संजय जाधव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अमेरिकेत संशोधन झालेली कायमेरिक अँटिजेन रिसेप्टर टी-सेल (कार-टी) उपचारपद्धती कर्करोगावर प्रभावी मानले जाते. भारतातील एका जैवतंत्रज्ञान कंपनीने तिचे स्वदेशी रूप विकसित केले आहे. कार-टी ही उपचारपद्धती प्रामुख्याने रक्ताच्या कर्करोगावर उपचारासाठी वापरली जाते. मागील काही दिवसांपासून तिचा वापर वाढत आहे. स्वयंप्रतिकारक रोग आणि मेंदूच्या कर्करोगावरही या उपचारांचा वापर होतो आहे. देशातील औषध नियामकांनी मुंबईस्थित इम्युनोॲक्ट कंपनीने उत्पादित केलेल्या नेक्सकार १९ या उपचार पद्धतीच्या वापराला गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मान्यता दिली. इम्युनोॲक्टकडून सध्या देशभरातील रुग्णालयांत दरमहा सुमारे दोन डझन रुग्णांना हे उपचार दिले जात आहेत. तिचा रुग्णांना मोठा फायदा होण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा >>> विश्लेषण : भांगेचे ‘हे’ गुणकारी फायदे माहीत आहेत का?

उपचारपद्धतीची गरज का?

कार-टी उपचारांमध्ये एखाद्या व्यक्तीचे रक्त घेऊन त्यातील रोगप्रतिकारक घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टी पेशी वेगळ्या केल्या जातात. प्रयोगशाळेत या पेशींमध्ये जनुकीय सुधारणा केल्या जातात. यात त्या पेशींमध्ये निष्क्रिय विषाणू सोडला जातो. त्यातून त्या पेशींच्या आवरणावर कार हे विशेष प्रकारचे रिसेप्टर तयार होतात. जनुकीय सुधारणा केलेल्या अशा कार-टी पेशी पुन्हा रुग्णाच्या शरीरात सोडल्यात जातात. कर्करोगाच्या पेशींकडे या पेशी आकृष्ट होतात. नंतर या पेशी कर्करोगाच्या पेशींना मारून टाकतात.

भारतात अशा नवीन उपचार पद्धतींना फारशी मागणी सुरुवातीला दिसून येत नाही. कारण रुग्णांना खर्चिक आरोग्य व्यवस्था परवडणे हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा असतो. देशातील १ लाख जणांपैकी सुमारे १५ जणांना रक्ताचा कर्करोग होतो. त्यातील निम्म्या जणांना उपचारानंतर दोन वर्षांत पुन्हा या कर्करोगाचा प्रादुर्भाव झाला. मात्र, त्यांपैकी केवळ १५ जणांना केमोथेरपीसह इतर उपचार पुन्हा घेणे शक्य होते. त्यामुळे कार-टी उपचारांची देशात गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

नेक्सकार १९ चे वेगळेपण काय?

नेक्सकार १९ ही अमेरिकेतील कार-टी उपचारपद्धतींसारखी असली, तरी तिची काही वेगळी वैशिष्ट्ये आहेत. कार पेशींमध्ये प्रतिपिंडे ही उंदरातून मिळविली जातात. त्यामुळे या उपचार पद्धतीमध्ये काही मर्यादा येतात. कारण शरीरातील रोगप्रतिकारशक्ती काही कालावधीनंतर या पेशींनी ओळखून त्यांना मारून टाकते. याच वेळी नेक्सकार १९ मध्ये उंदराच्या प्रतिपिंडावर मानवी प्रथिनांचा वापर करण्यात आला आहे. यामुळे रोगप्रतिकारशक्ती या पेशींना मारून टाकत नाहीत आणि या उपचार पद्धतीत होणारे दुष्परिणामही कमी होतात. नेक्सकार १९ च्या चाचण्यांमध्ये ३३ पैकी १९ जणांमध्ये कर्करोग एक महिन्याच्या उपचारानंतर बरा झाल्याचे दिसून आले. याचबरोबर इतर चार जणांमध्ये कर्करोगाच्या गाठीचा आकार अर्ध्या आकाराने लहान झाल्या. या वैद्यकीय चाचण्यांमध्ये सहभागी झालेल्या ७० टक्के रुग्णांना पाच वर्षांपर्यंत निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. यातील केवळ दोन रुग्णांना गंभीर स्वरूपाचे दुष्परिणाम दिसून आले.

हेही वाचा >>> विश्लेषण : भारत-पाकिस्तान व्यापार पाच वर्षांनी सुरू होणार? जाणून घ्या तेव्हा व्यापार ठप्प होण्याची काय होती कारणं?

खर्चात किती तफावत?

जागतिक पातळीवर उपलब्ध असलेल्या कार-टी उपचारांपेक्षा भारतीय पद्धतीचा खर्च केवळ एक दशांश आहे. नेक्सकार १९चा उपचार घेण्यासाठी ३० ते ४० हजार डॉलरचा खर्च येतो. अमेरिकेत २०१७ मध्ये पहिल्यांदा या उपचारपद्धतीला मान्यता मिळाली. या उपचाराचा खर्च सध्याच्या घडीला तीन लाख ७० हजार डॉलर ते पाच लाख ३० हजार डॉलर आहे. त्यात रुग्णालयाचे शुल्क आणि औषधांच्या दुष्परिणामांमुळे कराव्या लागणाऱ्या खर्चाचा समावेश नाही. भारतात तुलनेने ही उपचारपद्धती अमेरिकेपेक्षा कमी खर्चिक असली, तरी देशातील गरीब रुग्णांचा विचार करता तिची किंमत आणखी कमी करण्याची मागणी केली जात आहे.

संशोधकांचे म्हणणे काय?

नेक्सकार १९ विकसित करण्यात संशोधिका अलका द्विवेदी सहभागी होत्या. त्या सध्या अमेरिकेतील यूएस नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत आहेत. इतर सर्व उपचारपद्धती अपयशी ठरलेल्या रुग्णांना हे उपचार वरदान ठरत असून, रुग्ण बरे होत आहेत, असे स्पष्ट केले. ही उपचारपद्धती जगभरातील कमी व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांतील रुग्णांसाठी महत्त्वाची ठरेल, असे ब्राझीलमधील रक्तविकारतज्ज्ञ रेनॅटो कुन्हा यांनी म्हटले आहे. या उपचार पद्धतीमुळे या रुग्णांच्या आयुष्यात आशा निर्माण होईल, असेही त्यांनी नमूद केले. उच्च उत्पन्न देशांतील संशोधकांसाठी हा इशारा असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अनेक देश स्वस्त उपचारपद्धती विकसित करीत असताना श्रीमंत देशांमध्ये हे घडत नसल्यावर अनेक जणांनी बोट ठेवले आहे.

sanjay.jadhav@expressindia.com