दर चार वर्षांनी ऑलिम्पिक स्पर्धा आली की पदकतालिकेबाबत चर्चेला सुरुवात होते. ऑलिम्पिकमध्ये अमेरिका वरचढ ठरणार की चीन, याबाबत उत्सुकता असते. मात्र, हे दोन देशच नाही, तर रशिया, जर्मनी आणि ब्रिटन यांसारख्या देशांनीही ऑलिम्पिकमध्ये यशस्वी कामगिरी केली आहे. भारताला आता सातत्याने पदके मिळत असली, तरी तो आघाडीच्या देशांहून बराच मागे आहे. ऑलिम्पिकमध्ये पदकाच्या कमाईत कोणता देश किती पुढे, या विषयीचे अवलोकन.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सर्वाधिक पदके कोणाच्या नावावर?
ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वाधिक २,६२९ पदके अमेरिकेच्या नावावर आहेत. सुवर्णपदकांच्या आकडेवारीतच नाही, तर सर्वाधिक पदकांच्या आघाडीवरही अमेरिका संघच अव्वल आहे. मॉस्को १९८० ऑलिम्पिक स्पर्धेचा अपवाद वगळता अमेरिकेने सर्वच स्पर्धांत पदके मिळवली आहेत. अमेरिकेने मॉस्को ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकला होता. स्पर्धेच्या इतिहासाकडे आणि वर्तमानाकडे बघितले, तरी अमेरिकेकडे कोणत्याही देशापेक्षा एका हजारहून अधिक पदके आहेत. अमेरिकेच्या नावावर स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक १०६१ सुवर्णपदकेही आहेत.
हेही वाचा >>> विश्लेषण : ‘मुंबई महानगर प्रदेशा’त पालघर, अलिबागही…
रशियाची कामगिरी कशी राहिली आहे?
ऑलिम्पिक स्पर्धेत रशिया संघ कायम वादग्रस्त राहिला आहे. असे असले तरी रशियाच्या नावावर १,६२४ पदके आहेत. यामध्ये रशियन साम्राज्य आणि सोव्हिएत युनियनपासून ते १९९२च्या युनिफाईड संघ आणि २०२१च्या रशियन ऑलिम्पिक समितीच्या संघाने मिळवलेल्या पदकांचा समावेश आहे. यात ६०८ सुवर्णपदके आहेत. १९९१ मध्ये विघटन होण्यापूर्वी ऑलिम्पिकमधील १०१० पदके सोव्हिएत युनियनने मिळवली आहेत. केवळ रशियाचा विचार केला, तर त्यांची ४२३ पदके आहेत आणि अशा वेळी हा संघ १२व्या स्थानावर घसरू शकतो. उत्तेजक सेवनाच्या प्रकरणातील बंदीमुळे टोक्योत रशिया संघ ‘रशिया ऑलिम्पिक समिती’चा संघ म्हणून खेळला होता. या संघाने टोक्योत ७१ पदकांची कमाई केली. आता युक्रेनवरील हल्ल्यामुळे रशियावर पूर्ण बंदी आहे. या वेळी पॅरिसमध्ये रशियाचे ऑलिम्पिक पात्र खेळाडू तटस्थ खेळाडूंच्या रूपात खेळतील.
तिसऱ्या स्थानावर कोण?
पूर्व आणि पश्चिम जर्मनी संघाचे एकत्रीकरण झाल्यापासून जर्मनी एक संघ म्हणून खेळत आहे. पूर्व आणि पश्चिम जर्मनी संघाची मिळून टोक्योपर्यंत जर्मनीच्या नावावर १,३८६ पदके आहेत. सुवर्णपदकांच्या (४३८) संख्येतही ते तिसऱ्या स्थानावर आहेत. जर्मनीचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वाधिक पदके मिळवणाऱ्या पाच देशांत जर्मनी असा एकमेव संघ आहे की ज्यांची रौप्य आणि कांस्यपदके त्यांच्या सुवर्णपदकांपेक्षा अधिक आहेत. जर्मनीने ४५७ रौप्य, तर ४९१ कांस्यपदके मिळवली आहेत. यामध्ये आता विसर्जित झालेले संघ आणि विशेष शिष्टमंडळ संघाची पदके वगळली, तर जर्मनीच्या नावावर ६५५ पदके येतात आणि ते चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर येतील.
हेही वाचा >>> राष्ट्रपतींकडून नऊ राज्यांसाठी नवीन राज्यपालांची नियुक्ती; राज्यपालांची निवड कशी होते? काय असते प्रक्रिया?
ब्रिटनचा क्रमांक चौथा…
ऑलिम्पिक स्पर्धेत वर्चस्व राखण्यात ब्रिटनही मागे नाही. आतापर्यंत ब्रिटनच्या नावावर ९१६ पदकांची नोंद आहे. त्यांचा चौथा क्रमांक येतो. आतापर्यंतच्या सर्व ऑलिम्पिक स्पर्धांत ब्रिटनचा समावेश असून, त्यांनी २८४ सुवर्णपदके मिळवली आहेत. आधुनिक ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यासाठी केवळ राष्ट्रीय ऑलिम्पिक समिती संघांनाच मान्यता दिली असती, तर ब्रिटन तिसऱ्या स्थानावर झेप घेऊ शकला असता.
क्रमवारीतील पाचवा संघ कोणता?
आधुनिक ऑलिम्पिकला सुरुवात झाल्यापासून चीन आता ६३६ पदकांसह पाचव्या स्थानावर आहे. सुवर्णपदकांची संख्या बघितली, तरी चीन पाचव्याच स्थानावर येतो. चीनने आतापर्यंत २६३ सुवर्णपदके मिळवली आहेत. चीन पदकाच्या शर्यतीत मागे होता, पण अलिकडच्या काळात गेल्या चार ऑलिम्पिकपासून चीनने आपल्या कामगिरीत झपाट्याने प्रगती केली आहे.
भारत कोणत्या क्रमांकावर?
भारत ऑलिम्पिक पदकांच्या शर्यतीत खूपच मागे आहे. आतापर्यंत भारताच्या नावावर १० सुवर्ण, ९ रौप्य आणि १६ कांस्य अशी एकूण केवळ ३५ पदके असून, भारताचा क्रमांक ५६वा येतो. भारताच्या १० पैकी ८ सुवर्णपदके हॉकी या सांघिक खेळातील असून, दोन वैयक्तिक पदके आहे. नेमबाजीत अभिनव बिंद्रा आणि भालाफेकपटू नीरज चोप्रा हे भारताचे वैयक्तिक सुवर्णपदक विजेते आहेत. भारताला पहिले वैयक्तिक पदक १९५२ हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत खाशाबा जाधव यांनी मिळवून दिले. भारताने सर्वाधिक ७ पदकांची नोंद टोक्योत केली. आता पॅरिसमध्ये हा आकडा दुहेरी होण्याची आशा भारतीय चाहते बाळगून आहेत. भारताने आतापर्यंत १९०४, १९०८ आणि १९१२ या तीनच ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतलेला नाही. एकूण २५ ऑलिम्पिकमधील सहा स्पर्धांत भारताला एकही पदक मिळवता आले नव्हते. २००८ पासून भारताने टोक्योपर्यंत प्रत्येक स्पर्धेत एकापेक्षा अधिक पदके जिंकली आहेत.