रसिका मुळ्ये

बिकट परिस्थितीत सुरक्षा दल, सैन्य, पोलीस, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, वनविभाग यांच्या कार्यवाहीत सक्षम भूमिका बजावते ते श्वानपथक! जगातील सर्वच सुरक्षा यंत्रणांचे संचित हे त्यांचे श्वानपथक आहे. दहशतवाद्यांचा शोध घेणे, स्फोटके शोधणे, सूचनेनुसार शत्रूवर हल्ला करणे, सीमेवर सैनिकांसह गस्त घालणे, गुन्हेगारांचा माग काढणे अशा अनेक जबाबदाऱ्या ‘श्वानसैनिक’ बेमालूमपणे बजावतात. सीमारक्षणासाठी, हरवलेल्या सैनिकांना शोधण्यासाठी, युद्धाच्या काळात श्वानांची कामगिरी ही जवानांइतकीच महत्त्वाची ठरली आहे. जगातील अनेक श्वानपथकात उत्तम कामगिरी करणाऱ्या बेल्जियन मालिनोआस प्रजातीच्या श्वानांची भरती करण्यास भारतीय सुरक्षा यंत्रणांचेही प्राधान्य आहे. ते लॅब्रडॉरची जागा घेतील. हा बदल का आहे? या प्रजातीचे वैशिष्ट्य काय? अशा मुद्द्यांचा आढावा…

nagpur,tiger,railway,
VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
manipur violence 10 militants killed in encounter with crpf
अन्वयार्थ : अशांत मणिपूर, अस्वस्थ नागालँड
second phase of tiger migration is complete with another tigress captured from Tadoba
दुसरी वाघीणही महाराष्ट्रातून पोहोचली ओडिशात…आंतरराज्यीय स्थलांतर अखेर…
Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात
wild animals adoption scheme
मुंबई: राष्ट्रीय उद्यानातील वाघ, बिबट्या पालकांच्या प्रतीक्षेत
sahyadri tiger project
१०० किलोमीटरचे अंतर पार करून वाघ सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात…

हेही वाचा >>> विश्लेषण : भारतासमोर लठ्ठपणाचे संकट?

बेल्जियन मालिनोआसला प्राधान्य का?

भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या श्वानपथकात लॅब्रडॉर’, ‘जर्मन शेफर्ड’, ‘डॉबरमन’ कॉकर स्पॅनियल या प्रजातींचे कुत्रे वापरले जातात. अस्सल भारतीय प्रजातीच्या मुधोळ हाउंडचाही अलीकडे समावेश करण्यात आला आहे. मात्र आता निवृत्त झालेल्या श्वानांची जागा बेल्जियन मालिनोआस प्रजातीचे श्वान घेणार आहेत. हे श्वान इतर प्रजातींच्या तुलनेत अधिक काटक असतात. तसेच ते मालक किंवा प्रशिक्षकाशी म्हणजे कुटुंब किंवा गटाऐवजी एका व्यक्तीच्याच आज्ञेत राहतात. लॅब्रडॉरची घ्राणेंद्रिये काकणभर अधिक तीक्ष्ण असतात. त्यामुळे स्निफर डॉग म्हणून म्हणजेच वासावरून वस्तू ओळखणे किंवा माग काढणे यासाठी लॅब्रडॉरला प्राधान्य दिले जाते. मात्र हुंगणे, हल्ला करणे, पाठलाग करणे अशा बहुआयामी कामांसाठी मालीनोआस वरचढ ठरतात. इतर प्रजातींच्या तुलनेत हे श्वान ‘प्रोफेशनल’ म्हणावेत असे असतात. लडिवाळ, खेळकर स्वभावाच्या लॅब्रडॉरचा अवखळपणा काही वेळा मोहिमेत अडचणीचा ठरतो. तर जर्मन शेफर्डचे आकारमान, वजन यामुळे त्यांच्या वापरला मर्यादा येतात. पॅराशूटमधून उतरणे, अडचणीच्या जागी चोरपावलांनी वावरणे अशा मोहिमांसाठी मालिनोआस अधिक उपयुक्त ठरतात. अमेरिका, युरोपीय देश, इस्रायल यांच्या श्वानपथकात सर्वाधिक प्रमाणात मालिनोआस आहेत.

वैशिष्ट्य काय?

बेल्जियन मालिनोआसला बेल्जियन शेफर्ड म्हणूनही ओळखले जाते. साधारण २२ ते २६ इंच उंची, १८ ते ३६ किलो दरम्यान वजन असलेल्या या श्वानांचा काळा, कबरा चेहेरा आणि कान हे पटकन ठसणारे दृश्य वैशिष्ट्य. धाडसी, चपळ, काटक, प्रचंड ऊर्जा आणि शारीरिक मेहेनतीची प्रचंड कुवत असते. ते २५- ३० किलोमीटर धावू शकतात. त्याचबरोबर

तीक्ष्ण घ्राणेंद्रिय, तल्लख स्मरणशक्ती, चांगली प्रतिकारशक्ती, एकावेळी अनेक जबाबदाऱ्या निभावण्याची क्षमता, कृतींची सुसंगती लावण्याची क्षमता, स्वतंत्रपणे काम करण्याची क्षमता यांमुळे हे श्वान संरक्षण दलांसाठी योग्य मानले जातात.

हेही वाचा >>> सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ते आता थेट भारताचे नवे लोकपाल; जाणून घ्या मराठमोळ्या अजय खानविलकरांचा प्रवास!

सुरक्षा दलांमध्ये कधीपासून समावेश?

साधारण १८व्या शतकात बेल्जियममध्ये ही प्रजाती विकसित करण्यात आली. तेव्हापासूनच या श्वानांची ओळख रक्षक अशीच आहे. मेंढ्यांचे कळप मार्गी लावण्यासाठी, शिकार, राखण यांसाठी त्यांचा उपयोग केला जात असे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिका, युरोपमध्ये सीमेवर गस्त घालणे, स्फोटकांचा शोध घेणे, युद्धक्षेत्रात साहित्य पोहोचवणे यासाठी या श्वानांचा वापर करण्यात आला. त्यादरम्यान अस्सल वाणाच्या श्वानांची संख्या कमी झाली. ती वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. साधारणपणे १९६० नंतर या प्रजातीने जगभरातील संरक्षण दलांच्या, पोलिसांच्या श्वानपथकात स्थान पक्के करण्यास सुरुवात केली. भारतात १९९९ साली या श्वानांचा पथकात समावेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र मालिनोआसच्या आक्रमक स्वभावामुळे त्यांचा समावेश मोठ्या प्रमाणावर करण्यात आला नाही. पण त्यानंतर अभावाने एखाद-दुसऱ्या श्वानाला सामावून घेण्यात येत होते. २०१३ नंतर भारतीय श्वान पथकांतली त्यांची संख्या वाढवण्यात येऊ लागली. सध्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या श्वान पथकातील ९० टक्के श्वान मालिनोआस आहेत. एनएसजीनेही आता सर्वाधिक मालिनोआसची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

नव्या कोणत्या योजनांसाठी प्रशिक्षण?

दुर्गम, जोखमीच्या क्षेत्रात स्वतंत्रपणे, प्रशिक्षकाशिवाय काम करण्याचे प्रशिक्षण एनएसजी त्यांच्या पथकातील मालिनोआसला देत आहेत. त्याला तंत्रज्ञानाचीही जोड आहे. श्वानाला कॅमेरा आणि रेडिओ सेट बांधून त्याकरवी त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.

बेल्जियन मालिनोआसची आजपर्यंतची कामगिरी कशी?

अनेक युद्धे, मोहिमांमध्ये मालिनोआसने जोखमीची कामगिरीही फत्ते केली आहे. ओसामा बिन लादेनवरील हल्ल्यात अमेरिकी सैन्याच्या श्वानपथकातील कैरो या मालिनोआसने महत्त्वाची भूमिका निभावली होती. सीरियामध्ये आयसिसचा म्होरक्या अबू बकर अल बगदादी हा अमेरिकन सैन्याच्या तावडीतून निसटू पाहात असताना कॉनन या मालिनोआस श्वानाने त्याला मारले. भुयारात अनेक किलोमीटरपर्यंत कॉननने बगदादीचा पाठलाग केला. भारतात पठाणकोट येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एनएसजीच्या पथकातील ‘रॉकेट’ या मालिनोआस या श्वानाने आगीचा सामना करून अतिरेक्यांचे सामान, शस्त्रास्त्रे शोधून काढली होती. त्याच्या पालकाला शौर्यपदक देण्यात आले. जम्मू-काश्मीर येथे २०२२ मध्ये झालेल्या हल्ल्यात एक्सेल या मालिनोआस श्वानाने दहशतवाद्यांना धूळ चारली होती. त्या हल्ल्यात एक्सेलला वीरमरण आले. इस्रायल आणि हमासच्या युद्धात इस्रायलच्या पथकातील श्वानांनी अद्भुत वाटावी अशी कामगिरी केली.