एक्झिट पोल किंवा मतदानोत्तर चाचण्या हा आता आधुनिक निवडणूक प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. गेल्या काही निवडणुकांमध्ये तर प्रत्यक्ष निकालदिवसाइतकीच उत्सुकता मतदान प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी एग्झिट पोलबाबतही असते. या चाचण्या किती अचूक असतात, त्या फसल्याची उदाहरणे किती, याविषयी…

एक्झिट पोल किती अचूक असतात?

अलीकडे बहुतेक चाचण्या ३ ते ५ टक्के त्रुटींना (मार्जिन ऑफ एरर) वाव असल्याचे सांगत असतात. भारतातील एकूण मतदारांची संख्या, प्रत्यक्ष मतदानात भाग घेणाऱ्यांचे प्रमाण आणि नमुना सर्वेक्षणाचे प्रमाण (सँपल सर्व्हे साइझ) यांत मोठी तफावत नेहमीच आढळून येते. अशा परिस्थितीत अंतिम अंदाजामध्ये ३ ते ५ टक्के अधिक वा वजा त्रुटी आढळू शकते हा दावा धाडसी म्हटला पाहिजे. परंतु काही चाचण्यांनी तेवढी अचूकता प्राप्त केलेली आहे आणि जे खरोखरच कौतुकपात्र ठरते. अर्थात अचूकतेमध्ये सातत्य अलीकडे वाढलेले दिसते. गेल्या लोकसभा निवडणुकीत बहुतेक सर्व चाचण्यांचे निष्कर्ष एनडीएला मोठे बहुमत मिळणार असे होते, जे खरे ठरले. अर्थात भाजप आणि मित्रपक्षांच्या जागांबाबत अंदाज मात्र वेगवेगळे होते. 

Maharashtra Assembly Elections 2024 will opposition in maharashtra get Leader of opposition post
विरोधी पक्षनेतेपद विरोधकांना मिळू शकते का ?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का?
Sharad Pawar asserts that distrust in the electoral system should be removed print politics news
मारकडवाडीवरून कलगीतुरा, निवडणूक यंत्रणेबद्दल अविश्वास दूर करा; शरद पवारांचे मारकरवाडीत प्रतिपादन
markadwadi villagers marathi news
मारकडवाडी ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करणे आवश्यक, रामदास आठवले यांची भूमिका
Supriya Sule, Supriya Sule on Assembly Election ,
Supriya Sule : विधानसभा निकालानंतर निवडणूक आयोगाबाबत खासदार सुप्रिया सुळेंचे मोठे वक्तव्य, म्हणाल्या…!
Markadwadi EVM Issue.
Markadwadi : “राम सातपुते फडणवीसांचं डबडं, ते वाजतच राहणार”, मारकडवाडी प्रकरणावरून उत्तम जानकरांची टीका

हेही वाचा >>> महिला पुरुषांपेक्षा जास्त जगतात, तरी महिलांमध्ये आजाराचे प्रमाण जास्त का? ‘लॅन्सेट’चा अहवाल काय सांगतो?

अंदाज चुकल्याची ठळक उदाहरणे कोणती?

काही वेळा मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष साफ फसल्याचेही दिसून आले आहे. किंवा काही वेळा एखादा अंदाज इतर अंदाजांपेक्षा पूर्णपणे वेगळा होता, आणि अखेरीस तोच अचूक ठरला असेही घडले आहे. 

‘इंडिया शायनिंग’ सपशेल फसले, २००४…

जनमानसात चांगली प्रतिमा असल्याचे वाटून त्यावेळच्या अटलबिहारी वाजपेयी सरकारने निवडणुका मुदतीच्या जरा आधी घेतल्या. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकांतील यशाने त्यांना हुरूप आला होता. अनेक मतदानोत्तर चाचण्यांनीही एनडीएला २४० ते २७५ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला. प्रत्यक्षात एनडीएला १८७ जागा मिळाल्या आणि काँग्रेसप्रणीत यूपीएला २१६ जागा मिळून त्यांचेच आघाडी सरकार सत्तेवर आले. 

बिहार विधानसभा निवडणूक २०१५, २०२०…

बिहारमध्ये २०१५च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप आघाडी आणि राष्ट्रीय जनता दल, संयुक्त जनता दल आणि काँग्रेस यांच्या आघाडीमध्ये चुरशीची लढत होईल, असा अंदाज बहुतेक एग्झिट पोलनी वर्तवला होता. यांतील काही अंदाजांमध्ये भाजप आघाडीच्या बाजूने झुकते माप दिले गेले. प्रत्यक्षात भाजपविरोधी आघाडीने २४३पैकी १७८ जागा जिंकून दणदणीत बहुमत मिळवले. याच्या जवळपास उलट परिस्थिती बिहार विधानसभा निवडणूक २०२०मध्ये पाहावयास मिळाली. तेजश्वी यादव यांच्या आधिपत्याखालील ‘महागठबंधन’ला बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवला गेला. पण अखेरीस भाजप-जदयु आघाडीने महागठबंधनला चकवून सत्ता ग्रहण केली. 

हेही वाचा >>> AC Blast: कडक उन्हाळ्यात एसीमध्ये स्फोट होण्याची कारणं काय? कोणती खबरदारी घ्यावी?

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०१७…

या निवडणुकीत त्रिशंकु विधानसभा अस्तित्वात येईल आणि भाजप सर्वांत मोठा पक्ष असेल, असा अंदाज बहुतेक सर्व मतदानोत्तर चाचण्यांनी व्यक्त केला होता. प्रत्यक्ष निकाल सर्वांसाठी धक्कादायक होता. भाजपने ४०३पैकी ३१२ जागा जिंकल्या, ज्या २०१२च्या तुलनेत ४७ अधिक होत्या.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१…

या निवडणुकीदरम्यान किमान दोन महत्त्वाच्या आणि नावाजलेल्या एग्झिट पोलनी भाजप हा सर्वांत मोठा पक्ष बनेल, असे भाकीत वर्तवले होते. भाजपने त्या निवडणुकीत ७७ जागा जिंकल्या, ज्या पश्चिम बंगालच्या राजकीय इतिहासात लक्षणीय ठरल्या. परंतु तृणमूल काँग्रेसने २९४पैकी २१३ जागा जिंकून राक्षसी बहुमत संपादित केले, ज्याचा अंदाज कोणीही वर्तवला नव्हता. 

मोदींची निवडणूक, २०१४…

नरेंद्र मोदी त्या निवडणुकीत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित झालेले होते. भाजपप्रणीत एनडीए या निवडणुकीत बहुमताच्या म्हणजे २७३च्या जवळपास जाईल असा अंदाज एग्झिट पोलनी वर्तवला होता. केवळ न्यूज ट्वेण्टीफोर – चाणक्य यांनी ३४० असा आकडा एनडीएसाठी दिला. भाजपला एकट्याला बहुमत मिळेल असेही बाकीच्यांना वाटले नव्हते. पण प्रत्यक्षात तसेच घडले. याही वेळी एग्झिट पोल पूर्णतया अचूक ठरले नव्हते. 

Story img Loader