करोना महासाथीनंतर जगावर आता नव्या विषाणूजन्य आजाराचे संकट निर्माण झाले आहे. आफ्रिकेतील काही देशांमध्ये मारबर्ग विषाणूचा प्रसारामुळे १५ हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या आजारात डोळ्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होतो आणि अधिक काळजी घेतली नाही तर रुग्ण दगावू शकतो. डोळ्यातून रक्तस्राव होणाऱ्या या नव्या आजाराविषयी…

डोळ्यातून रक्तस्राव होणारा नवा विषाणू…

जगात सध्या मारबर्ग, एमपॉक्स आणि ओरिओपोचे विषाणूंमुळे चिंता वाढली आहे. या विषाणूची लागण झालेल्या रुग्णाच्या डोळ्यातून रक्त वाहते. आफ्रिकेतील रवांडा देशात या विषाणूने मोठा कहर केला असून शेकडो नागरिकांना फटका बसला आहे. या देशात या विषाणूजन्य आजाराने १५ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. या विषाणूचा धोका पाहता जगातील १७ देशांमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रवाशांना नवीन विषाणूच्या प्रसाराविरुद्ध अतिरिक्त सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या आजारात डोळ्यातून रक्त वाहत असल्याने त्याला ‘ब्लीडिंग आय व्हायरस’ असेही म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार हा विषाणू इबोला विषाणूशी संबंधित असून त्याची लक्षणेही बहुतेक समान आहेत. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

nylon manja news in marathi
अकोल्यात नायलॉन मांजामुळे डोळाच धोक्यात… प्रशासनाच्या नाकावर टिच्चून…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
sunlight
हिवाळ्यात एक-दोन आठवडे आणि एक महिना सूर्यप्रकाशापासून दूर राहिल्यास काय होईल? तज्ज्ञांनी केला खुलासा…
HMPV Found In Mumbai
Mumbai : मुंबईत आढळला HMPV चा पहिला रुग्ण, सहा महिन्यांच्या बाळाला विषाणूची लागण
Loksatta explained Is the risk of HMPV increasing
विश्लेषण: ‘एचएमपीव्ही’चा धोका वाढतोय?
rabit fever
माणसांमध्ये वेगाने पसरतोय ‘रॅबिट फिव्हर’; काय आहे हा विचित्र आजार? त्याची लक्षणे काय?
Jasprit Bumrah Set to Miss Upcoming White-ball Series
बुमराची पाठीची दुखापत किती गंभीर? चॅम्पियन्स करंडक स्पर्धेला मुकण्याचा धोका?
Bride grand Welcome To The Chawla with Band
‘हा आनंद केवळ चाळीतच…’ नव्या सुनेचं असं स्वागत कधी पाहिलं नसेल; Viral Video पाहून आठवतील जुने दिवस

हेही वाचा >>> कोल्ड्रिंकसह तंबाखू, सिगारेट महागणार? काय आहे कारण?

या आजाराची लक्षणे काय?

मारबर्ग विषाणूची लक्षणे दोन टप्प्यांत दिसून येतात. पहिल्या टप्प्यात हा आजार पाच ते सात दिवस टिकतो. योग्य आणि त्वरित उपचार घेतल्यास तो बरा होतो. पहिल्या टप्प्यात ताप, थंडी वाजणे, तीव्र डोकेदुखी, खोकला, स्नायू किंवा सांधेदुखी, घसा खवखवणे आणि पुरळ ही लक्षणे दिसतात. जर चार ते पाच दिवसांत रुग्ण बरा नाही झाला, तर तीव्र लक्षणे दिसायला लागतात. उलट्या, अतिसार, ओटीपोटात मुरड येणे, मळमळ आणि खाज नसलेले पुरळ यांसारखी लक्षणे दिसतात. त्यानंतर काही दिवसांत नाक, तोंड, डोळे यांतून रक्तस्राव होतो. डोळ्यांतून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होतो. काही रुग्णांमध्ये उलटी आणि शौचातूनही रक्त वाहते.

हा आजार कसा पसरतो?

मारबर्ग विषाणू रोग हा एक दुर्मीळ परंतु अनेकदा प्राणघातक आजार आहे. आफ्रिकेच्या काही भागांत कधीकधी त्याचा उद्रेक होतो. वटवाघळाच्या रक्त, मूत्र आणि लाळेच्या संपर्कातून हा आजार मानवामध्ये पसरला. आता हा आजार झालेल्या रुग्णाच्या संपर्कातूनही पसरू शकतो. वटवाघळांचे प्रमाण अधिक असलेल्या खाणींमध्ये किंवा गुहेत बराच काळ घालवलेल्या व्यक्तींमुळे हा आजार पसरला गेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने असे म्हटले आहे की मारबर्ग रोगाची पहिली चिन्हे दोन ते एकवीस दिवसांच्या उष्मायन कालावधीनंतर अचानक दिसून येतात.

या विषाणूच्या संसर्गामुळे डोळ्यातून रक्तस्राव होतो. म्हणून या वैज्ञानिक भाषेत हेमोरेजिक कंजक्टिवाइटिस असेही म्हणतात. गर्भवती आणि गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना या आजाराचा अधिक धोका असतो.

हेही वाचा >>> विश्लेषण : जो बायडेन यांनी मुलाला ‘माफी’ का दिली? राष्ट्राध्यक्षांना असलेल्या अधिकाराचा गैरवापर झाला का?

उद्रेक कोणत्या देशांमध्ये?

आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये मारबर्ग विषाणूचा उद्रेक झाला आहे. त्यामध्ये रवांडा, बुरुंडी, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, काँगो, गॅबाॅन, युगांडा, केनिया या देशांचा त्यामध्ये समावेश होतो. ब्रिटनमध्ये या आजाराचे पाच रुग्ण आढळल्याने युरोपमध्येही भीती निर्माण झाली आहे. ब्राझील, बोलिव्हिया, कोलंबिया, क्युबा, डोमिनिकन रिपब्लिकन, इक्वेडोर, गयाना, पनामा आणि पेरूमध्येही या विषाणूचा संसर्ग झालेले काही रुग्ण आढळून आले आहेत.

कोणती खबरदारी आवश्यक?

मारबर्ग विषाणू संक्रमित रुग्णाच्या संपर्कातून पसरतो. त्यामुळे आजारी किंवा पुरळ उठलेल्या लोकांशी संपर्क टाळावा. करोनाकाळात घेण्यात आलेली काळजी येथेही लागू होते. म्हणजे मुखपट्टी वापरणे, हात धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे. शरीरातील द्रव पदार्थांपासून हा आजार पसरत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे आपले हात चेहऱ्यापासून दूर ठेवावे. लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन वैद्यकीय उपचार घ्यावा. त्याशिवाय उद्रेक झालेल्या देशांमध्ये प्रवास करणे टाळावे, अशा सूचना देण्यात येत आहेत. या विषाणूवर सध्या कोणतीही विशिष्ट औषधे किंवा लस नाही. मात्र या विषाणूमुळे मृत्यू येण्याचे प्रमाण कमी असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हा आजार लैंगिक संबंधामुळेही पसरू शकतो. त्यामुळे लैंगिक संबंध ठेवताना कंडोम किंवा इतर संरक्षक साधने वापरण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

sandeep.nalawade@expressindia.com

Story img Loader