी केंद्रात उपस्थित असतात. एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहाय्यक आणि प्रत्येक टेबलावर एक निरीक्षक उपस्थित असतो. मतांची मोजणी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्रसिद्ध होणाऱ्या पोस्टल मतपत्रिका आणि पोस्टल मतपत्रांसह सुरू होते.
ईव्हीएमची मोजणी सुरू झाल्यानंतर ३० मिनिटांनी कल हाती येऊ शकतो. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत १४ ईव्हीएमची मते मोजली जातात. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीच्या शेवटी निकाल जाहीर केला जातो. मागील फेरीची मतमोजणी संपली की, पुढच्या फेरीची मतमोजणी सुरू केली जाते.
vvpat स्लिप्सची पडताळणी
प्रत्येक विधानसभा विभागासाठी निवडलेल्या पाच मतदान केंद्रांच्या vvpat स्लिप्स संबंधित ईव्हीएममध्ये दर्शविलेल्या निकालाशी जुळतात का ते तपासले जाते. vvpat पेपर स्लिप्सची पडताळणी विशेषत: मतमोजणी केंद्र किंवा बूथमध्ये केली जाते. जेव्हा ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची संख्या वेगवेगळी असते, तेव्हा मुद्रित पेपर स्लिप्सची संख्या अंतिम म्हणून घेतली जाते, ही संपूर्ण प्रक्रिया व्हिडीओ रेकॉर्ड केली जाते.